नवी दिल्ली, 21 मे: कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळं देशात (Corona Second Wave) बिकट स्थिती निर्माण झाली आहे. वाढती रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी लसीकरण हा महत्त्वाचा उपाय आहे. त्यामुळे लसीकरण (Corona Vaccination) अधिक वेगानं आणि गुंतागुंतीशिवाय गर्दी टाळून होण्यासाठी सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून आता केंद्रीय आरोग्य विभागाकडून व्हाट्सअॅप मोबाइल नंबर जाहीर करण्यात आला आहे. याद्वारे आपण आपल्या भागात लस उपलब्ध आहे की, नाही हे पाहू शकणार आहे.
अशी घ्या माहिती
आरोग्य मंत्रालयाकडून हा 9013151515 क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. घर बसल्या आपण या नंबरवरून कोरोना लसीची माहिती घेऊ शकतो. व्हाट्सअपमध्ये या नंबरवर आपला पिन कोड टाकून फक्त सेंड करायचे आहे. त्यानंतर या परिसरात लसीकरणासंदर्भात काय स्थिती आहे, याची संपूर्ण माहिती तुम्हाला व्हाट्सअॅप वर दिली जाईल.
कोरोना लसीकरणाची माहिती घेण्यासाठी आपल्याला विनाकारण कुठेही बाहेर फिरण्याची गरज पडणार नाही. लस उपलब्ध आहे किंवा नाही यासाठी परिसरात कुणालाही विचारण्याची देखील गरज नाही. फक्त या नंबरवर पिनकोड पाठवून आपण लसीची खात्रीलायक माहिती घेऊ शकतो. लसीच्या नोंदणीनंतर लसीकरणासाठी तुमचा नंबर आल्यास त्याचे अपडेटदेखील या नंबरवर मिळू शकते. गर्दी आणि गोंधळाशिवाय लसीकरण होण्यासाठी ही व्यवस्था तयार केल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.
आता घरातच करता येईल चाचणी
देशातील मेडिकल रिसर्च अग्रणी संस्था ICMR कडून आता कोरोना चाचण्यांसाठी नवीन नियमावली जारी करण्यात आली आहे. नवीन नियमावलीनुसार कोरोनाची चाचणी घरबसल्या करता येणार आहे. रॅपिड अँटीजन टेस्टसाठी एका टेस्ट किटला ICMR कडून मंजूरी देण्यात आली आहे. या किटद्वारे लोक घरातूनच नाकाद्वारे कोरोना तपासणी नमुने घेऊ शकणार आहेत.
हे वाचा - कोरोना रुग्णांना सलमान देतोय मोफत ऑक्सिजन; मदत मिळवण्यासाठी या नंबरवर करा कॉल
जे कोणी होम टेस्टिंग याप्रकारे होम टेस्ट करतील त्यांना टेस्टच्या strip चा फोटो काढावा लागेल आणि ज्या फोनवर अॅप डाऊनलोड केलेले आहे, त्याच मोबाईलवरून फोटो काढणे गरजेचे आहे. त्यानंतर या मोबाइल फोन का डाटा थेट ICMR च्या चाचणी पोर्टलवर स्टोर केला जाईल. रुग्णाच्या माहितीची गोपनीयता ठेवली जाईल. या टेस्टद्वारे ज्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येईल त्यांना पॉझिटिव्ह मानले जाईल, त्यानंतर कोणत्याही इतर चाचण्या करण्याची गरज नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.