Home /News /technology /

Cowin वर लीक झालेला डेटा मार्केटमध्ये विक्री होतोय? टिकेवर सरकारने दिलं उत्तर

Cowin वर लीक झालेला डेटा मार्केटमध्ये विक्री होतोय? टिकेवर सरकारने दिलं उत्तर

एका सिक्योरिटी एक्सपर्टने (Security Expert) शेकडो भारतीयांचा कोविड-19 शी (Covid-19) संबंधित डेटा इंटरनेटवर लीक (Dara Leak) झाल्याचा दावा केला आहे.

  नवी दिल्ली, 23 जानेवारी : जर तुम्ही कोविन पोर्टलवर (Cowin Portal) रजिस्ट्रेशन केलं असेल, तर सतर्क राहण्याची गरज आहे. एका सिक्योरिटी एक्सपर्टने (Security Expert) शेकडो भारतीयांचा कोविड-19 शी (Covid-19) संबंधित डेटा इंटरनेटवर लीक (Dara Leak) झाल्याचा दावा केला आहे. एका रिपोर्टनुसार, भारतात कोविड-19 शी संबंधित सरकारी सर्वर डेटा ब्रीचचा शिकार झाला असून सर्वरने लोकांची नावं, फोन नंबर, पत्ते आणि हजारो लोकांचे टेस्ट रिझल्ट ऑनलाइन लीक झाल्याचं म्हटलं आहे. पीटीआयच्या रिपोर्टनुसार, लीक झालेला डेटा रेड फोरमच्या वेबसाइटवर विक्रीसाठी ठेवण्यात आला होता, जिथे एका सायबर क्रिमिनलने त्याच्याकडे 20000 हून अधिक लोकांचा पर्सनल डेटा असल्याचं म्हटलं आहे.

  हे वाचा - Aadhaar Card संबंधी कोणतीही समस्या एका कॉलवर सोडवली जाईल, या क्रमांकावर करा कॉल

  सिक्योरिटी एक्सपर्टने ट्विट केली माहिती - सायबर सिक्योरिटी रिसर्चर राजशेखर राजहरिया यांनी ब्रीच हवाला देत सांगितलं, की पर्सनली आयडेंटिफिएबल इन्फॉर्मेशन (PII) एका कंटेंट डिलीवरी नेटवर्कच्या (CDN) माध्यमातून पब्लिक झाली असून गुगलने (Google) लाखो पब्लिक आणि प्रायवेट डॉक्युमेंट्सला इंडेक्स केलं आहे.

  हे वाचा - कोट्यवधी युजर्सला Google चा इशारा, Chrome Browser लगेच करा अपडेट अन्यथा...

  याबाबतची माहिती देणं कोणत्याही असुरक्षिततेची तक्रार करण्यासाठी नाही, तर लोकांना फसवणूक करणारे कॉल, कोविड-19 संबंधित ऑफरपासून सतर्क करणं, सावध करणं हा उद्देश असल्याचं राजशेखर राजहरिया यांनी एका फॉलोअप ट्विटमध्ये सांगितलं. डेटा लीक प्रकरण सरकारने फेटाळलं - केंद्राने डेटा लीकचं प्रकरण नाकारलं असून ते कोविनशी संबंधित नसल्याचं म्हटलं आहे. कथित लीक कोविनशी संबंधित नाही, कारण आम्ही युजरची कोणतीही माहिती जमा करत नसल्याचं सरकारने म्हटलं आहे. भारत सरकारने एक निवेदन जारी करुन कोविन पोर्टलवरुन कोणत्याही डेटाचं उल्लंघन झाल्याचं नाकारलं आहे.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Covid-19, Cyber crime, Tech news

  पुढील बातम्या