ऑनलाइन बर्गर मागवणं पडलं महागात! अवघ्या 178 रुपयांची ऑर्डर अन् खात्यातून गेले 21,865 रुपये

ऑनलाइन बर्गर मागवणं पडलं महागात! अवघ्या 178 रुपयांची ऑर्डर अन् खात्यातून गेले 21,865 रुपये

घराबाहेर राहणारे मुलं-मुली त्यांच्या सोयीसाठी किंवा एखाद्याला जेवण करायचा कंटाळा आला असेल तर बाहेर जाऊन जेवण्याऐवजी ऑनलाइन फूड डिलिव्हरीला जास्त पसंती दिली जाते. मात्र एका महिलेला यामुळे भरभक्कम नुकसान सहन करावे लागले आहे.

  • Share this:

नोएडा, 30 ऑक्टोबर : आजकालच्या व्यस्त जीवनात ऑनलाइन फूड मागवणे अनेकांचा जेवण बनवायचा वेळ वाचवत आहे, अनेकांना चमचमीत खायला मिळत आहे तर घराबाहेर राहणाऱ्या मुलामुलींना चवदार अन्न देत आहे. पण अशाप्रकारे खाद्यपदार्थ मागवताना केलेली एक छोटीशी चूक देखील महागात पडू शकते. जर तुम्ही संबंधित फूड कंपनीचा नंबर गुगलवर शोधून तो डायल करत असाल किंवा कोणतेही अॅप तुमच्या फोनमध्ये डाऊनलोड करत असाल तर वेळीच सावध व्हा. कारण ही चूक तुमचे संपूर्ण खाते रिकामे करू शकते. मीडिया अहवालातील माहितीनुसार नोएडामध्ये एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या महिला सॉफ्टवेअर इंजीनिअरला अशाप्रकारे बर्गर मागवणं महाग पडलं आहे. ही ऑर्डर केल्यानंतर तिच्या खात्यातून 21,865 रुपये काढण्यात आले आहेत आणि या बर्गरची किंमत अवघी 178 रुपये होती.

कशी कापली गेली एवढी मोठी रक्कम?

नोएडा सेक्टर 45 मधील एका महिलेने 178 रुपये प्रीपेड पेमेंट करून एक बर्गर ऑर्डर केला होता. 35 मिनिटांमध्ये त्याची डिलिव्हरी होणार होती. मात्र दीड तास झाला तरी ती डिलिव्हरी झाली नाही. त्यामुळे तिने संबंधित रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्याशी चॅटवरून बातचीत केली तेव्हा तिला असे सांगण्यात आले की ऑर्डर रद्द केली गेली आहे. हे संपूर्ण प्रकरण रिमोट कंट्रोल असणाऱ्या App शी संबंधित आहे.

(हे वाचा-मोठी बातमी! शेतकऱ्यांना नाही मिळणार व्याजावरील व्याज माफ योजनेचा फायदा)

यानंतर महिलेन रिफंड मिळवण्यासाठी गुगलवर संबंधित कंपनीच्या कस्टमर केअरचा नंबर शोधला आणि त्यावर कॉल केला. कॉल उचलणाऱ्या व्यक्तीने तो त्या कंपनीचा कर्मचारी असल्याचे सांगितले. त्याने महिलेस असे सांगितले की, तो कॉल मॅनेजर लेव्हलच्या एक्झिक्यूटिव्हला ट्रान्सफर करत आहे. त्याने तिला एक अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले आणि त्यानंतर पैसे मिळतील असेही सांगितले. ते अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर महिलेच्या खात्यातून 21,865 रुपये कापले गेले. संबंधित महिलेने सायबर फ्रॉड अंतर्गत तक्रार दाखल केली आहे.

(हे वाचा-यावर्षी सोनं सर्वाधिक महागलं, दिवाळीत सोन्यातून फायदा मिळवण्याची संधी?)

अशाप्रकारच्या घटना लॉकडाऊन काळात वारंवार समोर येत आहेत. अशावेळी एक ग्राहक म्हणून आपण सतर्क राहणे गरजेचे आहे. सरकार त्याचप्रमाणे देशातील विविध बँकांनी देखील याबाबतचे अलर्ट जारी केले आहेत. त्याचप्रमाणे थेट गुगलवरून कस्टमर केअर क्रमांक डायल करणे तुम्ही टाळू शकता. संबंधित कंपनीच्या वेबसाइटवरून तुम्हाला योग्य क्रमांक उपलब्ध होईल.

Published by: Janhavi Bhatkar
First published: October 31, 2020, 9:24 AM IST

ताज्या बातम्या