मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Cyber Fraud : Loan App वरुन होतेय मोठी फसवणूक, सायबर क्रिमिनल्सपासून असा करा बचाव

Cyber Fraud : Loan App वरुन होतेय मोठी फसवणूक, सायबर क्रिमिनल्सपासून असा करा बचाव

गुगल प्ले स्टोरवर लोन देणारे App काम करतात तर काही वेबसाइटद्वारे लोन देण्याचं काम करतात. योग्य App कोणतं हे समजण्यासाठी अतिशय सावध राहणं गरजेचं आहे.

नवी दिल्ली, 9 मे : डिजीटल जगात सायबर क्राइम आणि फ्रॉडसारख्या अनेक घटना समोर येत आहेत. आता लोन देणाऱ्या App द्वारे गैरप्रकारे पैसे वसूल केले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत असे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. मुंबईत लोन देणाऱ्या App च्या रिकव्हरी एजेंटकडून धमकी देऊन अधिक पैसे वसूल केले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. काही जण तर केवळ 6 ते 7 दिवसांच्या लोनवर कर्जाच्या रकमेच्या दुप्पट व्याज मागितलं जात आहे.

तसंच कर्जदाराने यासाठी नकार दिल्यास त्याच्या फोटोमध्ये फेरबदल करुन, फोटोचा गैरवापर करुन ते शेअर केले जात आहे. डिप्रेशनमध्ये येऊन काही कर्जदार स्वत: नुकसानही पोहोचवत आहेत. अशाप्रकारच्या अनेक घटना सतत समोर आल्या आहेत. सायबर क्रिमिनल्सवर पोलिसही पूर्णपणे लगाम लावण्यास असमर्थ ठरत आहेत. त्यामुळे अशा सायबर क्रिमिनल्सच्या जाळ्यात न अडकण्यासाठी सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे.

गुगल प्ले स्टोरवर लोन देणारे App काम करतात तर काही वेबसाइटद्वारे लोन देण्याचं काम करतात. योग्य App कोणतं हे समजण्यासाठी अतिशय सावध राहणं गरजेचं आहे.

- लोन App प्रोसेसिंग फी अधिक मागत असल्यास त्यावर विश्वास ठेवू नका.

- तसंच कोणी बँकेची माहिती, डेबिट-क्रेडिट कार्डची माहिती, पीन नंबर, आधार कार्ड नंबर मागत असेल तर अजिबात देऊ नका.

- कोणतंही App डाउनलोड करताना त्याचं रेटिंग, रिव्ह्यू चेक करा.

- महत्त्वाची गोष्ट म्हणजे App वरुन लोन घेण्यापेक्षा बँक किंवा इतर अधिकृत संस्थांमधून लोन घेणं फायद्याचं ठरेल.

- App डाउनलोड करताना त्या App ला RBI ची परवानगी आहे का ते तपासा.

- कोणी लोनबाबत व्याज दर, हप्ते, इतर पेमेंटबाबत योग्य माहिती देत नसेल तर ते App घेऊ नका.

हे वाचा - Fecebook वर या मेसेजवर चुकूनही क्लिक करू नका, रिकामं होऊ शकतं बँक अकाउंट

काय आहे RBI चा रिपोर्ट -

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियान मागील वर्षी एक रिपोर्ट जारी केला होता. त्यात देशातील वेगवेगळ्या डिजीटल प्लॅटफॉर्मवर लोन देणारे जवळपास 1100 Apps आहेत. त्यापैकी तब्बल 600 Apps अवैधपणे काम करत आहेत. तर 80 Apps स्टोरवर होते. त्यामुळे कर्जासाठी कोणत्याही App वर अप्लाय करण्याआधी सावधपणे पाऊलं उचलणं महत्त्वाचं आहे.

First published:
top videos

    Tags: Loan, Rbi, Tech news