नवी दिल्ली, 11 मे : WhatsApp जवळपास सर्वाच्याच आयुष्याचा महत्त्वाचा भागच झाला आहे. सध्या कम्युनिकेशनसाठी हे सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टंट मेसेजिंग अॅप आहे. परंतु या दररोज वापरात असलेल्या WhatsApp मधील काही सेटिंग्स, धोकादायक ठरू शकतात. या सेटिंग्समुळे फोन हॅक (Smartphone Hack) होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.
Disappearing Messages -
व्हॉट्सअॅपने नुकतंच हे नवं फीचर Disappearing messages सर्व युजर्ससाठी रोलआउट केलं होतं. याच्या वापराने तुमचे मेसेज आपोआप डिलीट होतील. परंतु प्रायव्हसीच्या दृष्टीने हे फीचर धोकादायक ठरू शकतं.
App मध्ये आपोआप डिलीट होणारे मेसेज कमीत-कमी 7 दिवसांपर्यंत राहतात. अशात तुमचे मेसेज नोटिफिकेशनमध्ये राहतात, तसंच या चॅटला दुसरा युजर कॅप्चर करू शकतो. तसंच रिसिव्ह करणारा युजर तुमचे मेसेज बॅकअपमध्येही ठेऊ शकतो. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने चॅट डिलीट करणं फायद्याचं ठरतं.
Default Saved Images -
जर तुमच्या व्हॉट्सअॅपवर येणारे फोटो किंवा व्हिडीओ आपोआप सेव्ह होत असतील, तर ही सेटिंग बदलणं गरजेचं आहे. सायबर एक्सपर्ट्सनी दिलेल्या माहितीनुसार, फोटो अनेकदा ट्रोजन हॉर्सप्रमाणे (Trojan horse) काम करतात. याच्या मदतीने हॅकर्स फोन सहजपणे हॅक करू शकतात. त्यामुळे WhatsApp सेटिंगमध्ये, चॅट्सवर क्लिक करुन Save to Camera Roll बंद करा.
WhatsApp iCloud बॅकअप -
अॅपलची सिक्योरिटी सर्वात मजबूत असल्याचं सांगितलं जातं. परंतु एक्सपर्ट्सनी WhatsApp चा बॅकअप iCloud मध्ये न घेण्याचा सल्ला दिला आहे. कोणतंही व्हॉट्सअॅप चॅट iCloud मध्ये गेल्यानंतर अॅपलची प्रॉपर्टी होतं. iCloud मध्ये पोहोचल्यानंतर तुमचं चॅट decrypted होतं. म्हणजेच सुरक्षा एजेन्सीज तुमचं चॅट अॅपलकडून घेऊ शकतात. त्यामुळे एक्सपर्ट्स iCloud मध्ये बॅकअप न घेण्याचा सल्ला देतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Whatsapp chat, WhatsApp features