फ्लिपकार्टचा आपला पासवर्ड तातडीने करा रिसेट; अन्यथा बसेल मोठा धक्का

फ्लिपकार्टचा आपला पासवर्ड तातडीने करा रिसेट; अन्यथा बसेल मोठा धक्का

फ्लिपकार्ट (Flipkart) युझर्ससाठी एक महत्वाची सूचना दिली जात आहे, त्यांनी आपले पासवर्ड सातत्याने रिसेट करावेत जेणेकरुन ते सायबर फ्रॉडला बळी पडणार नाहीत.

  • Share this:

मुंबई, 14 मे : ग्राहक अनेकदा गरजेच्या वस्तुंची खरेदी ऑनलाईन पध्दतीने करतात. त्यातही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन खरेदीला प्राधान्य दिले जात आहे. परंतु, याबरोबरच सायबर क्राईमच्या (Cyber Crime) घटनांमध्ये वाढ होत असून, आपली एक छोटीशी चूक देखील आपले अकाऊंट रिकामे करु शकते. त्यामुळे वेळोवेळी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन सायबर क्राईम यंत्रणेकडून केले जात आहे. त्यातच आता फ्लिपकार्ट (Flipkart) युझर्ससाठी एक महत्वाची सूचना दिली जात आहे, त्यांनी आपले पासवर्ड सातत्याने रिसेट करावेत जेणेकरुन ते सायबर फ्रॉडला बळी पडणार नाहीत.

तुम्ही जर फ्लिपकार्टवरुन ऑनलाईन खरेदी करत असाल तर तातडीने तुमचा पासवर्ड रिसेट करा. देशात वेगाने वाढणाऱ्या सायबर फ्रॉडच्या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांनी ग्राहकांना सल्ला दिला आहे, की जर तुम्हाला तुमचे पैसे सुरक्षित ठेवायचे असतील तर सातत्याने पासवर्ड रिसेट (Password Reset) करणं गरजेचं आहे. सायबर तज्ज्ञांनी फ्लिपकार्ट युझर्सला एका मोठा धोक्याबाबत सावध देखील केलं आहे.

तज्ज्ञ राजशेखर राजघरिया यांच्या म्हणण्यानुसार, बिग बास्केटच्या (Bigbasket) कथित लीक डेटा मधून सायबर गुन्हेगार ग्राहकांचे ई-मेल अड्रेस,आणि पासवर्ड विकत आहेत की जे ई-कॉमर्स कंपन्या फ्लिपकार्ट (Flipkart)आणि अमेझॉनच्या (Amazon) खात्यांशी जुळतात. तसंच, त्यांनी सांगितले की जेव्हा आपण ब्राऊझर बदलतो तेव्हा अमेझॉन लॉगिनसाठी ओटीपी पाठवतो.

राजशेखर यांनी केले ट्वीट

राजशेखर राजघरिया यांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. राजशेखर आपल्या ट्वीटमध्ये लिहीतात, काही लोक बिग बास्केट इ-मेलची विक्री करत असावेत, असं वाटतयं. पासवर्ड कॉम्बिनेशन फ्लिपकार्ट डेटा स्वरुपात आहे. सध्या अनेक लोक सर्व वेबसाईटसाठी एकच पासवर्ड वापरत आहेत. जवळपास सर्व इ-मेल बिग बास्केट डिबी (डेटाबेस) सोबत मिळते जुळते आहेत. त्यामुळे सर्व युझर्सने आपले फ्लिपकार्ट पासवर्ड बदलणं गरजेचं आहे, अन्यथा त्यांचे मोठे नुकसान होऊ शकते.

फ्लिपकार्ट अकाऊंट सुरक्षित करणं गरजेचं

राजघरिया यांनी सांगितले की फ्लिपकार्टने आपले अकाऊंटस सुरक्षित केले पाहिजेत. लीक केलेला इ-मेल आणि पासवर्ड असलेला कोणीही फ्लिपकार्टसह कुठूनही व्हीपीएन/टीओआरवरुन सहज लॉगिन करु शकतो. त्यामुळे सर्व अकाऊंट साठी 2FA( 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन) बंधनकारक करावे.

या व्यतिरिक्त त्यांनी टेलिग्रामवरुन पाठवले जाणारे अकाऊंट डिटेल्सही शेअर केले आहेत. याबाबत संपर्क साधला असता फ्लिपकार्टच्या एका प्रवक्त्याने सांगितले की, आमचा समूह ग्राहकांच्या डेटाची सुरक्षा आणि सुरक्षितता राखण्यावर पूर्णपणे लक्ष केंद्रीत करीत आहे. आमची माहिती सुरक्षा प्रणाली आणि नियंत्रण मजबूत आहेत.

First published: May 14, 2021, 10:55 AM IST
Tags:

ताज्या बातम्या