मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /कोविड-19च्या भीषण परिस्थितीत रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी धावली तरुणाई; तंत्रज्ञानाच्या आधारे उभारत आहेत मदत

कोविड-19च्या भीषण परिस्थितीत रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी धावली तरुणाई; तंत्रज्ञानाच्या आधारे उभारत आहेत मदत

ट्विटरवर रूग्णालयातील बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिवीर, प्लाझ्मा आणि इतर आवश्यक बाबींच्या मदतीसाठी असंख्य ट्विटस सतत होत असतात.

ट्विटरवर रूग्णालयातील बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिवीर, प्लाझ्मा आणि इतर आवश्यक बाबींच्या मदतीसाठी असंख्य ट्विटस सतत होत असतात.

ट्विटरवर रूग्णालयातील बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिवीर, प्लाझ्मा आणि इतर आवश्यक बाबींच्या मदतीसाठी असंख्य ट्विटस सतत होत असतात.

    नवी दिल्ली, 28 एप्रिल: सध्या देशात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या साथीनं (Corona Virus Second Wave) हाहाकार माजवला आहे. ही विदारक परिस्थिती पाहून काही तरुण-तरुणींनी एकत्र येत लोकांच्या मदतीसाठी धाव घेतली आहे. देशभरातील एकमेकांना कधी न भेटलेले, ओळख नसलेले तरुण-तरुणी एकत्र आले असून त्यांनी ट्विटरच्या (Twitter) तसंच माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे एक व्यापक जाळे निर्माण केले आहे. त्यामुळे ऑक्सिजन, अत्यावश्यक औषधे आदी सर्व मदत गरजूपर्यंत वेळेत पोहोचणे शक्य झालं आहे.

    या अभिनव कार्याची सुरुवात मुंबईतील (Mumbai) 20 वर्षांच्या नैरीत गाला (Nairit Gala) याच्यामुळे झाली. केपीबी हिंदुजा महाविद्यालयात फायनान्सचा अभ्यासकरत असलेल्या नैरीतनं 17 एप्रिल रोजी उत्तर प्रदेशमधील लखनऊमधील 65 वर्षीय पत्रकार विनय श्रीवास्तव यांच्या ट्विटरवर मदतीसाठीच्या पोस्ट पाहिल्या. शेवटच्या श्वासापर्यंत ते आपल्या बिघडलेल्या तब्येती बद्दल ट्विटरवर पोस्ट करत होते. 20 तासांची त्यांची झुंज अयशस्वी ठरली. या घटनेनं नैरीतला अक्षरशः हादरवून टाकलं. ही घटना त्याच्यासाठी एक महत्वाचा टर्निंग पॉईंट ठरली. त्यानं गरजू रुग्णांना मदत मिळवून देण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला. यातूनच एक अभिनव उपक्रम उभा राहिला आहे. फोर्ब्स इंडियाशी बोलताना त्यानं या उपक्रमाबाबत सविस्तर माहिती दिली.

    ट्विटरवर रूग्णालयातील बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिवीर, प्लाझ्मा आणि इतर आवश्यक बाबींच्या मदतीसाठी असंख्य ट्विटस सतत होत असतात. नैरीतनं असे मदतीचे ट्विटस रिट्विट (Retweet) करायला सुरूवात केली; पण हे पुरेसे नाही हे लक्षात आल्यावर त्यानं मदतीसाठी उपलब्ध असलेल्या स्रोतांचा डेटाबेस तयार करायला सुरुवात केली. मदतीची गरज असणाऱ्यांना तात्काळ कुठे मदत मिळेल, याची माहिती देण्यास सुरुवात केली. याच दरम्यान, ट्विटरच्या माध्यमातून त्याची ओळख इंदूरच्या (Indore) माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात इंजिनीअरिंग करणाऱ्या अनुष्का जैन (Anushka Jain) (20) हिच्याशी झाली. ती देखील कोविड-19मुळे चार जवळचे नातेवाईक गमावल्यामुळे आणखी कोणावर अशी वेळ येऊ नये यासाठी ट्विटरद्वारे रुग्णांना आवश्यक ती मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करत होती.

    वाचा: तुम्हालाही करायचंय Oxygen दान? जाणून घ्या काय आहे प्रक्रिया

    गेल्या आठवड्यापासून नैरीत आणि अनुष्का यांनी एकत्रितपणे काम सुरू केलं. नैरीतनं या कामात मदतीसाठी लोकांना आवाहन केलं,त्याला उदंड प्रतिसाद मिळाला. या कामात आता देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी असणाऱ्या 60 पेक्षा जास्त स्वयंसेवकांची भर पडली असून, 18 ते 25 वर्षे वयोगटातीलही सर्व मंडळी आहेत. त्यापैकी कोणीही वैयक्तिकरित्या एकमेकांना ओळखत नाही फक्त लोकांना मदत करण्याच्या एकाच धाग्याने हे सगळेजण एकत्र आले आहेत. बहुसंख्य स्वयंसेवक विद्यार्थीअसून ते परीक्षा, असाइनमेंट सांभाळून तर नोकरी करणारे आपलं काम सांभाळून किमान सहा तास तर अनेकजण 12 तासापेक्षा जास्त काम करत आहेत. या 65 लोकांपैकी तीन जण स्वतः कोविड-पॉझिटिव्ह आहेत. तर अनेकांच्या घरातील कोणी नां कोणी रुग्णालयात आहे. काहींनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना गमावलं देखील आहे.

    या स्वयंसेवकांचे वेगवेगळे गट करण्यात आले असून, एक गट मदतीसाठी येणाऱ्या विनंत्यांवर लक्ष ठेवतो, दुसरा गट खात्रीच्या सूत्रांकडून माहिती जमा करतो, तर आणखी एक गट माहितीचे स्रोत जमा करतो. गुगल ड्राइव्हमध्ये याचा डेटाबेस तयार केला जातो. यामध्ये हॉस्पिटलचे बेड, रुग्णवाहिका सेवा, ऑक्सिजन आणि प्लाझ्मा उपलब्धता याविषयी खात्रीशीर माहिती उपलब्ध आहे. रुग्णांना आवश्यकतेनुसार माहिती दिली जाते. ही टीम दररोज साधारण एक हजार विनंत्यांना उत्तर देत आहे. तरीही मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी स्थिती असल्यानं अनेकांना मदत करणं शक्य होत नाही. अक्षरशः 5 ते 10मिनिटांत आम्ही माहिती देण्याचा प्रयत्न करतो; तरीही कधीकधी फायदा होत नाही, मदत पोहोचण्यापूर्वी रुग्णाचा मृत्यू होतो, त्यावेळी अतिशय दुःख होतं. या धक्क्यातून सावरणे आम्हाला खूप कठीण जातं, असा अनुभव अनुष्का आणि नैरीत यांनी व्यक्त केला.

    वाचा: तुम्ही Oximeter चा चुकीचा वापर तर करत नाही ना? केंद्राने सांगितली योग्य पद्धत

    जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी नैरीत आणि अनुष्का यांनी ट्विटरवर एक बॉट (BOT) तयार केला आहे. अनुष्काकडे त्याची रचना तयार होती या बॉट यंत्रणेमुळे मदतीसाठी केले जाणारे ट्वीटस आपोआप रिट्वीट होतात आणि आमच्या डेटाबेसमधील लिंकच्या आधारे मदत मागणाऱ्या व्यक्तीला माहिती दिली जाते. गेल्या 14 तासात आमच्याकडे तब्बल दीड हजार विनंत्या आल्या आहेत,’ अशी माहिती अनुष्का जैन हिनं दिली. तसंच आपल्या देशात अनेक लोक ट्विटर वापरत नाहीत, त्यामुळं त्यांनाही या यंत्रणेचा लाभ घेता यावा याकरताही टीम आता वेबसाइट तयार करण्याचं काम करत आहे. अधिक लोकांपर्यंत पोहचण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप आणि टेलिग्राम सारख्या अ‍ॅप्सद्वारे मदत उपलब्ध करुन देण्याची प्रक्रियाही सुरू आहे. काही स्वयंसेवी संस्थांशी करार करून लवकरच प्लाझ्मादान मोहीम सुरू करण्यात येणार आहे.

    First published:

    Tags: Coronavirus, Twitter