मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

अँड्रॉईड युजर्सला या 21 apps बद्दल इशारा, फोनसाठी ठरू शकतील धोकादायक

अँड्रॉईड युजर्सला या 21 apps बद्दल इशारा, फोनसाठी ठरू शकतील धोकादायक

अनेकदा या ऍप्समुळे इतर अनेक दुसरे ऍप्स, लिक्स ओपन होतात. यामुळे हॅकिंगचा धोका निर्माण होतो.

अनेकदा या ऍप्समुळे इतर अनेक दुसरे ऍप्स, लिक्स ओपन होतात. यामुळे हॅकिंगचा धोका निर्माण होतो.

अनेकदा या ऍप्समुळे इतर अनेक दुसरे ऍप्स, लिक्स ओपन होतात. यामुळे हॅकिंगचा धोका निर्माण होतो.

    नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर : सायबर सिक्योरिटी फर्म (Cyber security firm) Avast ने गुगल प्ले स्टोरवर (google play store) असलेल्या 21 Adware Gaming Apps बाबत इशारा दिला आहे. Google कडून Adware Gaming Apps च्या रिपोर्टबाबत चौकशी सुरू असल्याचं, कंपनीने सांगितलं. सेंसर टॉवरने (Sensor Tower) दिलेल्या डेटानुसार, हे 21 ऍप्स, ऍप स्टोरवरून जवळपास 80 लाख वेळा डाउनलोड करण्यात आले आहेत. यापैकी अनेक Adware Gaming Apps चा प्रमोशनल कंटेंट YouTube आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पाहण्यात आल्याचा दावा Avast ने केला आहे. google play store वरून हे ऍप डाउनलोड केल्यानंतर, यामुळे युजर्सचा फोन नको असलेल्या जाहिरातींनी भरतो. त्याशिवाय हे ऍप्स, हे Adware बाकी मालवेयरहून कमी धोकादायक असलेल्या मॅलिशियस कोडसह असल्याचंही सांगण्यात आलं आहे. (वाचा - FAU-G चा टीजर पाहून PUBG ला विसराल! मॅपमध्ये दिसणार भारतातील हे ठिकाण) Shoot Them Crush Car Rolling Scroll Helicopter Attack - NEW Assassin Legend - 2020 NEW Helicopter Shoot Rugby Pass Flying Skateboard Iron it Shooting Run Plant Monster Find Hidden Find 5 Differences - 2020 NEW Rotate Shape Jump Jump Find the Differences - Puzzle Game Sway Man Desert Against Money Destroyer Cream Trip - NEW Props Rescue (वाचा - 6000mAh बॅटरी, 64 मेगापिक्सल कॅमेरा; फक्त 12 हजारात मिळवा Samsung चा 'हा' फोन) अनेकदा या ऍप्समुळे इतर अनेक दुसरे ऍप्स, लिक्स ओपन होतात. यामुळे हॅकिंगचा धोका निर्माण होतो. सध्या Google कडून Avast कडून सांगण्यात आलेल्या या 21 Adware Gaming Apps बाबत कोणतेही डिटेल्स शेयर करण्यात आलेले नाहीत.

    (वाचा - WhatsApp युजर्ससाठी मोठी बातमी; आता फ्रीमध्ये मिळणार नाही ही सुविधा)

    Published by:Karishma Bhurke
    First published:

    पुढील बातम्या