मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

अवघ्या 30000 रुपयांत खरेदी करा TVS Jupiter आणि Hero Maestro, वाचा काय आहे भन्नाट ऑफर

अवघ्या 30000 रुपयांत खरेदी करा TVS Jupiter आणि Hero Maestro, वाचा काय आहे भन्नाट ऑफर

हीरो मोटर्सची सर्वात प्रसिद्ध Maestro स्कूटर तुम्ही Droom वेबसाइटवर केवळ 26000 रुपयांत खरेदी करुन शकता. जाणून घ्या काय आहे ही ऑफर

हीरो मोटर्सची सर्वात प्रसिद्ध Maestro स्कूटर तुम्ही Droom वेबसाइटवर केवळ 26000 रुपयांत खरेदी करुन शकता. जाणून घ्या काय आहे ही ऑफर

हीरो मोटर्सची सर्वात प्रसिद्ध Maestro स्कूटर तुम्ही Droom वेबसाइटवर केवळ 26000 रुपयांत खरेदी करुन शकता. जाणून घ्या काय आहे ही ऑफर

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 01 ऑगस्ट: कोरोना काळात (Coronavirus Pandemic) सार्वजनिक वाहनांचा वापर करण्याऐवजी अनेकांनी स्वत:च्या गाडीचा वापर करण्याला अधिक भर दिला आहे. आरोग्य आणि सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हा निर्णय अनेकांनी घेतला. कारण पब्लिक ट्रान्सपोर्ट (Public Transport) वापरल्याने संक्रमणाचा धोका अधिक आहे. हे टाळण्यासाठी अनेकांचा ओढा स्वस्त:चे वाहन विशेषत: टू-व्हीलर वापरण्याकडे वळला. त्यामुळे दुचाकी वाहनांची मागणी देखील वाढत आहे. दरम्यान देशभरात असा देखील एक वर्ग आहे जे नवीन वाहनांची खरेदी करू शकत नाहीत, कारण त्यांच्या किंमती जास्त असतात. अशावेळी सेकंड हँड गाडी खरेदीचा पर्याय स्विकारला जातो. दरम्यान काही साइट्सवर तुम्हाला चांगल्या किंमतीमध्ये सेकंड हँड गाड्या उपलब्ध आहेत. जाणून घ्या काय आहेत ऑफर्सं

Hero Maestro – हीरो मोटर्स सर्वात प्रसिद्ध Maestro स्कूटर तुम्ही Droom वेबसाइटवर केवळ 26000 रुपयांत खरेदी करुन शकता. या वेबसाइटवर विक्री होणारी ही स्कूटर एकूण 26000 किमी चालली आहे. तुम्ही या गाडीचे सेकंड ओनर असाल, शिवाय तुम्हाला ही EMI वर देखील खरेदी करता येईल

हे वाचा-Facebook Star व्हायचंय? या गोष्टी ठरतील महत्त्वाच्या, रातोरात मिळेल प्रसिद्धी

TVS Jupiter – Droom वेबसाइटवर टीव्हीएस ज्युपिटर तुम्ही केवळ 30000 रुपयांत खरेदी करू शकता. या स्कूटरवर देखील तुम्हाला EMI चा पर्याय मिळेल. ही स्कूटर 15 हजार किलोमीटर धावली आहे. तुम्ही या स्कूटरची खरेदी केल्यास तुम्ही या वाहनाचे सेकंड हँड ओनर असाल

हे वाचा-लवकरच भारतात लाँच होणार RedmiBook 15 लॅपटॉप; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्यं

TVS Ntorq- टीव्हीएसची ही आणखी एक स्कूटर तुम्हाला droom वेबसाइटवर मिळेल. या स्कूटरकरता तुम्हाला थोडे अधिक पैसे खर्च करावे लागतील. वेबसाइटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार तुम्हाला याकरता 45 हजार रुपये खर्च करावे लागतील. याची खरेदी करण्यासाठीही तुम्हाला EMI चा पर्याय मिळेल.

First published:

Tags: Money, Tech news