मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

चालत्या गाडीला आग लागण्याची काय आहेत कारणं? 'या' वस्तू गाडीमध्ये असतील तर करू शकता बचाव

चालत्या गाडीला आग लागण्याची काय आहेत कारणं? 'या' वस्तू गाडीमध्ये असतील तर करू शकता बचाव

खूप काळ गाडीचं सर्व्हिसिंग केलं नाही किंवा कंपनीच्या सर्व्हिस सेंटरमध्ये (Authorised service centre) जाण्याऐवजी लोकल सर्व्हिस सेंटरमध्ये गाडीची सर्व्हिसिंग केली जाते. यात गाडीची सर्व्हिसिंग योग्य न झाल्याने गाडीला फटका बसण्याची शक्यता आहे.

खूप काळ गाडीचं सर्व्हिसिंग केलं नाही किंवा कंपनीच्या सर्व्हिस सेंटरमध्ये (Authorised service centre) जाण्याऐवजी लोकल सर्व्हिस सेंटरमध्ये गाडीची सर्व्हिसिंग केली जाते. यात गाडीची सर्व्हिसिंग योग्य न झाल्याने गाडीला फटका बसण्याची शक्यता आहे.

खूप काळ गाडीचं सर्व्हिसिंग केलं नाही किंवा कंपनीच्या सर्व्हिस सेंटरमध्ये (Authorised service centre) जाण्याऐवजी लोकल सर्व्हिस सेंटरमध्ये गाडीची सर्व्हिसिंग केली जाते. यात गाडीची सर्व्हिसिंग योग्य न झाल्याने गाडीला फटका बसण्याची शक्यता आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Karishma
नवी दिल्ली, 26 डिसेंबर : चालू गाडीमध्ये आग (Fire on Moving Car) लागल्याच्या अनेक घटना ऐकायला, पाहायला मिळतात. यात बाहेर पडण्याचा कोणताच मार्ग नसल्याने, गाडी लॉक झाल्याने अनेकांना जीव गमवावा लागल्याचं देखील समोर आलं आहे. जुन्याच नाही, तर नवीन गाडीतही (Burning Car) आग लागण्याच्या अनेक घटना घडत असतात. आगीच्या घटनांना विविध घटक (Reasons of Fire in the Car) कारणीभूत आहेत. यामध्ये मेंटेनन्स (Maintenance), वाहन चालवण्याची पद्धत यांसारख्या काही गोष्टींचा समावेश आहे. अनेकदा पैसे वाचवण्याच्या भानगडीत खूप काळ गाडीचं सर्व्हिसिंग (Servicing) केलं जात नाही. तर अनेक जण कंपनीच्या सर्व्हिस सेंटरमध्ये (Authorised service centre) जाण्याऐवजी लोकल सर्व्हिस सेंटरमध्ये गाडीचं सर्व्हिसिंग करतात. यामुळे गाडीचं सर्व्हिसिंग योग्य न झाल्यास गाडीला फटका बसण्याची शक्यता निर्माण होते.

(वाचा - ...अन्यथा अडचणी वाढणार;31 डिसेंबरपर्यंत पूर्ण करा हे काम,परिवहन विभागाची माहिती)

अनेकदा स्वस्तात काम कारण्यासाठी गॅरेजमधून (Garage) काम करून घेतलं जातं, पण यात काही गडबड झाल्यास, गाडीमध्ये शॉर्ट सर्किट (Short Circuit) होण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे थोडे जास्त पैसे गेल्यास हरकत नाही. परंतु गाडीच्या अधिकृत सर्व्हिस सेंटरमधून सर्व्हिसिंग करून घेतल्यास सेवा चांगली मिळते आणि गाडी सुरक्षित असल्याची हमी देखील मिळते.

(वाचा - ना सेंड बटण, ना कोणतीही चॅट हिस्ट्री; आता करा रियल टाईम चॅटिंग,पाहा काय आहे App)

त्याशिवाय पेट्रोल महाग झाल्याने हल्ली अनेकजण सीएनजी-एलपीजी किट गाडीमध्ये लावतात. पण हे कंपनीच्या अधिकृत सेंटरमधून फिटिंग करण्याऐवजी खासगी सेंटरमधून फिटींग करत पैसे वाचवले जातात. अधिकृत सर्व्हिस (Authorised service centre) सेंटरमध्ये याची किंमत 60 ते 70 हजार असल्याने, अनेकदा स्वस्तात 15 ते 20 हजार रुपयांमध्ये काम करण्याचा विचार केला जातो. त्यामुळे गाडीमध्ये खराबी होऊन आग लागण्याच्या घटना घडतात. थोड्या पैश्यांसाठी व्यक्ती आपल्या आणि आपल्या परिजनांच्या जीवाशी खेळ करत असतो. त्यामुळे हे किट अधिकृत पद्धतीने लावल्यास या घटना कमी होण्यास मदत होऊ शकते. Burning Car Delhi अधिकृत सर्व्हिस सेंटरमध्ये करा काम - खूप काळ गाडीचं सर्व्हिसिंग केलं नाही किंवा कंपनीच्या सर्व्हिस सेंटरमध्ये (Authorised service centre) जाण्याऐवजी लोकल सर्व्हिस सेंटरमध्ये गाडीची सर्व्हिसिंग केली जाते. यात गाडीची सर्व्हिसिंग योग्य न झाल्याने गाडीला फटका बसण्याची शक्यता आहे. प्रत्येक कंपनीची गाडी ही वेगवेगळ्या पद्धतीने बनवलेली असते. त्यामुळे प्रशिक्षित मॅकेनिककडून काम करून घेतल्यास आग लागण्याच्या घटना कमी होऊ शकतात. चुकीची वायर किंवा वायरिंगचे काम झाल्यानं शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता असते. त्यामुळे पैसे वाचवण्याच्या भानगडीत न पडता अधिकृत सर्व्हिस सेंटरमधून सर्व्हिसिंग करावी.

(वाचा - FASTag Recharge करताना घ्या काळजी, अन्यथा भरावा लागेल चार्ज)

उत्तम मेंटेन करा - खूप दिवस गाडीची सर्व्हिसिंग न केल्यास गाडीमध्ये काय खराबी आहे किंवा बिघाड आहे हे लक्षात येत नाही. याचा फटका बसून लाग लागण्यासारख्या घटना घडतात. शिवाय गाडीमध्ये असणारं सीएनजी-एलपीजी किट मेंटेनंस देखील महत्त्वाचं आहे. वेळोवेळी याची वायरिंग तसंच जॉईंट चेक करणं गरजेचं आहे. अनेकदा वेळेवर सर्व्हिसिंग न केल्यानं याकडे लक्ष जात नाही आणि शॉर्ट सर्किट होण्याची किंवा गॅस लीक होऊन आग लागण्याची शक्यता असते. त्यामुळे या गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज असते. गाडीचं तापमान, तसंच इतर काही गोष्टी खराब आहेत की नाही याचा तपास करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर गाडीत जास्तीच्या ऍक्सेसरीज देखील लावू नयेत. यामुळे गाडीच्या बॅटरीवर लोड येऊन आग लागण्याच्या आणि वायरिंग खराब होण्याच्या घटना घडू शकतात. कोणत्याही गोष्टी करायच्या असल्यास किंवा साउंड सिस्टीममध्ये काही बदल करायचे असल्यास अधिकृत सेंटरमध्ये करावे. त्यामुळे वायरिंग करताना कोणताही निष्काळजीपणा होत नाही. गाडीचा वेळेत मेंटेंनस करणं आवश्यक आहे.

(वाचा - तुमच्याकडे Maruti ची गाडी आहे? मिळेल या जबरदस्त ऑफरचा फायदा) सुरक्षा महत्त्वाची

गाडीत आग लागल्यास गाडीचे दरवाजे अटोमॅटिक लॉक असल्यानं उघडले जात नाहीत. यासाठी गाडीत काही सुरक्षा (Saftey) साधनं बाळगणं गरजेचं आहे. गाडीची काच फोडण्यासाठी हातोडी (Hammer), कैची (Scisor) यांसारखी साधनं यावेळी गाडीतून बाहेर पडण्यास फायदेशीर ठरू शकतात. त्यामुळे आग लागल्यास, गाडीतील व्यक्ती आत अडकून मोठी दुर्घटना टाळता येऊ शकते.
First published:

Tags: Car, Safety

पुढील बातम्या