मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

बापरे! चार्ज होताच तरुणाने खिशात ठेवला मोबाईल; काही वेळात झाला भयंकर ब्लास्ट आणि...

बापरे! चार्ज होताच तरुणाने खिशात ठेवला मोबाईल; काही वेळात झाला भयंकर ब्लास्ट आणि...

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

मोबाईल चार्ज करून लगेच पँटच्या खिशात ठेवणं तरुणाला महागात पडलं.

    दिल्ली, 21 जुलै : कुठे बाहेर जायचं असलं की आपण मोबाईल फूल चार्ज करतो आणि घाईघाईत चार्जिंगवरून काढून तो थेट आपल्या पँटच्या खिशात टाकतो. असाच मोबाईल चार्ज करून एका तरुणाने आपल्या पँटच्या खिशात ठेवला आणि काही वेळातच त्याचा स्फोट झाला. पँटमध्येच मोबाईल ब्लास्ट झाल्याने तरुण गंभीररित्या भाजला. फरीदाबादच्या बल्लभगढमधील ही धक्कादायक घटना आहे. आकाश असं या तरुणाचं नाव. कृष्ण कॉलोनीत तो राहतो. आकाशने दिलेल्या माहितीनुसार, हा मोबाईल तो बऱ्याच कालावधीपासून वापरत होता. बुधवारी फोनची बॅटरी संपली म्हणून त्याने मोबाईल चार्जिंगला लावला. चार्ज झाल्यानंतर त्याने तो पँटच्या खिशात ठेवला. काही वेळाने त्याचा स्फोट झाला आणि त्याचा पाय जळला. हे वाचा - धक्कादायक! आईच्या चहाच्या तलफेमुळे बाळाची भयंकर अवस्था; एक वर्षाच्या चिमुकल्याची करावी लागली सर्जरी त्याच्या कुटुंबाने त्याला तात्काळ बल्लभगढमधील सरकारी रुग्णालयात दाखल केलं. उपचारानंतर त्याला आता रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे, असं अमर उजालाच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. मोबाईल चार्जिंगबाबत ही काळजी घ्या 1) मोबाइलचा कंपनीने दिलेला चार्जर खराब झाल्यानंतर अनेकदा जवळच्या दुकानात, बाजारात मिळणारा चार्जर खरेदी केला जातो. अशा चार्जरचा फटका बसू शकतो. बॅटरी खराब होण्यास तसंच फोन गरम होण्यासाठी असे चार्जर कारणीभूत ठरतात. त्यामुळे कंपनीच्या ओरिजनल चार्जरचाच वापर कऱणं योग्य ठरेल. 2) चार्जिंग संपत आल्यावर फोन चार्जिंगला लावून त्याचा वापर करण्याची सवय काही लोकांना असते. तसेच एकाच वेळी अनेक अॅप वापरण्याचीही सवय असते. काहीवेळा मोबाइल चार्जिंगला लावूनच गेम खेळत बसलेले दिसतात. तसंच मोबाइल कॉल सुद्धा केले जातात. अशावेळीही मोबाइल गरम होऊ शकतो तसेच स्फोट होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा गोष्टी टाळा. हे वाचा - Amublance Accident Video : टोलनाक्यावर भरधाव रुग्णवाहिकेच्या चिंधड्या उडाल्या; भयंकर अपघातातात रुग्णासह 3 ठार 3) काही जणांना रात्रभर मोबाइल चार्जिंग करण्याची सवय असते. असं कऱणं धोकादायक ठरू शकते. यामुळे फोन आणि बॅटरी दोन्ही खराब होण्याची शक्यता असते. रात्रभर मोबाइल चार्जिंग कऱण्याएवजी ठराविक वेळ चार्जिंग कऱणे सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य असते. 4) तुमचा फोन ज्वलनशील पदार्थांपासून दूर ठेवा. कपडे, कॉटन, प्लास्टिकपासून बाजूला ठेवा. तसेच शर्टच्या खिशात मोबाइल ठेवणं टाळा. त्यातून निघणारे रेडिएशन शरीरासाठी घातक असतात.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Mobile, Technology

    पुढील बातम्या