नवी दिल्ली, 9 जानेवारी : पॉप्युलर आयटी कंपनी Google ला मोठा झटका बसला आहे. देशातील अँटी ट्रस्ट रेग्युलेटर भारतीय प्रतिस्पर्धा आयोग अर्थात CCI ने (Competition Commission of India – CCI) शुक्रवारी गुगलविरोधात मार्केटमधील वर्चस्वाचा गैरवापर केल्याचा आरोप केले आहेत. तसंच याप्रकरणी Google विरोधात चौकशीचे आदेश दिले आहेत.
CCI ने सांगितलं, की Google ने कायदा 2002 च्या कलम 4 मधील तरतुदींचं उल्लंघन केलं आहे, जे बाजारातील मजबूत स्थानाच्या गैरवापराशी संबंधित आहे.
DNPA ने केली तक्रार -
डिजीटल न्यूज पब्लिशर्स असोसिएशनद्वारे (Digital News Publishers Association -DNPA) दाखल केलेल्या तक्रारीवरुन हे आदेश देण्यात आले आहेत. यात अल्फाबेट इंक, गूगल एलएलसी, गूगल इंडिया प्राइवेट लिमिटेड आणि गूगल आयरलँड लिमिटेडविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
CCI ने नुकतेच Apple विरोधातही दिले आदेश -
नुकतंच CCI ने कथित अयोग्य व्यावसायिक बाबींसाठी अमेरिकन टेक कंपनी Apple च्या विरोधात चौकशीचे आदेश दिले होते. कंपनीने थर्ड पार्टी डेव्हलपर्सशी स्पर्धा करणाऱ्या Apps चे मालक असल्याने आपल्या वर्चस्वाचा गैरवापर केल्याचा आरोप CCI ने केला आहे.
त्याशिवाय CCI ने ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी Amazon लाही झटका दिला होता. Amazon च्या फ्यूचर कुपनच्या डीलला दिलेली मंजुरी स्थगित केली होती. काही तरतुदींचं उल्लंघन केल्याबाबत अँटी ट्रस्ट रेग्युलेटरने ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी Amazon ला 202 कोटींचा दंडही ठोठावला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.