COVID-19 Relief: या वेबसाईट्स आणि Apps द्वारे मिळेल कोरोना लसीकरण केंद्र आणि लशीच्या उपलब्धतेची माहिती

COVID-19 Relief: या वेबसाईट्स आणि Apps द्वारे मिळेल कोरोना लसीकरण केंद्र आणि लशीच्या उपलब्धतेची माहिती

अनेक कारणांमुळे लस घेण्यासाठी नाव नोंदणी करणं, सेंटर आणि वेळ घेणं यासाठी नागरिकांना अडचणी येत आहेत. या अडचणीवर मात करण्यासाठी तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज पुढे सरसावले असून, अत्याधुनिक उपाययोजना ते सादर करत आहेत. त्यामुळे नागरिकांना लवकरात लवकर लस कुठे उपलब्ध आहे याची माहिती मिळू शकेल.

  • Share this:

नवी दिल्ली, 4 मे : देशात कोविड -19 च्या (Covid-19) दुसऱ्या लाटेमुळे निर्माण झालेल्या विदारक स्थितीत आता काहीसा फरक पडत असल्याचं दिसत आहे. गेल्या काही दिवसांत नव्या बाधितांच्या संख्येत घट होत आहे. मात्र अद्याप स्थिती पूर्णतः सुधारलेली नाही. अजूनही देशात दररोज कमीत कमी तीन लाख नवीन रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे सर्व वैद्यकीय तज्ज्ञ एकच महत्त्वाची गोष्ट सांगत आहेत, ती म्हणजे मास्क वापरा (Mask).

देशभरात लसीकरणाचा कार्यक्रम वेगात सुरू असून 1 मेपासून सुरू झालेल्या तिसऱ्या टप्प्यात 18 वर्षांवरील सर्व लोकांना लस (Vaccine) देण्यात येत आहे. मात्र देशातील विशेषत: मुंबई आणि दिल्लीसारख्या मोठ्या शहरांमध्ये लसींचा तुटवडा जाणवत असून, अनेक कारणांमुळे लस घेण्यासाठी नाव नोंदणी करणं, सेंटर आणि वेळ घेणं यासाठी नागरिकांना अडचणी येत आहेत. या अडचणीवर मात करण्यासाठी तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज पुढे सरसावले असून, अत्याधुनिक उपाययोजना ते सादर करत आहेत. त्यामुळे नागरिकांना लवकरात लवकर लस कुठे उपलब्ध आहे याची माहिती मिळू शकेल. आपल्या घराच्या जवळ असलेली लसीकरण केंद्रं, लस उपलब्धता इत्यादी बाबत माहिती देणारे काही Apps आणि वेबसाईट्स आहेत.

कोविन (COWIN) -

कोविड-19 च्या लसीच्या उपलब्धतेबाबत माहिती देणारे आणि नाव नोंदणी करण्यासाठी अँड्रॉईड वापरकर्त्यांसाठी कोविन अ‍ॅप हा एकमेव पर्यायआहे. अँड्रॉइड आणि आयओएस युजर्सकरता आरोग्य सेतु अ‍ॅपद्वारे देखील नोंदणी सुविधा उपलब्ध आहे. कोविन अ‍ॅपवर पिन कोडच्या आधारे नाव नोंदणी करता येते.

फाईंड स्लॉट डॉट इन (FindSlot.in) -

लसीकरण केंद्र कुठे कुठे आहेत हे शोधण्यात मदत करणारा आणखी एक मार्ग म्हणजे फाईंडस्लॉट डॉट इन (Findslot.in). कोविन प्रमाणेच, ही वेबसाईट युजरना स्वतंत्रपणे विविध पिन कोड टाकून उपलब्धता बघण्याची सुविधा देते. काही साइट्स अविश्वसनीय असू शकतात, कारण केंद्रं किंवा स्लॉट उपलब्ध असूनही त्या ते दर्शवत नाहीत. मात्र वास्तविक वेळेनुसार उपलब्धता बदलत असते म्हणून असा बदल दिसतो, असं या वेबसाइटचं म्हणणं आहे. काही अडचण उद्भवल्यास युजर्सही वेबसाईट विकसित करणारे शुभेंदू शर्मा आणि जेरोझ यांच्याशी ट्विटरवर संपर्क साधू शकतात.

(वाचा - Facebook भारतात लाँच करणार Vaccine Finder टूल; तुम्हाला असा होणार फायदा)

गेटजाबडॉटइन (Getjab.in) -

गेटजाबडॉटइन याद्वारे युजरला लसीची उपलब्धता कुठे आहे याची सूचना ईमेलद्वारे दिली जाते. 18-45 वर्षे वयोगटातील लोकांसाठी कुठे लस उपलब्ध आहे याची माहिती युजरला ईमेल द्वारे पाठविली जाते.आयएसबीचे माजी विद्यार्थी श्याम सुंदर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही वेबसाईट विकसित केली असून, यावर नाव, ईमेल, ठिकाणआणि पर्यायी फोन नंबर ही माहिती भरणंआवश्यक आहे. युजरनं शेअर केलेली माहिती कोणालाही दिली जाणार नाही किंवा विकली जाणार नाही, याची हमी त्यांनी दिली आहे.

अंडर 45 डॉट इन (Under45.in) -

18-44 वर्षे वयोगटातील लोकांना लसीकरण केंद्र शोधण्यासाठी अंडर45 डॉट इन ही वेबसाईट माहिती देते. बर्टी थॉमसयानं ही वेबसाईट विकसित केली असून आपल्या ट्विटर खात्यावर तो लिंक्स शेअर करत असतो. विशेष म्हणजे या वेबसाईटवर फक्त राज्य आणि जिल्हायाची माहिती देणं पुरेसं आहे. यात नाव, पत्ता असा इतर वैयक्तिक तपशील द्यावा लागत नाही. यात सर्चवर आधारित लस उपलब्धतेची माहिती दिली जाते.

व्हॉट्सअ‍ॅप मायजीओव्ही कोरोना हेल्पडेस्क (What’s app MYGOV Corona Hepldesk) -

व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातूनही नागरिकांना लसीकरण केंद्रांची माहिती दिली जात आहे. मार्च 2020 मध्ये दाखल करण्यात आलेल्या What’s app MYGOV Corona Hepldesk च्या Chatbot माध्यमातून नागरिकांना त्यांच्या आसपासची लसीकरण केंद्रं शोधण्यात मदत मिळते. याकरता युजर्सनी त्यांच्या स्मार्टफोनवर 9013151 515 हा नंबर सेव्ह करावा.

(वाचा - आता तुमच्या जवळचं वॅक्सिनेशन सेंटर शोधण्यासाठी WhatsAppकरणार मदत;अशी आहे प्रोसेस)

व्हॉट्सअ‍ॅप डेस्कटॉप किंवा वेबवरही लिंकवर क्लिक करून युजर चॅटबॉट वापरू शकतात. चॅटबॉट सुरू झाल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांनी ‘हाय’ किंवा ‘हॅलो’ पाठवणं आवश्यक आहे. त्यानंतर युजरला त्यांच्या घराजवळील लसीकरण केंद्र शोधण्यासाठी काही पर्याय निवडण्यास सांगितलं जाईल. विशेष म्हणजे युजर हिंदी भाषेमधूनही चॅटबॉटवर चॅट करू शकतात.

First published: May 4, 2021, 9:35 PM IST

ताज्या बातम्या