नवी दिल्ली, 5 फेब्रुवारी : जगभरात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या प्रसारामुळे आणि नवीन शोधांमुळे अनेक कामे सुलभ होत आहेत. दरम्यान, चॅटजीपीटीच्या आगमनाने खळबळ उडाली आहे. एआय तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेले 'चॅटबॉट चॅटजीपीटी' गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये लाँच करण्यात आले. अवघ्या 2 महिन्यांत, त्याच्या सक्रिय वापरकर्त्यांची संख्या 10 कोटींपर्यंत पोहोचली. हे इंटरनेटच्या इतिहासात सर्वात वेगाने वाढणारे कंज्यूमर अॅप्लीकेशन झाले आहे. इतकी प्रचंड लोकप्रियता आणि यश असूनही, ChatGPT वरुन खळबळ उडाली आहे. कारण त्यामुळे अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्याचे मानले जात आहे.
ChatGPT तंत्रज्ञान, मीडिया, कायदेशीर, बाजार संशोधन, शिक्षक, ग्राहक सेवा, ग्राफिक डिझायनर, फायनान्स नोकऱ्या आणि स्टॉक मार्केटशी संबंधित काही नोकऱ्यांसाठी धोका म्हणून उदयास आले आहे. सध्या नोकऱ्यांच्या बाजारावर फारसा धोका दिसत नसल्याने भविष्याबाबतची भीती व्यक्त केली जात आहे. वास्तविक ChatGPT ला काही मर्यादा आहेत.
ChatGPT म्हणजे काय?
ChatGPT (चॅट जनरेटिव्ह प्री-ट्रेन्ड ट्रान्सफॉर्मर) अॅप्लीकेशन ही एक मशीन लर्निंग सिस्टम आहे जी डेटाच्या आधारे संशोधन करून उत्तर देते. वास्तविक, ते मानवी मेंदूसारखा विचार करू शकत नाही. तर केवळ विद्यमान डेटाच्या आधारे नमुने तयार करते. आगामी काळात त्याचा झपाट्याने विकास होणार असल्याने अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात.
वाचा - आता काही तासांमध्ये घर बांधता येणार; खर्चही तुलनेत कमी; काय आहे नवीन तंत्रज्ञान
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या अहवालानुसार, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि ऑटोमेशनमुळे 2025 पर्यंत 97 मिलियन नवीन रोजगार निर्माण होतील. तर दुसरीकडे अशी भीती वाढत आहे की ChatGPT चे AI मानवाप्रमाणे विक्रमी वेळेत प्रॉम्प्ट्स आणि प्रश्नांना उत्तर देण्यास सक्षम असल्याने नोकरीच्या बाजारपेठेला धोका निर्माण होऊ शकतो. मात्र, रोबोट मानवी नोकऱ्या घेत आहेत या विचारातून बाहेर पडण्याची गरज असल्याचे एका जागतिक सल्लागार संस्थेचे म्हणणे आहे.
संगणकाने नोकऱ्या गेल्या नाही तर मग चॅटजीपीटीला का घाबरायचं?
एकेकाळी जेव्हा संगणकाचा वापर वाढू लागला तेव्हा अनेकांच्या नोकऱ्या खाऊन टाकतील अशी भीती व्यक्त केली जात होती, पण तसे घडलेच नाही. उलट संगणकामुळे आपली कामे सोपी झाली. त्याचप्रमाणे ChatGPT देखील आपल्यासाठी उपयुक्त आणि वेळ वाचवणारे साधन असू शकते. जे लोक आपली कौशल्य विकसित करणार नाहीत, अशांच्या लोकांना नक्कीच धोका आहे. अनेक तज्ज्ञांनी सांगितले की, "मनुष्य आणि यंत्राच्या मदतीने पुढे जाण्याचा मार्ग सोपा होईल."
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Technology