नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी: आता कार चालकांची पेट्रोल-डिझेलच्या
(Petrol-Diesel Price Hike) वाढत्या किमतीपासून सुटका होऊ शकते. एक अधिसूचना जारी करत केंद्र सरकारने भारत स्टेज -
BS-6 वाहनांमध्ये सीएनजी
(CNG) आणि एलपीजी
(LPG) किट बसवण्यास मान्यता दिली आहे. त्याशिवाय 3.5 टनहून कमी वजनाच्या डिझेल इंजिनांना CNG/LPG इंजिनने बदलण्याची परवानगीही देण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने
(Union Ministry of Road Transport) याबाबत एक प्रस्ताव भारत सरकारकडे पाठवला आहे. आतापर्यंत BS-6 उत्सर्जन नियमांनुसार मोटार वाहनांमध्ये सीएनजी आणि एलपीजी किटचे रेट्रोल फिटमेंट करण्याची परवानगी नव्हती.
नोटिफिकेशननुसार, सीएनजी किटने रेट्रोफिट केलेल्या वाहनांचं अप्रुवल 3 वर्षांसाठी वॅलिड असेल. ते पुन्हा 3 वर्षात रिन्यू केलं जाईल. हे किट कोणत्याही वाहनांत स्पेसिफाइड लिमिटनुसार लावलं जाईल. 1500cc पर्यतच्या वाहनांसाठी ±7% आणि 1500cc हून अधिकच्या वाहनांसाठी ±5% च्या क्षमतेच्या मर्यादेमध्ये रेट्रोफिटमेंट उपयुक्त मानलं जाईल. त्याशिवाय CNG वाहन किंवा किट कंपोनेंट्स दिलेल्या सुरक्षा तपासण्याचं पालन करणं आवश्यक आहे.
कारमध्ये लावण्यात येणारे सर्व सीएनजी किट योग्य नसतात. अशात तुमच्या कारमध्ये कोणतंही सीएनजी किट लावण्याआधी त्याची पडताळणी करा. लोकल वेंडरकडून किट लावणं टाळा. एखाद्या ऑथराइज्ड डीलरकडूनच किट लावणं फायद्याचं ठरतं. खराब क्वालिटी किट आणि चुकीच्या सीएनजी फिटिंगमुळे आग लागण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.
दुसऱ्या एका निर्णयात मंत्रालयाने लांब पल्ल्याच्या बसेस आणि स्कूल बसेसमध्ये फायर अलार्म आणि सप्रेशन सिस्टम बसवण्याचं बंधनकारक केलं आहे. प्रवासी बसेस आणि स्कूल बसेसमध्ये ज्याठिकाणी लोक बसतात त्या भागात आग प्रतिबंधक यंत्रणा बसवावी लागेल असं निवेदनात म्हटलं आहे. 27 जानेवारी रोजी याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.