• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • लॉकडाऊनमध्ये Airtel कडून मोठी ऑफर, 100 रुपयांत मिळाणार 15 GB डेटा

लॉकडाऊनमध्ये Airtel कडून मोठी ऑफर, 100 रुपयांत मिळाणार 15 GB डेटा

कंपनीने Work from home करणाऱ्यांसाठी Add-On Plan आणला आहे. जो लॉकडाऊन काळात घरून काम करणाऱ्यांना आणि घरी असणाऱ्यांना वेबसिरीज पाहण्यासाठी फार कामी येणार आहे.

 • Share this:
  मुंबई, 11 एप्रिल : वाढणारा लॉकडाऊन लक्षात घेऊन भारतीय एअरटेल कंपनीने (Bharti Airtel) कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी खास दोन प्लान लॉन्च केले आहेत. jio ला टक्कर देण्यासाठी Airtel कंपनीने हे खास प्लान आणले आहेत. कंपनीने Work from home करणाऱ्यांसाठी Add-On Plan आणला आहे. जो लॉकडाऊन काळात घरून काम करणाऱ्यांना आणि घरी असणाऱ्यांना वेबसिरीज पाहण्यासाठी फार कामी येणार आहे. या Add-On Plan ची किंमत आहे 100 रुपये. यामध्ये ग्राहकांना 15 GB डेटाचा फायदा मिळणार आहे. हा प्लान पोस्टपेड ग्राहकांसाठी लॉन्च कऱण्यात आला आहे. ज्यामध्ये 100 रुपयासाठी 15 तर 200 रुपयांमध्ये 35 GB डेटा Airtel postpaide ग्राहकांना वापरता येणार आहे. आंध्र प्रदेश, दिल्ली आणि तमिळनाडू सर्कलसाठी पोस्टपेड प्लान 349 पासून सुरू होतात. ज्यामध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग, 5 GB डेटा रोलओवर आणि रोज 100 SMS सेवेचा लाभ मिळणार आहे. याशिवाय Zee5 आणि Airtel tv प्रिमियम अॅक्सिस देण्यात आलं आहे. बाकी Airtel postpaid साठी प्लान 499 रुपयांपासून सुरुवात होते. यामध्ये रोलओव्हर 75 GB डेटा अनलिमिटेड कॉलिंग, रोज 100 SMS सेवेचा लाभ मिळणार आहे. या प्लान सोबत अमेझॉन प्राईम, Zee5 आणि AirtelXtremeचं सब्सक्रिप्शन मिळणार आहे. हे वाचा-Work From Home साठी फायदेशीर ठरेल WhatsApp चं हे फिचर, काय आहे घ्या जाणून एअरटेनं म्हटलं की, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने लॉकडाउनची घोषणा केली. याला नागरिकांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. वाचण्याची आवड असलेल्या लोकांना त्यांच्या स्मार्टफोनमध्ये अॅप डाउनलोड करून जगरनॉट बुक्स फ्री मध्ये दिलं आहे. यावर उपलब्ध असलेल्या सर्व पुस्तकांचे आणि कादंबऱ्यांचे वाचन ग्राहकांना करता येईल. एअरटेलने 2017 मध्ये जगरनॉट बुक्स विकत घेतलं होतं. भारती एअरटेलचे प्रमुख प्रोडक्ट ऑफिसर आदर्श नायर यांनी सांगितलं की, अशा कठीण काळात एअरटेल आणि जगरनॉट यांनी जास्ती जास्त लोक यात गुंतून रहावेत यासाठी प्रयत्न केला आहे. कारण सध्या लोक सोशल डिस्टन्सिंग करत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा लोकं मागे पडत चाललेल्या वाचनसंस्कृतीकडे वळतील असा विश्वासही आदर्श नायर यांनी व्यक्त केला. हे वाचा-Vodafone-Idea ची ऑफर, इतरांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला मिळणार कॅशबॅक संपादन- क्रांती कानेटकर.
  Published by:Kranti Kanetkar
  First published: