Honor 8X वर्सेस Samsung M20: आपण कोणता स्मार्टफोन विकत घ्यावा?

Honor 8X वर्सेस Samsung M20: आपण कोणता स्मार्टफोन विकत घ्यावा?

Honor 8X चे ग्लास बॉडी व्हिज्युअल ग्रेटिंग इफेक्ट असे आहेत की तुम्हाला ते विकत घेण्यासाठी खूपच खर्चिक वाटेल, पण असे नाही आहे.

  • Share this:

जर आपण विचार करत असाल तर बजेट मध्ये चांगल्या-गुणवत्तेचे स्मार्टफोन अगदीच समान्य प्रमाणात उपलब्ध आहेत. परंतु, ते एकसारखे तयार केलेले नाही. भारतीय ग्राहक आता काही मोजके अपवाद वगळता स्वस्त दरात काही आगळ्या वेगळ्या वैशिष्ट्यांसह स्मार्टफोन खरेदी करण्यास प्राधान्य देतात. Honor 8X आणि Samsung M20 यांच्या तांत्रिक जगात यांच्यातील वैशिष्ट्यांवरून प्रचंड कमाल केली आहे, जी कदाचित सध्याच्या किंमतीच्या दृष्टीने बाजाराला आवश्यक आहे.

हे फोन एकमेकांच्या तुलनेत कसे काम करतात हे जाणून घ्यायचे असल्यास, पहा....

Honor 8X चे ग्लास बॉडी व्हिज्युअल ग्रेटिंग इफेक्ट असे आहेत की तुम्हाला ते विकत घेण्यासाठी खूपच खर्चिक वाटेल, पण असे नाही आहे. या फोन ची मॅट-फिनिश एलुमिनियमच्या बाजू, विशेषत: उजव्या बोर्डरवरील ऑनर फ्लॅगशिप फोनचा अनोखा नमुना प्रभाव फोनला एक वेगळीच चमक देतो. Samsung M20 मागील पॅनेल हा प्लास्टिकचा आहे, जे बर्‍याच वापरकर्त्यांना आवाहन करणारा वाटू शकेल किंवा नाही. याचा इन्फिनिटी- व्ही डिस्प्ले कौतुकास्पद आहे परंतु ऑनर 8 एक्स चे बिना काठे चे डिझाइन हे कमी आकर्षक नाही. यापेक्षा Honor 8X आपल्या वाइब्रन्ट आणि शार्प प्रदर्शनामुळे अधिक हवासा वाटणारा आहे, ज्यामुळे तो M20 पेक्षा अधिक अत्याधुनिक दिसतो.

डिसप्ले/ प्रदर्शन

Samsung M20 मधील 1080 x 2340 पिक्सेल रिजोल्यूशनसह 16 cm (6.3 इंच) फुल एचडी डिस्प्लेच्या लहान प्रदर्शनाच्या तुलनेत स्क्रीन विभागात Honor 8X अधिक उच्च आहे कारण त्यात 16.51 cm (6.5-इंचाचा) पूर्ण एचडी रेझोल्यूशन 1080 x 2340 पिक्सल आहे. म्हणून गेम आणि स्ट्रीम व्हिडिओ प्ले करण्यासाठी ऑनर 8 एक्स आपला परिपूर्ण स्मार्टफोन बनला आहे. हे दोन्ही स्मार्टफोन फिंगरप्रिंट स्कॅनरसह आले आहेत परंतु Honor 8X चा एक वेगवान आणि छान फेस अनलॉक आहे, जो एक प्लस पॉइंट आहे.

परफॉर्मन्स

दोन्ही स्मार्टफोन अँड्रॉईड 8.1 (ओरियो) OS ससह आले आहेत, जे अँड्रॉइड वरुन अँड्रॉइड 9 (Pie) वर अपग्रेड करण्यायोग्य आहे. Honor 8X हाइसिलिकॉन किरीन 710 एसओसी चिपसेट Octa-core 2.2 GHZ 12 NM कॉर्टेक्स A73 जनरेशन बेस्ड SOC सह येतो आणि 4 GB / 6 GB RAM आणि 64 GB / 128 GB अंतर्गत स्टोरेजसह उपलब्ध आहे. तर, Samsung M20 1.8 GHZ octa-core एक्सिनोस 7904 प्रोसेसर मध्ये येतो आणि 3 GB रॅम आणि 32 GB इंटरनल मेमरीसह उपलब्ध आहे.

याव्यतिरिक्त Honor 8 X जीपीयू टर्बो 3.0 सह आहे, जे आपल्याला उत्कृष्ट कार्यप्रदर्शन, अखंड गेमिंग अनुभव आणि उत्कृष्ट बॅटरी व्यवस्थापन देईल. आम्ही दोन्ही फोनवर PUBG, FIFA Mobile आणि Asphalt9 देखील चे प्रयोग करून पहिले आहे आणि म्हणूनच आम्ही म्हणू शकतो की गेमिंगमध्ये प्रवेश करण्यासाठी Honor 8X निवड ही नक्कीच योग्य ठरेल. थोडक्यात, कामगिरीची बातमी येते तेव्हा Samsung M20 पेक्षा गेममध्ये Honor 8X पुढे आहे.

कॅमेरा

Honor 8X कडे स्मार्टफोनच्या हुवेई श्रेणीतील सर्वोत्कृष्ट कॅमेरा आहे. याचा ड्युअल रियर 20 MP / 2 MP कॅमेर्‍याने सुसज्ज, एआय मोड आणि वाइड अपर्चर / छिद्र पूर्ण वापरात आणला जातो, जो वापरकर्त्यांना जवळजवळ एक परिपूर्ण नाईट शॉट देतो. कोणतेही 4K शूटिंग उपलब्ध नसले तरीही स्वच्छ आणि तीक्ष्ण फोटो आणि व्हिडिओ कॅप्चर करण्यासाठी याचा कॅमेरा परिपूर्ण आहे. Honor त्यांच्या सेल्फी कॅमेर्‍यावर खूप जोर देत असल्याने हे बरेचदा अपवादात्मक रित्या चांगला ठरतो. Honor 8X 16MP सेल्फी कॅमेर्‍याने सुसज्ज आहे ज्याने ऑटोफोकस आणि कीचकट श्रेणी सुधारित केली आहे. हा फोन इतका स्वस्त असूनही, तो कॅमेराच्या अधिक चांगल्या वैशिष्ट्यासह येतो.

Honor 8X च्या कॅमेऱ्याच्या वैशिष्ट्यांच्या तुलनेत, सॅमसंग एम20 इतका महत्त्वपूर्ण नाही. हा ड्युअल लेन्स रियर कॅमेरा, एफ / 1.9 अपर्चरसह 13 एमपी प्राइमरी सेन्सर आणि एफ / 2.2 अपर्चरसह 5 MP दुय्यम सेन्सर सहित येतो. यात 120-डिग्री अल्ट्रा-वाइड एंगल लेन्स देखील आहेत. 8 एमचा सेल्फी कॅमेरा तपशील अचूकपणे कॅप्चर करत नाही आणि बर्‍याच गोष्टींमध्ये चुकतो. आपण जर कॅमेरासाठी स्मार्टफोन विकत घेत असाल तर ऑनर 8 एक्सची निवड करणेच चांगले आहे.

बॅटरी

ऑनर 8 एक्स मध्ये 3,750mAh बॅटरी आहे आणि सॅमसंग एम20 ची 4,000mAh बॅटरी आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ऑनर 8 एक्सने 4,000mAh च्या तुलनेत तितकेच चांगले प्रदर्शन केले आहे. आम्ही म्हणू शकतो की ऑनर च्या अनुकूल ओएस EMUI 9.1 आणि GPU 3.0 मुळेच, बॅटरीचे उत्कृष्ट व्यवस्थापन होते. म्हणूनच, जर आपल्याला अंकांनुसार जायचे असेल तर सॅमसंग एम 20 उत्कृष्ट ठरेल,  परंतु वास्तविक कार्याच्या बाबतीत आम्हाला दोन्ही समान दिसतात.

किंमती

उत्सवाच्या विक्री दरम्यान, ऑनर 8 एक्स हा 4 64जीबी साठी रुपये 9,999 आणि 6 64जीबी साठी रुपये 10,999 इतका तर 6 128 जीबीसाठी रुपये 11,999 अशा वेगवेगळ्या किंमती मध्ये उपलब्ध असेल आणि सॅमसंग एम 20  4जीबी साठी रुपये 9,990 वर उपलब्ध असेल.

अंतिम फेरी/ अंतिम निर्णय

सध्या, सॅमसंग एम20 आणि ऑनर 8 एक्स 4 जीबी च्या किंमती समान आहेत. सॅमसंग एम 20 मध्ये विलक्षण पॅकेजेस नाहीत पण ऑनर 8 एक्स हा उत्कृष्ट कॅमेरा, रचना आणि कार्यक्षमतेची आश्वासने देतो. ऑनर 8 एक्स केवळ दिसायलाच चांगला नाही, तर त्याची किंमतही आपल्याला एक चांगला अनुभव देते. हा विविध वैशिष्ट्यांसहित एक सुंदर फोन आहे, जो चुकवणे अशक्य आहे. थोडक्यात, ऑनर 8 एक्स निश्चितच आपल्या पैशांची सर्वोत्कृष्ट वसूली करेल. हा फोन Amazon वर खरेदी करता येईल.

First published: September 26, 2019, 9:33 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading