Home /News /technology /

तुमच्या कंप्यूटरमध्ये व्हायरस आहे असं सांगत...चोरट्यांकडून तब्बल 8 कोटींची फसवणूक

तुमच्या कंप्यूटरमध्ये व्हायरस आहे असं सांगत...चोरट्यांकडून तब्बल 8 कोटींची फसवणूक

कंप्यूटर ठिक करून देण्याच्या नावाने फसवणूक केली जात होती. स्वत:ला मायक्रोसॉफ्ट कंपनीकडून आल्याचं सांगत, व्हायरस असल्याचा खोटा पॉप-अप पाठवला जात होता.

  नवी दिल्ली, 7 नोव्हेंबर : दिल्ली पोलिसांच्या सायबर क्राईम यूनिटने पश्चिम दिल्लीतील राजौरी गार्डनमध्ये मागील एका वर्षापासून सुरू असलेल्या बनावट कॉल सेंटरवर छापा टाकला आहे. सेंटरच्या मालकासह 17 लोकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या कॉल सेंटरमधून अमेरिका आणि कॅनडातील नागरिकांना निशाणा करण्यात येत होतं. त्यांच्या कंप्यूटरमध्ये व्हायरस गेल्याचं, किंवा कंप्यूटर खराब झाल्याचं सांगत, लाखो रुपयांची फसवणूक केली जात होती. सायबर क्राईम यूनिटचे डीसीपी अनयेश राय यांनी सांगितलं की, या गँगने मायक्रोसॉफ्ट टेक्निकल सपोर्ट या नावाने 2268 लोकांना फसवलं आहे. यामधून या गँगने 8 कोटी रुपयांची चोरी केली आहे. राजौरी गार्डनमध्ये ज्याठिकाणी हे बनावट कॉल सेंटर पकडलं गेलं आहे. तेथे हे सेंटर 11 ऑक्टोबर 2019 पासून चालवलं जात होतं. लॉकडाउन दरम्यान या गँगविरोधात तक्रारी आल्या होत्या, परंतु त्यावेळी त्यांनी काही दिवसांसाठी हे कॉल सेंटर बंद केलं होतं. पुन्हा कॉल सेंटर सुरू केल्यानंतर तक्रार दाखल झाली आणि या गँगला ताब्यात घेण्यात आलं.

  (वाचा - Whatsapp Pay in India : अशाप्रकारे बनवा खातं, व्यवहार करणं अधिक सुलभ)

  पॉप-अपच्या जाळ्यात फसवलं जायचं - या आरोपींकडून आधी पॉप-अप मेसेज पाठवला जायचा. त्यानंतर त्या व्यक्तीला संपर्क साधून, तुमच्या कंप्यूटरमध्ये व्हायरस असल्याचं सांगितलं जायचं. लवकरात लवकर कंप्यूटर ठिक केला नाही, तर मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं, असं सांगितलं जायचं. पैसे जाण्याची भीती दाखवून, त्यांचा कंप्यूटर ठिक करून देण्याच्या नावाने फसवणूक केली जात होती. स्वत:ला मायक्रोसॉफ्ट कंपनीकडून आल्याचं सांगत, व्हायरस असल्याचा खोटा पॉप-अप पाठवला जात होता. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींमध्ये सर्वात मुख्य आरोपी साहिल दिलावरी हा केवळ 27 वर्षांचा आहे. तो गेल्या तीन वर्षांपासून, ठिकाणं बदलत अशाप्रकारे खोटे कॉल सेंटर चालवतो. या गँगमधील इतर 16 ते 17 जण हे 25 ते 35 वर्ष वयोगटातील आहेत.

  (वाचा -  आता Whtasapp वरूनही पाठवता येणार पैसे, कधी आणि कसं सुरू होणार जाणून घ्या)

  महिला डॉक्टरला फसवताना पकडली गेली टोळी - ज्यावेळी पोलिसांनी या खोट्या कॉल सेंटरवर छापा मारला, त्यावेळी ते अमेरिकेतील महिला डॉक्टरला फसवण्याचा प्रयत्न करत होते. स्वत: मायक्रोसॉफ्ट टेक्निकल असिस्टेंट असं सांगून, कंप्यूटर आणि प्रिंटर बिघडल्यास, रिमोटवरून रिपेअर करण्याचं कारण देत होते. या गँगमध्ये इतर काही जण सामिल होते. त्या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
  Published by:Karishma Bhurke
  First published:

  Tags: Cyber crime

  पुढील बातम्या