• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • Facebook च्या माध्यमातून मुस्लिमांना target करतायेत Chinese hackers; फेसबुकने केलं ब्लॉक

Facebook च्या माध्यमातून मुस्लिमांना target करतायेत Chinese hackers; फेसबुकने केलं ब्लॉक

हॅकर्स फेसबुकद्वारे परदेशात राहणाऱ्या उइग मुस्लिमांना टार्गेट करत होते. त्यांना लिंकद्वारे मालवेअर पाठवला जात होता. त्यानंतर त्यांचं डिव्हाईस इनफेक्ट होत होतं आणि त्यांच्यावर नजर ठेवली जात होती.

 • Share this:
  नवी दिल्ली, 26 मार्च : फेसबुकवर (Facebook) हॅकर्स उइगर मुस्लिमांना निशाणा करत असल्याची बाब समोर आली आहे. फेसबुकने याबाबत माहिती दिली असून कंपनीने अनेक हॅकर्स ग्रुप्सला ब्लॉक केलं आहे. हे हॅकर्स फेसबुकद्वारे परदेशात राहणाऱ्या उइग मुस्लिमांना टार्गेट करत होते. त्यांना लिंकद्वारे मालवेअर पाठवला जात होता. त्यानंतर त्यांचं डिव्हाईस इनफेक्ट होत होतं आणि त्यांच्यावर नजर ठेवली जात होती. सोशल मीडिया कंपनी फेसबुकने दिलेल्या माहितीनुसार, सिक्योरिटी इंडस्ट्रीमध्ये या हॅकर्स ग्रुपला Earth Empusa किंवा Evil Eye अशा नावाने ओळखलं जातं. हे हॅकर्स अ‍ॅक्टिव्हिस्ट, जर्नलिस्ट आणि चीनमध्ये शोषित असणाऱ्या मुस्लिम धर्माच्या उइगर यांना निशाणा करत होते. यापैकी अधिकतर शिंजियांग प्रांतातील रहिवासी आहेत. यात सर्वाधिक बाहेरील देश तुर्की, कजाकिस्तान, संयुक्त राज्य अमेरिका, सीरिया, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडात राहणारे आहेत. आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, हे हॅकर्स या सोशल मीडियाचा वापर करुन थेट मालवेअर न पसरवता, malicious वेबसाईटची लिंक शेअर करत होते. या हॅकर्सकडे चांगले रिसोर्स आणि या ऑपरेशनची समज होती, अशी माहिती फेसबुकने दिली आहे. तसंच यामागे कोणाचा हात आहे, हेदेखील शोधण्याचा फेसबुकचा प्रयत्न सुरू आहे.

  (वाचा - Google लाही चकमा देतात हे Apps; ऑनलाईन ट्रान्झेक्शन्सवेळी बसू शकतो मोठा फटका)

  हे हॅकर्स फेसबुकवर स्वत:ला पत्रकार, विद्यार्थी, ह्यूमन राईट्स अ‍ॅक्टिव्हिस्ट, वकील असल्याचं तसंच या उइगर कम्युनिटीचे मेंबर असल्याचं सांगत होते. हॅकर्स आपल्या टार्गेटला विश्वासात घेऊन, त्यानंतर त्यांच्याशी धोकादायक वेबसाईटची लिंक शेअर करुन त्यावर क्लिक करण्यसाठी सांगत होते. धोकादायक वेबसाईटला हॅकर्सने प्रसिद्ध उइगर आणि तुर्किश न्यूज साईटप्रमाणे बनवलं होतं. हॅकर्सने थर्ड पार्टी अँड्रॉईड अ‍ॅप स्टोरवर उइगर थीम अ‍ॅप्स, प्रेयर आणि डिक्शनरी अ‍ॅपला लिस्ट केलं होतं. या अ‍ॅप्समध्ये मालवेअर असतात.

  (वाचा - कोरोना काळात Instagram वर फ्रॉड प्रकरणात 50 टक्क्यांनी वाढ; अशी होतेय फसवणूक)

  फेसबुकने दिलेल्या माहितीनुसार, त्यांना चौकशीदरम्यान असं आढळलं की, दोन चिनी कंपन्या बिजिंग बेस्ट यूनायटेड टेक्नोलॉजी कंपनी लिमिटेड आणि डालियान 9Rush Technology Co Ltd च्या डेव्हलप केलेल्या अँड्रॉईड टूलचा हॅकर्सने उपयोग केला होता, असं सांगण्यात आलं आहे. दरम्यान, याबाबत वॉशिंग्टन स्थित चिनी दुतावासाने फेसबुकच्या या रिपोर्टवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तर बीजिंगने नेहमीप्रमाणे या आरोपांना नकार दिला आहे.
  Published by:Karishma Bhurke
  First published: