मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Cyber Crime: इंटरपोलच्या इशाऱ्यानंतरही कोरोना लस बनवणाऱ्या फायझरच्या डेटावर सायबर हल्ला

Cyber Crime: इंटरपोलच्या इशाऱ्यानंतरही कोरोना लस बनवणाऱ्या फायझरच्या डेटावर सायबर हल्ला

Pfizer ही कोरोनावरची लस (Corona vaccine) निर्माण करणारी सध्याच्या घडीची मोठी कंपनी आहे. या कंपनीच्या डेटाबेसवर सायबर हल्ला करून माहितीची चोरी झाली आहे.

लंडन, 10 डिसेंबर:  सध्या कोरोना लस (Covid-19 vaccine) निर्मितीवरून संपूर्ण जगभर चढाओढ सुरू आहे. जगभरातील 100 हून अधिक देशात कोरोना विषाणूवर (Coronavirus) लस शोधण्याचे प्रयोग चालू आहेत. कोरोना लस (Corona vaccine) निर्मितीत अनेक देशांना यशही आलं आहे. यामुळे कोरोना लशीवरून जागतिक राजकारणात आता कुरघोड्याही वाढू लागल्या आहेत. अशातच लस निर्मितीत यशस्वी ठरलेल्या ब्रिटनच्या फायझर (Pfizer) कंपनीबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे.

ब्रिटनच्या फायझर आणि बायोएनटेक (BioNtech) कंपनीने लसीकरणाच्या मंजुरीसाठी ज्या सरकारी संस्थेकडे कागदपत्रे पाठवली होती. त्या सरकारी संस्थेवर सायबर हल्ला झाल्याचा दावा फायझर कंपनीने केला आहे. लशीसंदर्भातला गोपीनीय डेटा चोरण्याचा प्रयत्न हॅकर्सनं केला आहे. फायझर आणि बायोएनटेकने आताच ब्रिटनमध्ये आपात्कालीन लसीकरणही सुरू केलं आहे.

सध्या जगातील बहुतांशी राष्ट्रे लस मिळवण्याच्या प्रयत्नात असताना, लशीची कागदपत्रे चोरण्याचा हा गंभीर प्रकार घडला आहे. फायझर आणि बायोएनटेक या कंपन्यांनी सांगितलं की, हॅकर्सनी लशीच्या कागदपत्रांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा हा प्रयत्न पूर्णपणे फसला आहे. त्यांनी युरोपीअन मेडिसिन एजन्सीकडे आपात्कालीन परवानगीसाठी लशीची कागदपत्रे सपूर्द केली होती. फायझर कंपनीने भारताकडेही लशीच्या आपात्कालीन वापरासाठी परवानगी मागितली आहे. पण ब्रिटनमध्ये ज्यांना फायझरची लस देण्यात आली होती. अशा अनेकांना अॅलर्जी  होत असल्याचं दिसून आलं आहे. यामुळे संशोधकांची काळजी वाढली आहे.

आमच्या खासगी डेटापर्यंत कोणी पोहोचलं नसल्याचं युरोपीअन मेडिसिन एजन्सीनं सांगितलं आहे. या सायबर हल्ल्याची समिक्षा करण्यासाठी आम्हाला अधिक वेळ लागणार नसल्याचंही या संस्थेनं म्हटलं आहे. त्यामुळे तूर्तास हॅकर्सचा लशी संदर्भातील कागदपत्रे चोरण्याचा प्लॅन पूर्णपणे फसला आहे.

इंटरपोलने यापूर्वीच दिला होता अलर्ट

लशीच्या गोपीनीय माहितीवर संघटित गुन्हेगारांचे हल्ले किंवा सायबर हल्ला होऊ शकतो असा इशारा इंटरपोलने यापूर्वीच दिला होता. असे हल्ले परतवून लावण्यासाठी तयार राहण्याचे आदेशही इंटरपोलने दिले होते.

First published:

Tags: Corona vaccine, Coronavirus