जगातल्या सर्वात मोठ्या कंपनीच्या चेअरमनचं निधन, 9.3 बिलियन डॉलर आहे संपत्ती

जगातल्या सर्वात मोठ्या कंपनीच्या चेअरमनचं निधन, 9.3 बिलियन डॉलर आहे संपत्ती

जगातील 12वी सर्वात मोठी इकोनॉमी, दक्षिण कोरियाच्या व्यवसायात सॅमसंगचं मोठं नाव आहे. दक्षिण कोरियाच्या आर्थिक मजबूतीमध्ये या कंपनीची मोठी भूमिका आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर : सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचे (Samsung Electronics) अध्यक्ष ली कुन-ही (Lee Kun-hee) यांचं निधन झालं आहे. ते 78व्या वर्षांचे होते. कंपनीने अधिकृतपणे याबाबत माहिती दिली आहे. दक्षिण कोरियाच्या एका कंपनीला प्रख्यात टेक कंपनीमध्ये बदलण्याचं श्रेय ली यांना दिलं जातं.

जगातील 12वी सर्वात मोठी इकोनॉमी, दक्षिण कोरियाच्या व्यवसायात सॅमसंगचं मोठं नाव आहे. दक्षिण कोरियाच्या आर्थिक मजबूतीमध्ये या कंपनीची मोठी भूमिका आहे.

सहा वर्षांपूर्वी 2014 मध्ये ली यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर कंपनीची अधिकतर जबाबदारी ली यांचा मुलगा आणि सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचे उपाध्यक्ष ली जॉय-यंग (Lee Jae-yong) हे सांभाळत आहेत.

दरम्यान, भारतात टॉपच्या स्मार्टफोन विक्री लिस्टमध्ये, साउथ कोरियाची स्मार्टफोन कंपनी सॅमसंग (samsung) दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतात गेल्या तिमाहीमध्ये सॅमसंगच्या जवळपास 1 कोटी स्मार्टफोनची विक्री करण्यात आली आहे. सॅमसंगने भारतात 20.4 टक्के मार्केट शेयरवर कब्जा केला आहे.

Published by: Karishma Bhurke
First published: October 25, 2020, 12:55 PM IST
Tags: samsung

ताज्या बातम्या