Home /News /technology /

सरकारच्या 'या' निर्णयामुळे कारच्या किमती वाढणार; या गाड्यांच्या विक्रीवर होणार सर्वाधिक परिणाम

सरकारच्या 'या' निर्णयामुळे कारच्या किमती वाढणार; या गाड्यांच्या विक्रीवर होणार सर्वाधिक परिणाम

 वाहनांच्या फिटनेसचा कालावधी (Fitness Duration) संपल्याचंही या केंद्रांना जाहीर करावं लागणार आहे.

वाहनांच्या फिटनेसचा कालावधी (Fitness Duration) संपल्याचंही या केंद्रांना जाहीर करावं लागणार आहे.

केंद्र सरकारने जानेवारीमध्ये एक ऑक्टोबरपासून उत्पादित सर्व प्रवासी कारमध्ये सहा एअरबॅग अनिवार्य करण्याचा प्रस्ताव जारी केला होता. सरकारने उचललेले हे पाऊल म्हणजे रस्ता सुरक्षा वाढवण्याच्या उपायांपैकी एक आहे.

    मुंबई, 14 एप्रिल : प्रवासी कारमध्ये 6 एअरबॅग्ज (Car Airbags) अनिवार्य केल्यामुळे कार अधिक महाग होतील, असं मारुती सुझुकीचे (Maruti Suzuki) अध्यक्ष आरसी भार्गव यांनी म्हटलं आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सशी बोलताना त्यांनी सांगितले की, याचा परिणाम वाहन उत्पादकांच्या विक्रीवर होणार आहे. कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमतीमुळे आधीच वाहनांच्या किमतीत अडचणीत सापडलेल्या कंपन्यांवर यामुळे अधिक दबाव येईल, असं ते म्हणाले. केंद्र सरकारने जानेवारीमध्ये एक ऑक्टोबरपासून उत्पादित सर्व प्रवासी कारमध्ये सहा एअरबॅग अनिवार्य करण्याचा प्रस्ताव जारी केला होता. सरकारने उचललेले हे पाऊल म्हणजे रस्ता सुरक्षा वाढवण्याच्या उपायांपैकी एक आहे. सध्या तरी त्यावर अंतिम निर्णय झालेला नाही. लहान कार बाजारावर परिणाम भार्गव पुढे म्हणाले की, महामारीमुळे लहान कारच्या विक्रीत आधीच लक्षणीय घट झाली आहे. 6 एअरबॅग नियम लागू केल्याने त्यांची किंमत वाढेल, यामुळे त्यांच्या विक्रीला आणखी धक्का बसेल. त्याचा सर्वात मोठा परिणाम छोट्या कारच्या बाजारावर होणार आहे. ग्राहकांना जास्त महागड्या गाड्या परवडत नाहीत. घर बूक केलंय पण बिल्डिंगचं काम रखडलंय? अशा वेळी नुकसान टाळण्यासाठी तुम्ही काय-काय करु शकता गाड्या किती महाग होतील? देशात तयार होणाऱ्या सर्व कारमध्ये ड्रायव्हर आणि फ्रंट पॅसेंजर एअरबॅग देणे आधीच बंधनकारक आहे. ऑटो मार्केट डेटा प्रोव्हायडर JATO Dynamics च्या मते, आणखी चार एअरबॅग जोडल्यास किंमत 17,600 रुपयांनी वाढेल. जाटो इंडियाचे अध्यक्ष रवी भाटिया म्हणाले की काही प्रकरणांमध्ये किंमत आणखी जास्त असू शकते, कारण कंपन्यांना कारच्या डिझाईनमध्ये बदल करणे आवश्यक असते. Indian Railway : रेल्वेचा मोठा निर्णय; कोरोना काळातील नियमामुळे प्रवाशांना होणारा त्रास थांबणार एअरबॅग नसल्यामुळे हजारो लोकांचा मृत्यू सरकारी आकडेवारी दर्शवते की भारतात 2020 मध्ये, देशातील 3,55,000 रस्ते अपघातांमध्ये 1,33,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. या मृत्यूंमध्‍ये कारमध्‍ये पुरेशा एअरबॅग असल्‍याने 13 टक्के लोकांचे प्राण वाचवता आले असते. यामुळे, परिवहन मंत्रालय आपल्या योजनांवर ठाम आहे आणि वाहन निर्मात्यांना या नियमाचे पालन करण्यास प्रवृत्त करण्याचा जोरदार प्रयत्न करत आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Airbag, Car, Central government

    पुढील बातम्या