मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /CAIT कडून Amazon चा कठोर निषेध; कंपनी देशाची फसवणूक करत असल्याचा केला दावा

CAIT कडून Amazon चा कठोर निषेध; कंपनी देशाची फसवणूक करत असल्याचा केला दावा

अ‍ॅमेझॉनच्या (Amazon) वक्तव्याचा आणि 'माय वे ऑर हाय वे' या प्रवृत्तीचा कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (CAIT) कडाडून निषेध केला आहे.

अ‍ॅमेझॉनच्या (Amazon) वक्तव्याचा आणि 'माय वे ऑर हाय वे' या प्रवृत्तीचा कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (CAIT) कडाडून निषेध केला आहे.

अ‍ॅमेझॉनच्या (Amazon) वक्तव्याचा आणि 'माय वे ऑर हाय वे' या प्रवृत्तीचा कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (CAIT) कडाडून निषेध केला आहे.

  नवी दिल्ली, 15 डिसेंबर : उद्योग व्यवहारांना मान्यता देणाऱ्या सीसीआय (CCI) या वैधानिक प्राधिकरणाला अ‍ॅमेझॉन (Amazon) आणि फ्युचर कूपन प्रा. लिमिटेड (Future Coupons Private Limited) यांच्यातील व्यवहाराला दिलेली मान्यता रद्द करण्याचा अधिकार नाही, असं ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉनने म्हटलं आहे. अ‍ॅमेझॉनच्या (Amazon) या वक्तव्याचा आणि 'माय वे ऑर हाय वे' या प्रवृत्तीचा कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (CAIT) कडाडून निषेध केला आहे.

  2019 मध्ये, सीसीआयने अ‍ॅमेझॉनच्या फ्युचर कूपन प्रा. लिमिटेडमधील 200 दशलक्ष डॉलर्सच्या गुंतवणुकीला मान्यता दिली होती. मात्र या व्यवहाराला दिलेली मान्यता रद्द करण्याचा अधिकार सीसीआयला नाही, कारण भारतीय कायद्यात (Indian Law) स्पष्टपणे प्रदान केल्याशिवाय सीसीआयला असा अधिकार प्राप्त होत नाही असं अ‍ॅमेझॉननं म्हटले असल्याचं वृत्त रॉयटर्सच्या हवाल्याने माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालं आहे. त्यावर कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने एक सविस्तर प्रसिद्धीपत्रक जारी करून अ‍ॅमेझॉनवर जोरदार टीका केली आहे.

  या प्रकरणाबाबत सीसीआय समोर होणारी सुनावणी (Trial) चुकवण्यासाठी अ‍ॅमेझॉननं हा पवित्रा घेतला असल्याचं कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने यात नमूद केले आहे. या प्रकरणी अगदी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) नुकत्याच झालेल्या सुनावणी दरम्यान किंवा अन्य न्यायालयात झालेल्या विविध सुनावण्यादरम्यानही अ‍ॅमेझॉननं असा कोणताही युक्तिवाद केलेला नव्हता, असं संघटनेनं म्हटलं आहे.

  22रुपयांचा हा शेअर एका वर्षात झाला 354रुपये,1 लाखाचे झाले 16 लाखांहून अधिक रुपये

  अ‍ॅमेझॉनने सीसीआयची फसवणूक केली असल्याचं अ‍ॅमेझॉनच्या अंतर्गत रेकॉर्डवरूनच स्पष्ट होत असून, 2019 मध्ये सीसीआयकडून फसवणूक करून या व्यवहाराला मान्यता मिळवली आहे, याबाबतचे सगळे युक्तीवाद कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स पारदर्शकपणे समोर आणत आहे, असं संघटनेनं या पत्रकात नमूद केले आहे.

  कंपनीनं या व्यवहाराबाबत अमेरिकेतील परवानगी देणाऱ्या अधिकृत संस्थेसमोर मांडलेला प्रस्ताव आणि सीसीआयसमोर मांडलेला प्रस्ताव यात तफावत असल्याचं दाखवणारे मुद्दे संघटनेनं या पत्रकात नमूद केले आहेत. अमेरिकी प्राधिकरणाकडे मांडलेल्या प्रस्तावात भारतीय गुंतवणूक कायद्यानुसार फ्युचर रिटेलमध्ये (FRL) गुंतवणूक करण्यासाठी ट्वीन एन्टीटी इन्व्हेस्टमेंट पद्धत वापरणार असल्याचं म्हटलं आहे.

  काय सांगता! 99,999 रुपयांना विकला एक किलो चहा, कारण ऐकून व्हाल थक्क

  मात्र फ्युचर कूपन प्रा. लिमिटेडमध्ये (FCPL) नव्हे तर फक्त फ्युचर रिटेलमध्ये 1431 कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे. ही फसवणूक असून यामुळे अ‍ॅमेझॉनची दुटप्पी भूमिका स्पष्ट होत असल्याचा दावा कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने केला आहे. भारतीय कायद्याचा वापर अ‍ॅमेझॉन आपल्यासाठी वेगळ्या पद्धतीने करत आहे, अ‍ॅमेझॉनची बनवेगिरी भारतीयांसमोर आणण्याचा हा प्रयत्न आहे, असं कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स संघटनेनं स्पष्ट केलं आहे.

  First published: