Truecaller वरील 4.75 कोटी लोकांचा डेटा विकला जाणार, तुमचा नंबर नाही ना?

Truecaller वरील 4.75 कोटी लोकांचा डेटा विकला जाणार, तुमचा नंबर नाही ना?

truecaller वापरताय सावधान! 4. 75 कोटी लोकांचा डेटा विकला जाणार

  • Share this:

नवी दिल्ली, 27 मे : आपल्या सगळ्यांच्या फोनमध्ये जवळपास truecaller हे अॅप्लिकेशन असतं. मात्र आता या truecaller वर दिलेली माहिती किती सुरक्षित आहे हा सवाल उपस्थित होतं आहे. truecaller वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. जवळपास 4. 75 कोटी नागरिकांचा डेटा 75000 रुपयांना विकला जाणार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

truecaller वर मिळालेल्या ग्राहकांची माहिती 75000 रुपयांसाठी विकणार असल्याचा दावा एका सायबर गुन्हेगारानं केला आहे. ऑनलाईन गुप्तचर यंत्रणा सायबर सेलकडून यासंदर्भात माहिती मिळाली आहे. या दाव्यामुळे truecaller अॅपवरील ग्राहकांच्या डेटा सुरक्षेवर आणि truecaller अॅपच्या सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्हं उपस्थित झालं आहे.

truecaller वरील एका प्रवक्त्यानं हा दावा मात्र फेटाळून लावला आहे. प्रवक्त्याने सांगितले की हा डेटाबेस कंपनीच्या नावाचा वापर करुन विकला जात आहे, जेणेकरून कंपनीची बदनामी आणि या आरोपीचा डाटा विश्वासहार्य वाटेल.

हे वाचा-तुमचं 'हे' बोट सांगणार कोरोनामुळं मृत्यू होणार की नाही, शास्त्रज्ञांचा नवा दावा

ट्रू कलरच्या प्रवक्त्याने सांगितले की आमच्या डेटाबेसमध्ये कोणतीही चोरी झालेली नाही आणि आमच्या सर्व ग्रहाकांची माहिती सुरक्षित आहे. आम्ही आमच्या वापरकर्त्यांची गोपनीयता आणि आमच्या सेवांची अखंडता खूप गंभीरपणे घेत आहोत आणि आम्ही संशयास्पद हालचालींवर सतत नजर ठेवतो. प्रवक्त्याने सांगितले की मे 2019 मध्ये अशाच प्रकारच्या डेटाच्या विक्रीबाबत कंपनीला माहिती आहे. त्यांच्याकडे पूर्वीसारखेच डेटासेट असण्याची अपेक्षा आहे. ह्या डेटावर ट्रू कॉलरचा स्टँप लावून विकला जात असल्याचं सांगण्यात आलं आहे.

यासंदर्भात सध्या तपास सुरू आहे. परंतु अशा प्रकारची कोणतीही माहिती लीक झाली नाही असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. नक्की काय गौडबंगाल आहे हे पुढील तपासात स्पष्ट होईल तोपर्यंत truecaller वापरणाऱ्या सर्व ग्राहकांनी सावध राहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हे वाचा-धडक दिल्यानंतर झाडासह टँकर धावत होता, विचित्र अपघाताचा VIDEO व्हायरल

संपादन- क्रांती कानेटकर

First published: May 27, 2020, 12:10 PM IST

ताज्या बातम्या