मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

15 सेकंदाचा व्हिडीओ पोस्ट करून मिळवा 1 कोटी जिंकण्याची संधी! लगेच डाऊनलोड करा ‘हे’ अ‍ॅप

15 सेकंदाचा व्हिडीओ पोस्ट करून मिळवा 1 कोटी जिंकण्याची संधी! लगेच डाऊनलोड करा ‘हे’ अ‍ॅप

TikTokला टक्कर देतय हे अ‍ॅप. 15 ते 60 सेकंदांचा व्हिडीओ करा अपलोड आणि मिळवा 1 कोटींचे बक्षीस.

TikTokला टक्कर देतय हे अ‍ॅप. 15 ते 60 सेकंदांचा व्हिडीओ करा अपलोड आणि मिळवा 1 कोटींचे बक्षीस.

TikTokला टक्कर देतय हे अ‍ॅप. 15 ते 60 सेकंदांचा व्हिडीओ करा अपलोड आणि मिळवा 1 कोटींचे बक्षीस.

    नवी दिल्ली, 20 जुलै : भारतात टिकटॉक (TikTok) बॅन झाल्यानंतर सध्या शॉर्ट व्हिडीओ चिंगारीला (Chingari) चांगला प्रतिसाद मिळत आहे. TikTok बॅन झाल्यानंतर Chingari अ‍ॅप प्रत्येक तासाला तब्बल 1 लाख लोकं डाऊनलोड करत आहे. खूप कमी वेळात चिंगारी हे अ‍ॅप चाहत्यांच्या पसंतीसही उतरत आहे. आतापर्यंत एक कोटीहून जास्त लोकांनी हे अ‍ॅप डाऊनलोडही केले आहे. आता या कंपनीने आपल्या युझरसाठी एका स्पर्धेचे आयोजन केले आहे. याचे नाव आहे चिंगारी स्टार्स(Chingari Stars: Talent Ka Mahasangram) चिंगारी स्टार्स हा स्पर्धेतील विजेत्याला तब्बल एक कोटींचे बक्षीस देण्यात येणार आहे. तर, देशातील प्रत्येक राज्यातून 5 बेस्ट कंटेट क्रिऐटर निवडले जातील. त्यांना प्रत्येकी 5 लाख रुपये मिळणार आहेत. ही स्पर्धा राज्य आणि देशस्तरावर आयोजित केली जाणार आहे. मुख्य म्हणजे ही स्पर्धा ऑनलाइन असणार आहे, त्यामुळे स्पर्धकांना कोठेही जाण्याची गरज नाही. या स्पर्धेत डान्स, गाणं, अभिनय, मिमिक्री, कॉमेडी आणि इनोव्हेशन अशा कॅटेगिरी आहेत. या कॅटेगिरीमध्ये व्हिडीओ तुम्ही अपलोड करू शकता. Chingari अ‍ॅपचे सह-संस्थापक सुमित घोष यांच्या म्हणण्यानुसार, देशातील लोकांच्या कौशल्याला चालना देणं हे उद्देश असल्याचे सांगितले आहे. वाचा-Gmail, Amazon सारखे 377 अ‍ॅप हॅक, पासवर्ड, क्रेडिट कार्डची माहितीची चोरी असा घ्या स्पर्धेत भाग या स्पर्धेत भाग घेण्यासाठी 15 ते 60 सेकंदांचा व्हिडीओ अपलोड करावा लागणार आहे. कंपनीच्या मते, शोमध्ये भाग घेणार्‍या प्रत्येक स्पर्धेकाला 15-60 सेकंदाचा व्हिडिओ अपलोड करावा लागेल. यानंतर, त्याच्या टॅलेंटनुसार शॉर्ट-लिस्ट केले जातील. चिंगारी अ‍ॅपमध्येच यासाठी स्पर्धकांमध्ये थेट मतदान होईल. यानंतर, जिंकणाऱ्या स्पर्धकाला Chingari Stars: Talent Ka Mahasangram चा किताब आणि 1 कोटी रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. वाचा-WhatsApp हॅक होण्यापासून वाचवायचे आहे? मग लगेच करा Settings मध्ये 'हे' बदल कराव्या लागतील या 5 गोष्टी 1. या शोमध्ये भाग घेण्यासाठी प्रथम आपल्या मोबाइल फोनवर चिंगारी अ‍ॅप डाउनलोड करा 2. या प्लॅटफॉर्मवर आपले प्रोफाइल तयार करा. यानंतर, आपली श्रेणी निवडा. 3. आता आपले कोणतेही 15 ते 60 सेकंदाचे व्हिडीओ अपलोड करा. 4. यानंतर, आपल्याला व्हिडीओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. तुमच्याही मित्रांनाही हे अ‍ॅप डाउनलोड करण्यास सांगा. 5. व्हिडीओवर वोट करण्यासाठी तुमचे मित्र त्यावर लाइक करतील. त्यानंतर यातील स्पर्धेक शॉर्टलिस्ट केले जातील. या स्पर्धेबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी https://chingari.io/star या वेबसाइटवर क्लिक करा. वाचा-आता मीटिंगमध्ये मिळणार 3D अनुभव! जाणून घ्या JioGlass चे खास फिचर्स
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Tiktok, Tiktok star

    पुढील बातम्या