Elec-widget

प्रीपेड युजर्ससाठी या कंपनीने जुनी ऑफर केली पुन्हा सुरू, मिळणार 3 GB डेटा आणि..

प्रीपेड युजर्ससाठी या कंपनीने जुनी ऑफर केली पुन्हा सुरू, मिळणार 3 GB डेटा आणि..

बीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 250 मिनिटे कॉलिंग फ्री मिळणार आहे. याशिवाय दररोज 3 जीबी डेटाही मिळेल.

  • Share this:

नवी दिल्ली, 29 नोव्हेंबर : भारत संचार निगम लिमिटेडने पुन्हा एकदा त्यांचा जुना प्लॅन सुरू केला आहे. कंपनीने त्यांच्या ग्राहकांसाठी 1 हजार 999 रुपयांचा प्लॅन पुन्हा एकदा लाँच केला आहे. हा प्लॅन काही महिन्यांपूर्वी बंद करण्यात आला होता. याशिवाय कंपनीने नवीन प्रीपेड प्लॅनसुद्धा लाँच केले आहेत. टेलीकॉम टॉकच्या रिपोर्टनुसार बीएसएनएलने त्यांचा 1999 रुपयांचा प्लॅन प्रीपेड ग्राहकांसाठी पुन्हा उपलब्ध करून दिला आहे.

बीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 250 मिनिटे कॉलिंग फ्री मिळणार आहे. याशिवाय दररोज 3 जीबी डेटाही मिळेल. हा डेटा संपल्यानंतर ग्राहकांना 80Kbps च्या स्पीडने नेट वापरायला मिळणार आहे. तसेच ग्राहकांना फ्री PRBT आणि 365 दिवसांसाठी SonyLIV सब्सक्रिप्शन मिळेल.

कंपनीने 97 रुपयांचा प्रीपेड प्लॅनसुद्धा दिला आहे. सध्या हा प्लॅन चेन्नई आणि तामिळनाडुत दिला आहे. यामध्ये ग्राहकांना दररोज 2 जीबी नेट आणि 250 मिनिटे कॉलिंग मिळणार आहे. या प्लॅनची वैधता 18 दिवस असेल. तसेच असाच 998 रुपयांचाही एक प्लॅन आहे. यामध्ये ग्राहांकाना 240 दिवसांची वैधता मिळणार आहे.

वाचा : मोबाईलवर बोलणं महागणार, एक डिसेंबरपासून रिचार्ज प्लॅन वाढणार?

365 रुपयांच्या प्लॅनमध्ये 365 दिवसांची वैधता मिळेल. मात्र इतर फायदे फक्त 60 दिवसांसाठी मिळतील. बीएसएनएलचा 997 रुपयांचाही एक प्लॅन आहे. यात 3 जीबी नेट आणि 250 मिनिटे कॉलिंग दररोज मिळणार आहे. 180 दिवसांसाठी हा प्लॅन आहे.

Loading...

वाचा : तुमच्या स्मार्टफोनचा विमा काढलात का? होणार नाही नुकसान

ग्राहकांना 399 रुपयांच्या प्लॅनमध्ये 80 दिवस लाभ मिळणार आहे. यात 1 जीबी डेटा आणि 100 एसएमएस आणि फ्री PRBT मिळणार आहे.

वाचा : Jio ने बंद केली जुनी ऑफर, ग्राहकांना मिळणार नाही फायदा

वाचा : बिझनेस सुरू करायचा आहे? काळजी करू नका, आता WhatsApp करणार मदत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: BSNL
First Published: Nov 30, 2019 11:41 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...
Listen to the latest songs, only on JioSaavn.com