Home /News /technology /

भारताचा चीनला दणका! 'हे' दोन प्रसिद्ध अ‍ॅप्स केले बॅन, एकावर तर होते PM मोदींचे अकाउंट

भारताचा चीनला दणका! 'हे' दोन प्रसिद्ध अ‍ॅप्स केले बॅन, एकावर तर होते PM मोदींचे अकाउंट

बॅन केल्यानंतर हे दोन्ही अ‍ॅप्स गुगल प्ले स्टोअर व अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअर वरून देखील काढून टाकण्यात आले आहे.

    नवी दिल्ली, 04 ऑगस्ट: भारत सरकारने चीनवर डिजिटल स्ट्राइक करत आहे. याआधी Tiktok सारखे प्रसिद्ध अ‍ॅप्स बॅन केल्यानंतर सरकारने आणखी काही 47 अ‍ॅप्स बॅन केले होते. आता सरकारच्या वतीनं आणखी दोन चिनी अ‍ॅप्स काढून टाकण्यात आले आहेत. चीनमधील दोन लोकप्रिय अ‍ॅप्स Baidu Search आणि Weibo ब्लॉक केले आहे. Baidu Search हे चीनचे स्वत: चे सर्च इंजिन आहे जे गूगलप्रमाणे कार्य करते. तर, Weibo हे चीनचे ट्विटर म्हटले जाते. बॅन केल्यानंतर हे दोन्ही अ‍ॅप्स गुगल प्ले स्टोअर व अॅपल अ‍ॅप स्टोअर वरून देखील काढून टाकण्यात आले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोन्ही अ‍ॅप याआधी सरकारने बॅन केलेल्यांपैकी असावेत. वीबो हे अ‍ॅप चीनच्या सीना कॉर्पोरेशननं 2009मध्ये सुरूवात केली. वीबोचे जगभरात 50 कोटीहून अधिक युझर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे Weiboच्या एका स्टार युझरपैकी आहे होते. 2015मध्ये चीनच्या भेटीपूर्वी मोदींनी चीनच्या या मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर अकाउंट उघडले होते. वीबो पहिल्या पोस्टमध्ये मोदींनी वीबोच्या माध्यमातून चिनी लोकांशी संपर्क साधण्याविषयी बोलले होते.बायडू हे अ‍ॅप भारतात आपली पकड आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न करीत होते. बायडूचे Facemoji कीबोर्ड बर्‍यापैकी लोकप्रिय आहे. वाचा-चिनच्या Gaming Industryला Appleचा धक्का, हटवले 30 हजार Apps 275 अ‍ॅप्सवर नजर ठेवून आहे सरकार त्याचबरोबर सरकार सध्या 275 अ‍ॅप्सवर नजर ठेवून आहे. हे अ‍ॅप्स नॅशनल सिक्यूरिटी किंवा युझरची माहिती तर लीक करत नाही आहे ना, याची तपासणी केली जात आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या कंपन्याचे सर्व्हर चीनमध्ये आहे, अशा कंपन्यांचे अ‍ॅप्स बॅन केले जाणार आहे. यात प्रामुख्याने PUBG Mobile, Ludo World यांचा समावेश आहे. वाचा-सावधान! तब्बल 337 अॅप्समध्ये आहे धोकादायक व्हायरस, संपूर्ण डेटा चोरीची शक्यता पब्जी गेमही होणार बॅन? PUBG हा गेम लहान-मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आवडीचा आहे. मात्र PUBG हा मुळात चायनिज गेम नाही आहे. हा गेम दक्षिण कोरियाच्या एका कंपनीने तयार केला आहे. पब्जी हा गेम सर्वात आधी डेक्सटॉप म्हणजे कम्प्यूटरवर खेळला जात होता. मात्र टेन्सेंटने 2018मध्ये पब्जीचे मोबाइल व्हर्जेन लॉंच केले. यानंतर मोबाइलवरचा गेम भारतासह इतर सर्वच देशांमध्ये प्रसिद्ध झाला. त्यामुळे मोबाइलवरचा गेम हा टेन्सेंट कंपनीच्या नावावर आहे. त्यामुळे भारतातून पब्जी गेम बॅन केल्यास, तो मोबाईलवरून खेळता येणार नाही. मात्र कम्प्यूटवरून हा गेम खेळू शकता. कारण ते व्हर्जेन पब्जी कॉ. या दक्षिण कोरियन कंपनीच्या नावावर आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या