बीएसएनएलचा येतोय 2000 रुपयांचा मोबाईल, मिळणार फ्री काॅलिंग !

सरकारी टेलीकाॅम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनल) लवकरच स्वस्तात मस्त मोबाईल लाँच करणार आहे.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Sep 19, 2017 10:39 PM IST

बीएसएनएलचा येतोय 2000 रुपयांचा मोबाईल, मिळणार फ्री काॅलिंग !

19 सप्टेंबर : सरकारी टेलीकाॅम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनल) लवकरच स्वस्तात मस्त मोबाईल लाँच करणार आहे. लावा आणि मायक्रोमॅक्स या कंपन्यांना सोबत घेऊन बीएसएनएल 2000 रुपये किंमतीचा को-ब्राँडेड फिचरफोन लाँच करणार आहे.  पुढील महिन्यात 2 आॅक्टोबरला हा फोन लाँच होण्याची शक्यता आहे.

फोनमध्ये असणार फ्री-काॅलिंग

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी फिचर फोनसाठी संबंध कंपन्याशी बोलणं सुरू आहे. या फिचर फोनची किंमत 2000 रुपयांपर्यंत असणार आहे. सोबतच या फोनमध्ये फ्री काॅलिंग असणार आहे.

बीएसएनएलचा दबदबा वाढला

बीएसएनएलने या मोबाईलसाठी होणाऱ्या खर्चाचा खुलासा केला नाही. पण लावा आणि मायक्रोमॅक्स या आघाडीच्या कंपन्यां बीएसएनएलच्या 10.5 कोटी ग्राहकांसाठी को-ब्रांडेड डिव्हाईस तयार करून देणार आहे. मागील एका वर्षात बीएसएनएलने जवळपास 2.5 कोटी नवीन सिम कार्डस विकले आहे. तसंच 7.5 लाख ग्राहकांनी मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीद्वारे बीएसएनएल सेवा सुरू केलीये.

Loading...

दिवाळीआधी बीसएनएलचा हा फिचर फोन लाँच होणार असल्यामुळे मोबाईल मार्केटमध्ये हालचालींना वेग आलाय.

मोबाईल मार्केटिंग असोसिएशन आणि Kantar IMRB च्या सर्व्हेनुसार 85 टक्के फिचर फोन वापरणारे स्मार्टफोन वापरण्यास तयार नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 19, 2017 10:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...