मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

फोन घेण्याचा विचार करताय? मग realme चा नवीन फोन एक चांगला पर्याय, जाणून घ्या फीचर्स

फोन घेण्याचा विचार करताय? मग realme चा नवीन फोन एक चांगला पर्याय, जाणून घ्या फीचर्स

सोर्स : गुगल

सोर्स : गुगल

जे ग्राकर बजेटमध्ये चांगल्या फोनच्या प्रतिक्षेत आहेत, अशा ग्राहकांसाठी हा फोन एक चांगला पर्याय म्हणून समोर आला आहे, चला जाणून घेऊ याचे फीचर्स.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई 6 सप्टेंबर : बाजारात, तसंच ई-कॉमर्स वेबसाइट्सवर विविध कंपन्यांचे वैशिष्ट्यपूर्ण फीचर्स (Features) असलेले स्मार्टफोन (Smartphone) ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. तसंच सातत्याने नवीन स्मार्टफोन लॉंचदेखील होत असतात. ग्राहक आपली गरज आणि बजेटचा विचार करून स्मार्टफोन खरेदी करतात. खास फीचर्समुळे काही स्मार्टफोन्सच्या किमती जास्त असतात. त्यामुळे असे स्मार्टफोन खरेदी करणं ग्राहकांना आर्थिकदृष्ट्या शक्य नसतं. त्यामुळे साहजिकच बजेट फोन्सना (Budget Phone) जास्त मागणी असते.

ग्राहकांची ही गरज नेमकी ओळखून रिअलमी कंपनीने (Realme) एक नवा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लॉंच केला आहे. या फोनची प्रारंभिक किंमत 8999 रुपये आहे. ग्राहक फ्लिपकार्टवरून (Flipkart) तो खरेदी करू शकतात. या फोनमधली फीचर्सदेखील खास आहेत. 'इंडिया टुडे'ने याविषयी माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

ज्या ग्राहकांना बजेट फोन घ्यायचा आहे, अशा लोकांसाठी रिअलमीने नवा स्मार्टफोन लॉंच केला आहे. रिअलमी सी 33 (Realme C33) असं भारतात लॉंच करण्यात आलेल्या नव्या मॉडेलचं नाव आहे. या स्मार्टफोनमध्ये सर्व बेसिक फीचर्स देण्यात आले आहेत. या फोनमध्ये मोठा स्क्रीन आणि चांगल्या क्षमतेची बॅटरी आहे. रिअलमी सी 33 फोनमध्ये कंपनीने नवीन 'बाउंडलेस सी डिझाइन' (Boundless Sea Design) ऑफर केलं आहे.

हे वाचा : Oneplus Smartphones: वनप्लस मोबाईलला म्हटलं जातं सर्वोत्तम अँड्रॉइड फोन! काय आहे खासियत?

चला रिअलमी सी 33-4G या नव्या स्मार्टफोनचं वैशिष्ट्यं जाणून घेऊ

कंपनीने हा फोन 3GB आणि 4GB अशा रॅमच्या दोन पर्यायांमध्ये उपलब्ध करून दिला आहे. भारतात रिअलमी सी 33 च्या 3 GB RAM+32 GB Storage सह येतो, ज्याची किंमत 8999 रुपये आहे आणि जर तुम्ही 4GB RAM + 64 GB Storage फोन घेतलात, तर त्याची किंमत 9999 रुपये आहे. गोल्ड, अ‍ॅक्वा ब्लू आणि ब्लॅक अशा तीन रंगांमध्ये हा फोन उपलब्ध होईल. हा हॅंडसेट 12 सप्टेंबरला विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

रिअलमी सी 33 या नव्या स्मार्टफोनमध्ये कंपनीने 6.5 इंच आकाराचा डिस्प्ले (Display) दिला आहे. यात 400 nits पीक ब्राइटनेस (Peak Brightness) आहेयामध्ये Unisoc T612 प्रोसेसर आहे.  या फोनमध्ये अँड्रॉइड 12 OS आहे. या फोनच्या मागच्या बाजूला 50 मेगापिक्सेलला ड्युएल कॅमेरा सेटअप (Dual Camera Setup) असून, पाच मेगापिक्सेलचे सेन्सर पुढच्या बाजूला आहेत. या फोनमध्ये दमदार 5000mAhची बॅटरी देण्यात आली आहे.

हे वाचा : Mobile Signal Booster: एकच नंबर! मोबाइल फोन बूस्टरच्या मदतीनं आता कुठेही मिळेल स्टाँग सिग्नल

लेटेस्ट रिअलमी सी 33 स्मार्टफोनमध्ये नवीन 'बाउंडलेस सी डिझाईन' आहे. मागील पॅनेलला चमकदार सँड कम्पोझिट टेक्स्चर आहे. प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या या किमतीत असलेल्या स्मार्टफोनला टक्कर देण्यासाठी आणि आपला फोन अधिक आकर्षित दिसण्यासाठी रिअलमीने त्यात 'वॉटर फ्लो इफेक्ट' वापरला आहे.

या नवीन स्मार्टफोनची बॉडी अल्ट्रा स्लिम (Ultra Slim) असल्याचा दावा कंपनीने केला आहे. आयफोनप्रमाणे या फोनचं बॉक्स डिझाइन आहे. हँडसेटच्या कडा थोड्याशा वक्र (Curved) असल्याचं फोटोजमधून दिसतं.

फोटोग्राफीसाठी रिअलमी सी 33 स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सेल प्राथमिक कॅमेरासह ड्युएल रिअर कॅमेरा सेटअप आहे. यामुळे कमी प्रकाशातही दर्जेदार फोटो येतील, असा दावा कंपनीनं केला आहे. कॅमेरा अ‍ॅपमध्ये पोर्ट्रेट मोड, टाइम लॅप्स, एक्सपर्ट मोड आदी फीचर्स देण्यात आली आहेत. एका वेळी 30fps वर 1080p पर्यंत व्हिडिओ रेकॉर्ड करता येईल.

रिअलमी सी 33 या स्मार्टफोनमध्ये पॉवरफुल चिपसेट (Chipset) नाही. या फोनमध्ये 5000mAh बॅटरी युनिट आहे. या फोनमधली स्टोरेज क्षमता मायक्रो एसडी कार्ड स्लॉटच्या माध्यमातून 1TB पर्यंत वाढवता येईल. त्यामुळे हा बजेट फोन ग्राहकांच्या पसंतीस नक्कीच उतरू शकतो.

First published:

Tags: Mobile Phone, Smartphone, Tech news, Viral news