मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Airtel टक्कर देण्यासाठी Jio चे 4 धमाकेदार प्लॅन, 740 GB डेटासह भन्नाट ऑफर्स

Airtel टक्कर देण्यासाठी Jio चे 4 धमाकेदार प्लॅन, 740 GB डेटासह भन्नाट ऑफर्स

1 GB ते 2 GB पर्यंत jio ने खास वेगवेगळे प्लॅन लाँच केले आहेत. 365 ते 360 दिवसांपर्यंत याची वैधता असणार आहे. यामध्ये कोणत्या ऑफर्स मिळणार आहेत जाणून घ्या.

1 GB ते 2 GB पर्यंत jio ने खास वेगवेगळे प्लॅन लाँच केले आहेत. 365 ते 360 दिवसांपर्यंत याची वैधता असणार आहे. यामध्ये कोणत्या ऑफर्स मिळणार आहेत जाणून घ्या.

1 GB ते 2 GB पर्यंत jio ने खास वेगवेगळे प्लॅन लाँच केले आहेत. 365 ते 360 दिवसांपर्यंत याची वैधता असणार आहे. यामध्ये कोणत्या ऑफर्स मिळणार आहेत जाणून घ्या.

मुंबई, 25 डिसेंबर : Airtel आणि वोडाफोनला टक्कर देण्यासाठी Jio कायमच सातत्यानं खास ऑफर्स लाँच करत असतं. वर्क फ्रॉम होम आणि कोरोना काळात जिओच्या अॅड ऑन पॅकमुळे खूप फायदा झाला ग्राहकांना होत आहे. दर महिन्याला रिचार्ज करण्याची कटकट आता जिओने घालवली आहे. 1 GB ते 2 GB पर्यंत jio ने खास वेगवेगळे प्लॅन लाँच केले आहेत. 365 ते 360 दिवसांपर्यंत याची वैधता असणार आहे. यामध्ये कोणत्या ऑफर्स मिळणार आहेत जाणून घ्या.

Jio plan 2599

या प्लॅनमध्ये ग्राहकांना जिओ ते जिओ अनलिमिटेड कॉलिंग मिळणार आहे. जिओ ते इतर नेटवर्कसाठी 12000 मिनिटं तर दर दिवसाला 2 GB डेटा मिळणार आहे. याशिवाय 10 GB डेटा ज्यादा मिळणार आहे. डिझनी आणि हॉटस्टार देखिल मिळणार आहे. 100 SMS आणि 365 दिवस या प्लॅनची वैधता असणार आहे. या प्लॅनमध्ये एकूण 740 GB डेटा मिळणार आहे.

Jio plan 2399

या प्लॅनमध्ये ग्राहकांना जिओ ते जिओ अनलिमिटेड कॉलिंग मिळणार आहे. जिओ ते इतर नेटवर्कसाठी 12000 मिनिटं तर दर दिवसाला 2 GB डेटा मिळणार आहे. या प्लॅनमध्ये एकूण 730GB डेटा मिळणार आहे. 100 SMS आणि 365 दिवस या प्लॅनची वैधता असणार आहे.

हे वाचा-ख्रिसमसच्या शुभेच्छा पाठवण्यासाठी Whatsapp वर वेगळी स्टिकर्स

Jio plan 2121

या प्लॅनची वैधता 336 दिवसांची असणार आहे. जिओ ते जिओ अनलिमिटेड कॉलिंग तर इतर नेटवर्कसाठी 12000 मिनिटं मिळणार आहेत. दर दिवशी 1.5 GB डेटासह 336 दिवसांसाठी 504 GB डेटा मिळणार आहे.

Jio plan 4999

या प्लॅनची वैधता 360 दिवस असणार आहे. ज्यामध्ये 350 GB एकूण डेटा मिळणार आहे. जिओ ते जिओ अनलिमिटेड कॉलिंगसह इतर नेटवर्कसाठीी 12000 मिनिटं मिळणार आहेत.

First published:

Tags: Reliance Jio, Reliance Jio Internet