नवी दिल्ली, 16 जून : तुम्ही चांगला फोन घेण्यासाठी एखाद्या ऑफरची वाट बघत असाल, तर फ्लिपकार्टवर (Flipkart) सध्या बिग सेव्हिंग डेज सेल सुरू आहे. या सेलमध्ये सॅमसंग (Samsung), रियलमी (Realme), अॅपल यासारख्या ब्रँड्सचे फोन कमी किमतीत तुम्ही खरेदी करू शकता. तसंच तुम्ही जर अॅपलचा (Apple) आयफोन (iphone) घेण्यासाठी एखाद्या सेलचा किंवा खास ऑफरची वाट पाहत असाल, तर ही तुमच्यासाठी चांगली संधी आहे. या सेलमध्ये iPhone 11 आणि iPhone SE स्मार्टफोन्सवर ऑफर्स आहेत. फोनवर सूट देण्याशिवाय, फ्लिपकार्टवर SBI क्रेडिट कार्ड होल्डरला 10 टक्के डिस्काउंटही दिला जात आहे.
iPhone 11 ऑफर -
फ्लिपकार्टवर iPhone 11 स्मार्टफोनचा 64GB स्टोरेज वेरिएंट 49,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. तर, 128GB स्टोरेज वेरिएंट 56,999 रुपयांमध्ये आणि 256GB स्टोरेज मॉडेल 66,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. याशिवाय जर ग्राहकांजवळ SBI क्रेडिट कार्ड (credit card) असेल, तर 10 टक्के इन्स्टंट डिस्काउंट (instant discount) देखील मिळेल.
आयफोन 11 मध्ये 6.1 इंची डिस्प्ले देण्यात आला आहे. तसंच फोनमध्ये 12 मेगापिक्सल + 12 मेगापिक्सलचा रियर कॅमरा देण्यात आला आहे. सेल्फीसाठी या आयफोनमध्ये 12 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमराही आहे.
iPhone SE धमाकेदार ऑफर -
फ्लिपकार्ट Big Saving Days सेल मध्ये अॅपल iPhone SE देखील भरघोस डिस्काउंटवर तुम्ही खरेदी करू शकता. सेलमध्ये आयफोनचा 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 31,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. तर, 128 जीबी वेरिएंट 34,999 रुपयांमध्ये आणि 256 जीबी वेरिएंट 46,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. तसंच SBI क्रेडिट कार्ड होल्डरला 10 टक्के इन्स्टंट डिस्काउंट देण्यात येईल.
आयफोन SE मध्ये 4.7 इंची डिस्प्ले देण्यात आला आहे. तसंच या आयफोनमध्ये 12 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आहे. तर सेल्फीसाठी 7 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.