जुना मोबाइल विकायचा प्लॅन आहे? असं न करता CCTV कॅमेरा म्हणून करा वापर, वाचा सविस्तर

जुना मोबाइल विकायचा प्लॅन आहे? असं न करता CCTV कॅमेरा म्हणून करा वापर, वाचा सविस्तर

तुमच्याजवळ तुमचा एखादा जुना फोन (old phone) असेल तर तो नक्कीच घरात कुठेतरी धुळ खात पडला असेल. तुम्ही या फोनचा चांगला वापर करू शकता. हा फोन तुम्ही सिक्युरिटी कॅमेरा म्हणून वापरू शकता.

  • Share this:

नवी दिल्ली, 20 जून: तुमच्याजवळ तुमचा एखादा जुना फोन (old phone) असेल तर तो नक्कीच घरात कुठेतरी धुळ खात पडला असेल. तुम्ही या फोनचा चांगला वापर करू शकता. हा फोन तुम्ही सिक्युरिटी कॅमेरा म्हणून वापरू शकता. हा फोन तुमच्या घराला सुरक्षित ठेवेल. तसेच तुम्ही फोनला बेबी मॉनिटरप्रमाणे (baby monitor) वापरू शकता. शिवाय तुम्ही फोनला मेकशिफ्ट गूगल होम स्पिकर (make shift google home speaker) म्हणूनही वापरू शकता. फोन वापरात आणण्याचे हे काही चांगले पर्याय आहेत. मात्र सगळ्यात चांगला पर्याय आहे तो होम सिक्युरिटी कॅमेरा (home security camera) म्हणून वापर करण्याचा. याबाबत डिजीट इनने वृत्त दिलंय.

सिक्युरिटी कॅमेरा म्हणून फोनचा वापर करण्यासाठी तुम्हाला एक सिक्युरिटी कॅमेरा अॅप डाउनलोड करावं लागेल. बऱ्याच अॅपमध्ये एकसारखे फीचर्स आढळतात. यामध्ये लोकल स्ट्रीमिंग, क्लाउड स्ट्रीमिंग, रेकॉर्डिंग तसेच फुटेज रिमोटली किंवा लोकली स्टोर करण्याच्या सुविधाही मिळतात. याशिवाय मोशन डिटेक्शन आणि अलर्टही मिळतात.

हे वाचा-क्या बात है! आता WhatsApp चॅटिंग होणार अजूनच भन्नाट; लवकरच येणार हे 5 नवे फीचर्स

एकदा सेटअप झाला की तुम्ही घरी लावलेल्या या सिक्युरिटी कॅमेऱ्याला इतरत्र कुठूनही कंट्रोल करू शकता. तुम्ही तुमच्या फोनला एक  सिक्युरिटी कॅमेरा अर्थात अल्फ्रेड स्वरुपात वापरता येईल. हा एक क्रॉस प्लॅटफॉर्म आहे. त्यामुळे तुमचा फोन अँड्रॉइड आहे की iOSआधारीत आयफोन आहे, हे महत्वाचं नसतं. तुम्ही तुमच्या नव्या फोनचाही असा वापर करू शकता.

अल्फ्रेड अॅप फ्री आहे आणि ते तुम्हाला लाइव्ह फीडचं रिमोट व्ह्यू दाखवतं. त्याशिवाय मोशन डिटेक्शनही मिळते आणि अलर्ट्स देखील येतात. तुम्हाला फ्री क्लाऊड स्टोरेज मिळते. तसेच अल्फ्रेड अॅप तुम्हाला फ्रंट आणि रिअर कॅमेरा दोन्हीच्या माध्यमातून माहिती देते त्यामुळे टू-वे ऑडिओ फीडदेखील मिळते.

नेमकं काय कराल?

-सर्वात आधी तुम्हाला अँड्रॉइड किंवा iOS स्टोरेज वर जाऊन अल्फ्रेड अॅपला तुमच्या नव्या आणि जुन्या दोन्ही फोनमध्ये डाउनलोड करावं लागेल. तुम्ही यासाठी टॅबलेट देखील वापरू शकता.

हे वाचा-WhatsApp चॅट डिलीट करण्याची गरज नाही; असे Hide करा तुमचे सिक्रेट मेसेज

-त्यानंतर तुम्हाला स्टार्ट बटन दिसेल. त्यावर क्लिक करून पुढे गेल्यास तुम्हाला व्यूवर ऑप्शन दिसेल. ते सिलेक्ट करा आणि पुढे जा.

-आता हे अॅप तुम्हाला साइन-इन करायला सांगेल. तुम्ही तुमच्या गूगल अकाउंटने इथे साइन-इन करू शकता.

-तुम्हाला तुमच्या जुन्या फोनमध्येही हीच प्रोसेस करावी लागेल. मात्र, या फोनमध्ये तुम्हाला व्यूवर ऐवजी कॅमेरा सिलेक्ट करावा लागेल. त्यानंतर तुम्ही दोन्ही फोनमध्ये एकाच गूगल अकाउंटवरून साइन-इन केलंय की नाही हे एकदा तपासून घ्या.

-अशाप्रकारे तुमचा सेटअप पूर्ण झाला आहे. आता तुम्ही तुमचा जुना फोन घरात योग्य ठिकाणी ठेवा. ही प्रोसेस पूर्ण केल्यानंतर तुमचा फोन सिक्युरिटी कॅमेऱ्या प्रमाणे तुम्हाला सर्व माहिती पुरवेल.

Published by: Janhavi Bhatkar
First published: June 20, 2021, 10:52 PM IST

ताज्या बातम्या