CamScanner मध्ये आला होता व्हायरस, तुम्ही अपडेट केलंत का?

CamScanner मध्ये आला होता व्हायरस, तुम्ही अपडेट केलंत का?

CamScanner मध्ये धोकादायक व्हायरस आला होता. आता त्याचे सुरक्षित असे अपडेटेड व्हर्जन उपलब्ध झालं आहे.

  • Share this:

मुंबई, 07 सप्टेंबर : गूगल प्ले स्टोअरमध्ये दररोज फेक अॅप्स येत आहेत आणि काही लोकप्रिय मोबाईल अॅप्लिकेशन्समध्ये मालवेअर सापडल्याच्या बातम्याही येत असतात. काही दिवसांपूर्वी Google Play Store मध्ये असलेलं CamScanner App मध्ये मालवेअर सापडलं होतं. अनेकांनी हे अॅप मोबाईलमधून अनइन्स्टॉलही केलं होतं. त्यानंतर गुगल प्ले स्टोअरवरून अॅप हटवण्यात आलं होतं. आता त्यात अपडेट करून पुन्हा अॅप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध झालं आहे. कॅम स्कॅनरने त्यांच्या अधिकृत ट्विटरवरून याची माहिती दिली आहे.

CamScanner App हे लोकप्रिय अॅप्लिकेशन अनेकजण वापरतात. कुठल्याही डॉक्युमेंटचा चटकन फोटो काढून ते स्कॅन केलं जातं आणि त्याचं pdf आणि jpeg व्हर्जनही लगेच उपलब्ध करून दिलं जातं. अनेक जण आपली कागदपत्र स्कॅन करण्यासाठी सहज सोपा पर्याय म्हणून कॅमस्कॅनर अॅपचा वापर करतात.

अॅप डाउनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : Download CamScanner App

मालवेअरचा अभ्यास करणाऱ्यांच्या मते, CamScanner App च्या लेटेस्ट व्हर्जनमध्ये मलेशियस मोड्युल Trojan Dropper आढळून आला होता. डिलिव्हरी मेकॅनिझमसारखं हे मालवेअर काम करतं. म्हणजेच यूजर्सच्या नकळत हे अॅप अपडेट होतं आणि युजरच्या नकळतच इतर काही अॅड्सवर क्लिक केलं जातं. हा मालवेअर काढून टाकला असून आता बिनधास्तपणे याचा वापर करता येईल असं कंपनीनं म्हटलं आहे.

शिवकालीन गडकिल्ल्यांचं हॉटेल्समध्ये रुपांतर खरंच होणार का?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 7, 2019 03:27 PM IST

ताज्या बातम्या