Home /News /technology /

भारताची 4 महिन्यांत पाचव्यांदा अ‍ॅपबंदी; 43 Chinese Apps ला भारतीय पर्याय?

भारताची 4 महिन्यांत पाचव्यांदा अ‍ॅपबंदी; 43 Chinese Apps ला भारतीय पर्याय?

नेमक्या कुठल्या मोबाईल Apps वर बंदी आली आणि आता त्याला भारतीय पर्यायी applications कुठली?

    नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर : राष्ट्रीय सुरक्षा (National Security) धोक्यात असल्याने चीनशी संबंध असलेल्या अ‍ॅप्सवरील चौथ्या क्रॅकडाऊनचा भाग म्हणून इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी मंत्रालयाने 43 चिनी अ‍ॅप्सवर (Chinese Apps ban) बंदी घातली. नवीन यादीमध्ये चिनी टेक कंपनी अलिबाबाच्या अलीसप्लायर्स मोबाईल, अलिबाबा वर्कबेंच, अलीएक्सप्रेस आणि अलीपे कॅशियर यासारख्या अनेक अ‍ॅप्सचा समावेश आहे. या बंदीचा परिणाम असा की ही नुकतीच बॅन झालेली अ‍ॅप्स यापुढे भारतातील गुगल प्ले स्टोर आणि अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअर मधून डाउनलोड होणार नाहीत. त्याचप्रमाणे, जे आधीपासूनच त्यांच्या स्मार्टफोनमध्ये हे अ‍ॅप्स वापरतात, त्यांच्या फोनमध्ये ती काम करणं बंद होईल. भारतात बंदी घातलेल्या सर्व चिनी अ‍ॅप्सची टाईमलाईन जूनच्या सुरुवातीलाच सरकारने चीनमधील 59 अ‍ॅप्सची पहिली बॅच ब्लॉक केली होती ज्यात टिकटॉक, शेअरइट, यूसी ब्राउझर आणि वुईचॅट यासारखी प्रसिद्ध अप आहेत. त्यानंतर जुलैमध्ये 47 अ‍ॅप्सवर पुन्हा बंदी आणण्यात आली असून त्यामध्ये कॅमस्कॅनर, शेअरइट आणि युसी ब्राउझरसारख्या अपचा समावेश होता. सप्टेंबरमध्ये 118 चिनी अ‍ॅप्सवर सर्वात मोठी बंदी घालण्यात आली ज्यात PUBG मोबाइल आणि PUBG मोबाइल लाइट सारख्या अत्यंत लोकप्रिय अ‍ॅप्सचा समावेश होता. सर्व घटनांमध्ये, केंद्र सरकारने असा दावा केला होता की बंदी घातलेल्या चिनी अ‍ॅप्समुळे भारताची अखंडता आणि अंतर्गत सुरक्षा धोक्यात आली आहे. सध्या भारतातील बंदी घातलेल्या अ‍ॅप्सच्या यादीमध्ये चिनी सोशल - फ्री ऑनलाईन डेटिंग व्हिडिओ अ‍ॅप आणि चॅट, डेट इन एशिया, विडेट-डेटिंग अ‍ॅप, फ्री डेटिंग अ‍ॅप-सिंगोल यासारख्या डेटिंग अ‍ॅप्सचा समावेश आहे. आयटी कायद्याच्या कलम 69A च्या तरतुदींनुसार बंदी घातलेल्या अ‍ॅप्समुळे भारताच्या सार्वभौमत्वाचा आणि अखंडतेला धोका निर्माण झाला आहे, असा दावा भारत सरकारने पुन्हा केला आहे. ही अ‍ॅप्स भारताताली डाटा चोरत असल्याने हा धोका निर्माण झाल्याचं सरकारचं म्हणणं आहे. आत्मनिर्भर अ‍ॅप्सवर फोकस भारतातील चिनी अ‍ॅप्सवर बंदी आल्यामुळे अनेक देशांतर्गत कंपनींनी स्मार्टफोन अ‍ॅपच्या स्पेसमध्ये स्थान मिळवले आहे. उदाहरणार्थ, टिकटॉक ज्याने पूर्वी शॉर्ट व्हिडीओ प्लॅटफॉर्मवर आपला दबदबा ठेवला होता, आता त्याला पर्याय म्हणून चिंगारी, मिटरॉन, एमएक्स टाकाटक आणि अनेक इतर भारतीय अ‍ॅप्सनी त्याचा ताबा घेतला. त्याचप्रमाणे, लवकरच येणारे गेमिंग अ‍ॅप, फियरलेस एंड युनायटेड - गार्ड्स किंवा FAU-G हे PUBG मोबाइल आणि PUBG मोबाइल लाइटची जागा घेण्यास सज्ज आहे. कॅमस्कॅनरच्या बंदीनंतर कागज स्कॅनरसारख्या इतर अ‍ॅप्सना देखील लोकप्रियता मिळाली. याव्यतिरिक्त, भारत सरकार आणि नीती आयोग यांनीही आत्मनिर्भर अ‍ॅप इनोव्हेशन चॅलेंज सुरू केले होते - यामुळे भारतीय अ‍ॅप डेव्हलपर्सना अन्य श्रेणींमध्ये आणि शैलींमध्ये लोकप्रिय अ‍ॅप्ससाठी ऑप्शन म्हणून भारतीय अ‍ॅप्स तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले.
    First published:

    Tags: China, India china, Mobile app

    पुढील बातम्या