Home /News /technology /

बलात्काराच्या VIDEO मधून पॉर्न साइटला मोठी कमाई, साइट बंद करण्यासाठी मोहिम

बलात्काराच्या VIDEO मधून पॉर्न साइटला मोठी कमाई, साइट बंद करण्यासाठी मोहिम

बलात्कार आणि लैंगिक छळ होत असलेल्या व्हिडिओंच्या माध्यमातून कमाई करण्याच्या आरोपांमुळे जगातील सर्वात मोठी पॉर्न साइट बंद करण्याची मागणी केली जात आहे.

    लंडन, 09 मार्च : बलात्कार आणि लैंगिक छळ होत असलेल्या व्हिडिओंच्या माध्यमातून कमाई करण्याच्या आरोपांमुळे जगातील सर्वात मोठी पॉर्न साइट बंद करण्याची मागणी केली जात आहे. या मागणीसाठी एक ऑनलाइन मोहिमही उघडण्यात आली आहे. आतापर्यंत या मोहिमेत तीन लाख 80 हजार लोकांनी साइन इन केलं आहे. मोहिमेत सहभागी लोकांनी आरोप केला आहे की,'पॉर्न हब साइटवर आक्षेपार्ह व्हिडिओ असून ते काढण्यात आलेले नाहीत. गेल्या अनेक वर्षांत कंपनीवर बलात्काराचे आणि लैंगिक शोषणाचे व्हिडिओ पब्लिश केल्याचा आरोप केला जात आहे. द गार्डियनने दिलेल्या वृत्तानुसार, पॉर्नहब विरोधात मोहिमेला Exodus Cry नावाच्या अमेरिकन गटाने सुरुवात केली आहे. याशिवाय ब्रिटनमधील कार्यकर्तेही याला समर्थन देत आहेत. Exodus Cry च्या संस्थापकांनी म्हटलं की, पॉर्न हब कंपनी कोट्यवधी रुपये कमावते. मात्र एक चांगली सिस्टीम तयार करण्यात अपयशी ठरली आहे. ज्यात व्हिडिओतील व्यक्ती आणि युजर्सचे वय यांची खात्री पटेल. हे वाचा : 100 कोटी युजर्सचा डेटा धोक्यात, चेक करा तुमच्या स्मार्टफोनचे अँड्रॉइड व्हर्जन! change.org नावाच्या वेबसाइटवर पॉर्न हबविरुद्ध मोहिमेची माहिती आहे. पॉर्न हब ही युरोपमधील लग्जमबर्ग इथली कंपनी आहे. तर कंपनीचे कार्यालय मॉन्ट्रियल, लंडन आणि लॉस एंजिलसमध्ये आहे. पॉर्न हबने त्यांच्यावर केलेले आरोप फेटाळूनव लावले आहेत. त्यांच्याकडे चुकीचे व्हिडिओ डिलिट करणारी यंत्रणा असल्याचा दावा केला आहे. तसेच अल्पवयीनांचे व्हिडिओ साइटवर टाकले जाणार नाहीत यासाठी कंपनी दक्ष असते. हे वाचा : NASA ने अंतराळात पिकवली भाजी, पृथ्वीवर आणल्यावर काय झालं?
    Published by:Suraj Yadav
    First published:

    पुढील बातम्या