Home /News /technology /

या नव्या पद्धतीचा वापर करुन होतोय Bank Fraud, केंद्र सरकारने केलं Alert

या नव्या पद्धतीचा वापर करुन होतोय Bank Fraud, केंद्र सरकारने केलं Alert

फ्रॉडस्टर्स लोकांची लूट करण्यासाठी, बँक अकाउंट खाली करण्यासाठी नव्या पद्धती शोधत आहेत. आता फ्रॉडस्टर्सनी फसवणुकीसाठी आणखी एक नवी पद्धत शोधली आहे. हे पाहता केंद्र सरकारने लोकांना सतर्क केलं आहे.

  नवी दिल्ली, 9 फेब्रुवारी : कोरोनानंतर इंटरनेटचा (Internet) मोठ्या प्रमाणात वापर होऊ लागला आहे. पण यासह सायबर फ्रॉड (Cyber Fraud), ऑनलाइन फसवणुकीचे (Online Fraud) प्रकारही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. फ्रॉडस्टर्स लोकांची लूट करण्यासाठी, बँक अकाउंट खाली करण्यासाठी नव्या पद्धती शोधत आहेत. आता फ्रॉडस्टर्सनी फसवणुकीसाठी आणखी एक नवी पद्धत शोधली आहे. हे पाहता केंद्र सरकारने लोकांना सतर्क केलं आहे. जर तुम्ही एनीडेस्क (AnyDesk) किंवा टीम क्यूआर सारख्या रिमोट अॅक्सेस सॉफ्टवेअरचा वापर करत असाल, तर तुमच्यासाठी ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे. या सॉफ्टवेअरमुळे तुमचं अकाउंट रिकामं होऊ शकतं. फसवणुकीचे वाढते प्रकार पाहता केंद्र सरकारने सावधानतेचा सल्ला दिला आहे. सरकारकडून चालवल्या जाणाऱ्या ट्विटर हँडल सायबर दोस्तद्वारे (Cyber Dost) युजर्सला इशारा देण्यात आला आहे. KYC संबंधीत कामांसाठी आपल्या कंप्यूटर किंवा मोबाइलवर कोणालाही अॅक्सेस देऊ नका. काही लोक अशा सॉफ्टवेअर्सद्वारे आपल्या सिस्टमचा कंट्रोल इतरांना देतात आणि बँकिंग फ्रॉडचं (Banking Fraud) कारण ठरतात.

  हे वाचा - गृह मंत्रालयाच्या Cyber Dostकडून अलर्ट,Onlineऔषधं मागवताना या गोष्टी लक्षात ठेवा

  वेळोवेळी जारी करण्यात आलेले अलर्ट - - फेब्रुवारी 2019 मध्ये रिझर्व्ह बँकेने AnyDesk सारखे Apps मोबाइल वॉलेटमधून पैसे चोरी करत असल्याचा इशारा दिला होता. - सप्टेंबर 2021 मध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाने क्विकसपोर्ट (QuickSupport), एनीडेस्क (AnyDesk) सारख्या Apps पासून सावध राहण्याचं सांगितलं होतं. - फेब्रुवारी 2022 मध्ये सरकारने ऑनलाइन औषधं घेताना सतर्क राहण्याचं, तसंच फेक-बनावट औषधांपासून सावध राहण्याचं सांगितलं होतं. - 7 फेब्रुवारी 2022 रोजीही ट्विटर हँडल सायबर दोस्तने व्हॅलेंटाइन वीकमध्ये गिफ्ट बुकिंगवरही सावधानतेचा इशारा दिला होता.

  हे वाचा - 25 लाखहून अधिक लोकांनी वापरला हा Password, हॅकर्सकडून एका सेकंदात होतो क्रॅक

  अशी घ्या काळजी - KYC वेरिफिकेशनसाठी App डाउनलोड करू नका. तसंच यासंबंधी कोणताही OTP किंवा ओळखपत्र शेअर करू नका. जर वरील रिमोट अॅक्सेस Apps डाउनलोड करण्याची गरज भासली, तर सर्व काम झाल्यानंतर लगेच सॉफ्टवेअरमधून लॉगआउट करा.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Cyber crime, Online fraud, Tech news

  पुढील बातम्या