मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

BYD E6: एकदाच चार्ज करा आणि 522 किलोमीटर फिरा, पाहा कशी आहे ही MPV

BYD E6: एकदाच चार्ज करा आणि 522 किलोमीटर फिरा, पाहा कशी आहे ही MPV

BYD e6: कार निर्माता कंपन्या आता इलेक्ट्रिक कार बाजारात लॉन्च करत आहेत. याच दरम्यान BYD e6 या कारची सध्या जोरदार चर्चा होत आहे.

BYD e6: कार निर्माता कंपन्या आता इलेक्ट्रिक कार बाजारात लॉन्च करत आहेत. याच दरम्यान BYD e6 या कारची सध्या जोरदार चर्चा होत आहे.

BYD e6: कार निर्माता कंपन्या आता इलेक्ट्रिक कार बाजारात लॉन्च करत आहेत. याच दरम्यान BYD e6 या कारची सध्या जोरदार चर्चा होत आहे.

  • Published by:  Sunil Desale

नवी दिल्ली, 15 एप्रिल: चीन (China)मधील वाहन निर्माता कंपनी असलेल्या Build Your Dream (BYD) भारतीय बाजारात आपली नवी इलेक्ट्रिक कार BYD e6 लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. नुकतेच या या एमपीव्हीच्या सेकंड जनरेशनची एक मॉडेल टेस्टिंग दरम्यान चेन्नईत दिसून आली होती. इलेक्ट्रिक कार (Electric Car) सेगमेंटमध्ये भारतातील ग्राहक सध्या खूपच रस घेत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे सर्वच कार निर्माता कंपन्यांनी आपल्या इलेक्ट्रिक कार बाजारात लॉन्च करण्यास सुरुवात केली आहे. BYD e6 कार लॉन्च संदर्भात अद्याप कंपनीकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाहीये. पण, तज्ञांच्या मते या वर्षाच्या अखेरपर्यंत ही एमपीव्ही भारतात लॉन्च होऊ शकते.

चिनी कंपनी BYD ने एका मीडिया रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, ते भारतीय बाजारात लवकरच काही इलेक्ट्रिक वाहने लॉन्च करु शकतात. यामध्ये BYD e6 ही एक गाडी असू शकते. असं म्हटलं जात आहे की, कंपनीकडून या कारच्या कम्प्लिट बिल्ट यूनिट (CBU) रूट ने भारतात एन्ट्री केली जाईल आणि त्यासोबतच भारतातील ही पहिली इलेक्ट्रिक MPV कार असेल.

BYD e6 चा लूक

कंपनीकडून या एमपीव्हीत मोठे हेडलॅम्प दिले असून आकर्षक क्रोम आणि एलॉय व्हिल्स दिले आहेत. मस्क्युलर लूक देण्यासाठी कंपनीने यामध्ये स्ट्रॉन्ग सोल्ड आणि कॅरेक्टर लाईन्स दिल्या आहेत. तसेच कारला थोडा प्रीमियर लूक देण्यासाठी यात क्रोमचा वापर करण्यात आला आहे.

वाचा : Maruti Suzuki Wagon R चं मॉडिफाइड व्हर्जन; ही जबरदस्त कार पाहिली का?

BYD e6 मध्ये दमदार बॅटरी

कंपनीने या एमपीव्हीच्या संदर्भातील कोणतीही टेक्निकल माहिती अद्याप जाहीर केलेली नाहीये. मात्र, मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीने या गाडीत 41kWh क्षमतेची बॅटरी वापरली आहे आणि त्याच्या आधारे इलेक्ट्रिक मोटर 136 hp पावर जनरेट करु शकते. रिपोर्ट्सनुसार, ही कार एकदा चार्ज केल्यास 522 किलोमीटरपर्यंत चालू शकते.

BYD e6ची वैशिष्ट्ये

BYD e6च्या फिचर्स बाबत बोलायचं झालं तर कंपनीने यामध्ये इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक, 4 एअरबँग, Anti Lock Breaking System (ABS), इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रीब्यूशन (EBD), इलेक्ट्रिक Adjustable Front Seat, Rear Parking Sensor, हिल स्टार्ट असिस्ट आणि टायर प्रेशर मॉनेटरिंग सिस्टम सारख्या फिचर्सचा समावेश केला आहे. भारतीय बाजारात लॉन्च झाल्यावर या एमपीव्हीची किंमत 20 ते 25 लाख रुपये असू शकते असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

First published:

Tags: Car, China, India