काळजी घ्या! दररोज किती वेळ सोशल मीडियावर घालवता? होऊ शकतो गंभीर आजार

काळजी घ्या! दररोज किती वेळ सोशल मीडियावर घालवता? होऊ शकतो गंभीर आजार

दिवसातील किती वेळ तुम्ही सोशल मीडियावर घालवता हे तपासून घ्या. जास्त वेळ सोशल मीडियावर जात असेल तर ते आरोग्यासाठी घातक आहे.

  • Share this:

मुंबई, 11 ऑक्टोबर : इंटरनेटच्या शोधानंतर सोशल मीडिया साइटने मोठी क्रांती झाली. सध्या दिवसातील बराच वेळ लोक सोशल मीडियावर घालवतात. काही लोकांना तर आपण किती वेळ सोशल मीडियावर घालवतो हेसुद्धा ध्यानात येत नाही. यात फोटो, व्हिडिओ शेअर करण्यापासून ते लाइक आणि कमेंट करून अनेकजण अॅक्टीव्ह राहण्याचा प्रयत्न करत असतात. आता सोशल मीडियाबद्दल एक धक्कादायक रिपोर्ट समोर आला आहे.

दररोज दोन तासांपेक्षा जास्त वेळ सोशल मीडियाचा वापर करत असाल तर तुम्हाला गंभीर मानसिक आजार होण्याची शक्यता वाढते असं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. यानुसार व्हॉटसअॅप, फेसबुक इतकंच नाही तर टिकटॉकच्या वापरानेही लोक मनोरुग्ण होण्याची शक्यता आहे असं म्हटलंय.

डॉक्टरांचंही असं म्हणणं आहे की, वेब सिरीज, गेमिंगशिवाय इतर सोशल मीडिया अॅप्लिकेशन्स युजर्सना रुग्ण बनवत आहेत. तसेच लोकांमध्ये आक्रमकता, विसरण्याचे आजार दिसत आहेत. यामध्ये 14 ते 24 वर्षे वयाचे युजर जास्त बळी पडत आहेत.

संशोधकांचे म्हणणे आहे की, सोशल मीडियावर लाइक, कमेंट न आल्यानं लोकांवर त्याचा परिणाम होतो. याशिवाय युजर्सवर त्याचा भार पडतो. मानसिक आरोग्य दिनानिमित्त वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनकडून मानसिक आरोग्य आणि आत्महत्या प्रतिबंधक कार्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं. दरवर्षी जवळपास 8 लाख लोक आत्महत्या करतात.

महिन्याभरापूर्वी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये पबजी खेळणाऱ्या एका तरुणाची मानसिक स्थिती बिघडल्याचं दिसत होतं. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतरही तो पबजी गेमबद्दलच बडबडत होता.

VIDEO : भरधाव टेम्पोला मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण आग

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 12, 2019 02:57 PM IST

ताज्या बातम्या