जिओच्या स्वस्त ऑफर विसरून जाल, कॉल केल्यावर पैसे देणार 'ही' कंपनी

जिओनं आयुसी चार्जेस लागू केल्यानंतर काही स्वस्तातल्या प्लॅनची ऑफर दिली होती. पण आता बीएसएनलने चक्क कॉल केल्यावर पैसे देण्याची ऑफर दिली आहे.

News18 Lokmat | Updated On: Nov 1, 2019 02:39 PM IST

जिओच्या स्वस्त ऑफर विसरून जाल, कॉल केल्यावर पैसे देणार 'ही' कंपनी

नवी दिल्ली, 01 नोव्हेंबर : रिलायन्स जिओनं नुकतंच इतर नेटवर्कवर कॉल करण्यासाठी 6 पैसे प्रति मिनीट आकारले जातील असं जाहीर केलं. त्यानंतर एअरटेल आणि व्होडाफोनने या संधीचा फायदा घेत ग्राहकांकडून आययुसी न घेण्याचा निर्णय घेतला. यापुढचं पाऊल टाकत सरकारी कंपनी बीएसएनएलने एक घोषणा केली आहे. बीएसएनल आता ग्राहकांना कॉल केल्यावर पैसे देणार आहे.

बीएसएनएलने म्हटलं आहे की, प्रत्येक 5 मिनिटाच्या कॉलसाठी ग्राहकांच्या खात्यात 6 पैसे पाठवण्यात येतील. कंपनी ही कॅशबॅक ऑफर देशात सर्वत्र बीएसएनएल वायरलाइन, ब्रॉडबँड आणि एफटीटीएच ग्राहकांना देणार आहे. बीएसएनएलने आययुसीचा मुद्दा चर्चेत असतानाच ही घोषणा केली आहे. त्यामुळे याचा फायदा नवीन ग्राहक मिळण्यासाठी होऊ शकतो.

ग्राहकांनाच पैसे देण्याच्या बीएसएनएलच्या घोषणेमुळे जिओला धक्का बसू शकतो. जिओने ग्राहकांसाठी स्वस्तातल्या ऑफर दिल्याने गेल्या दोन वर्षात टेलिकॉममध्ये त्यांचाच दबदबा आहे. पण आता आययुसी चार्ज लावण्याच्या घोषणेमुळे युजर्समध्ये नाराजी पसरली आहे.

जिओच्या ज्या ग्राहकांनी 9 ऑक्टोबर किंवा त्याआधी रिचार्ज केला असेल तर तो ग्राहक रिचार्ज प्लॅन संपेपर्यंत जिओव्यतिरिक्त इतर कंपन्यांनादेखील फ्री कॉल करू शकतो. सध्याचा प्लॅन संपल्यानंतर मात्र पैसे मोजावे लागतील.

IUC चार्ज म्हणजे काय?

Loading...

- इंटरकनेक्ट यूसेज चार्जेस (IUC) म्हणजे एका मोबाईल नेटवर्कवरून दुसऱ्या नेटवर्कमधल्या मोबाईलला कनेक्ट करण्यासाठीचं शुल्क.

- देशभरात IUC चा दर सारखाच असावा यासाठी TRAI टेलिफोन रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया आग्रही आहे.

- TRAI ट्रायने ठरवल्यानुसार सध्या IUC चा दर 6 पैसे प्रतिमिनिट इतका आहे. तोच रिलायन्स जिओच्या ग्राहकांना आता आउटगोइंग कॉल्ससाठी द्यावा लागणार आहे.

- गेल्या तीन वर्षांत जिओने IUC साठी इतर मोबाईल कंपन्यांना 13 हजार 500 कोटी रुपये मोजले आहेत.

- IUC शुल्क पूर्णपणे माफ करण्याचा TRAI चा आग्रह आहे. त्यानुसार प्राधिकरणाने सर्व मोबाईल कंपन्यांना सूचनाही केल्या आहेत.

- IUC पूर्ण रद्द करण्याची शेवटची मुदत 1 जानेवारी 2020 आहे. त्याअगोदर हे दर बंद होणं अपेक्षित आहे.

- Jio ने दिलेल्या माहितीनुसार, आउटगोइंग कॉल्सला लावलं जाणारं शुल्क हे IUC मुळे आहे. त्यामुळे IUC बंद होईल त्यादिवशी पुन्हा एकदा जिओचे सर्व कॉल्स फ्री होतील.

वाचा : Whatsapp वरून सरकारने केली हेरगिरी, देशात खळबळ!

VIDEO: निसर्गाची अवकृपा शेतकऱ्यांचा आक्रोश पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 1, 2019 02:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...