Home /News /technology /

चिन्यांकडून भारतात पसरवला जातोय फेक Apps Scam, अनेक भारतीयांच्या खात्यातून पैसे गायब

चिन्यांकडून भारतात पसरवला जातोय फेक Apps Scam, अनेक भारतीयांच्या खात्यातून पैसे गायब

दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने या रॅकेट्सचा पर्दाफाश केला आहे. यामागे चिनी कंपन्यांचा हात असल्याचं समोर आलं आहे.

  नवी दिल्ली, 13 जून : Google Play Store आणि Apple App Store वर अनेक अ‍ॅप्स आहेत. अनेक अ‍ॅप्स रिव्ह्यू केल्यानंतरच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होत असल्याचं बोललं जातं. असं असूनही मालवेअर आणि फेक अ‍ॅप्स प्लॅटफॉर्मवर येतात. या प्रकरणात Apple अ‍ॅपचं इको सिस्टम अधिक सुरक्षित मानलं जातं. कारण डेव्हलपरला वेरिफिकेशन प्रोसेसमधून जावं लागतं, त्यानंतरच अ‍ॅप प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होतात. या प्लॅटफॉर्मचा वापर करुन स्कॅमर्स फेक अ‍ॅप टार्गेटेड मोबाईलमध्ये इन्स्टॉल करतात. नुकतीच एक घटना समोर आली, ज्यात एका फेक अ‍ॅपने 5 लाख भारतीयांचे 150 हून अधिक कोटी रुपये उडवले आहेत. ANI वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अनेक फायनेंशियल इन्व्हेस्टमेंट अ‍ॅप्स, पैसे इन्व्हेस्ट करणाऱ्या लोकांना हाय रिटर्न देण्याचा दावा करतात. दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने या रॅकेट्सचा पर्दाफाश केला आहे. यामागे चिनी कंपन्यांचा हात असल्याचं समोर आलं आहे. या चिनी कंपन्या मल्टीलेवल मार्केटिंग मॉडेलचा (MLA) वापर करुन चॅटिंग करत होत्या. रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, चिनी कंपन्यांचे असे काही अ‍ॅप्स गुगल प्ले स्टोरवर लिस्ट होते. यासंबंधीत सायबर क्रिमिनल्सला पोलिसांनी अटक केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे अशा फेक अ‍ॅप्सची ओळख कशी करायची. फेक अ‍ॅप्स खऱ्या अ‍ॅप्सप्रमाणेच दिसत असल्याने याची ओळख करण्यास समस्या येतात. परंतु काही गोष्टी लक्षात घेऊन याची ओळख करता येऊ शकते.

  (वाचा - WhatsAppसेफ्टी फीचर्सच्या मदतीने तुमचं Accountअसं ठेवा सुरक्षित,पाहा सोप्या Tips)

  - सर्वात आधी अ‍ॅपचं नाव आणि डेव्हलपरला स्टोरवर चेक करा. ज्यावेळी एखादं अ‍ॅप तुम्ही सर्च करता, त्यावेळी अनेक अ‍ॅप्स सर्च रिझल्टमध्ये येतात. परंतु खोट्या, फेक अ‍ॅपच्या नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक असते. तसंच अ‍ॅप डाउनलोड करताना डाउनलोड नंबर, रेटिंग आणि रिव्ह्यूदेखील चेक करणं गरजेचं आहे. - त्याशिवाय अ‍ॅपची पब्लिश डेट तपासा. रियल अ‍ॅप updates on डेट दाखवतं. वेगवेगळे वर्ड्स किंवा इमेज मिळाल्यास फेक अ‍ॅप ओळखता येऊ शकतं.

  (वाचा - तुमच्या कामाची बातमी; App असली आहे की नकली? डाउनलोड करण्याआधी या गोष्टी लक्षात ठेवाच)

  - महत्त्वाची बाब म्हणजे, अ‍ॅप कोणत्या प्रकारच्या परमिशनची डिमांड करतात तेदेखील तपासा. अधिक परमिशनची डिमांड केल्यास, असे अ‍ॅप फेक असू शकतात.
  Published by:Karishma Bhurke
  First published:

  Tags: Android, Apps, Online fraud, Tech news

  पुढील बातम्या