तुमच्या कामाची बातमी! मोबाईल, लॅपटॉपचा सतत वापर करताय? या 7 गोष्टी ठरतील फायदेशीर

तुमच्या कामाची बातमी! मोबाईल, लॅपटॉपचा सतत वापर करताय? या 7 गोष्टी ठरतील फायदेशीर

कम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईल स्क्रिनवर अधिक काळ पाहणं डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकतं. स्क्रिन गॅजेट्स वापरताना डोळ्यांची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 11 जून: सध्याच्या काळात इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्स अतिशय फायद्याचे ठरत आहेत. मोबाईल फोन, लॅपटॉपचा तर सतत कित्येक तास वापर होत असतो. हे गॅजेट्स आपल्या जितके फायद्याचे, कामाचे आहेत, त्याहून अधिक ते आपल्या आरोग्यासाठी नुकसानकारक आहेत. कम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईल स्क्रिनवर अधिक काळ पाहणं डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकतं. स्क्रिन गॅजेट्स वापरताना डोळ्यांची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.

- मोबाईल, लॅपटॉपवर काम करताना डोळ्यांना थोड्या-थोड्या वेळाने आराम द्यावा. नजर स्क्रिनवरच टिकवून ठेऊ नये. काम करताना प्रत्येक तासाला 3 ते 5 मिनिटांसाठी डोळ्यांना आराम द्या.

- कम्प्युटर, लॅपटॉपवर काम करताना जवळपास एक मीटरचं अंतर ठेवा. स्क्रिन आणि डोळ्यांदरम्यान एका फूटाचं अंतर आवश्यक ठेवा.

- कम्प्युटर, लॅपटॉपची स्क्रिन Eye Level वर असावी. मान आणि कंबर अधिक वाकवून काम करू नये.

- स्क्रिनसमोर काम करताना डोळे मध्येच उघडझाप करावेत. यामुळे डोळ्यांमध्ये ड्रायनेस किंवा आय स्ट्रेनची समस्या येणार नाही. 15 ते 20 वेळा डोळे उघडझाप करावेत.

(वाचा - Alert! पब्लिक WiFi चा वापर करताना या गोष्टी लक्षात ठेवाच)

- जर चष्मा असेल, तर चष्मा लावूनच काम करा. तसंच वेळोवेळी नंबरही चेक करत राहा.

- डोळ्यात गुलाब पाणी किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने आय-ड्रॉप टाकू शकता. गुलाबपाणी कापसावर ठेवून तो कापूस डोळ्यांवर काही वेळ ठेऊ शकता.

(वाचा - पावसात तुमचा फोन, टॅब, लॅपटॉप कसा ठेवाल सुरक्षित, वाचा सोप्या Tips)

- डोळ्यांना आराम देण्यासाठी 20-20 गेम खेळा. यासाठी 20 मिनिटांपर्यंत स्क्रिनसमोर बसल्यानंतर 20 सेकंदासाठी तेथून नजर हटवा आणि स्वत:पासून 20 फूट दूर अंतरावर असलेल्या एखाद्या गोष्टीवर फोकस करा. डोळे जवळच्या गोष्टीवर फोकस करतात त्यावेळी त्यांना अधिक काम करावं लागतं. त्यामुळे काही वेळाने दूरच्या गोष्टीवरही फोकस करणं गरजेचं आहे.

Published by: Karishma Bhurke
First published: June 11, 2021, 11:30 AM IST

ताज्या बातम्या