नवी दिल्ली, 16 जानेवारी : तुमच्याकडे मोबाईल (Mobile) प्रीपेड कार्ड (Prepaid Card) असेल, तर दर महिन्याला मोबाईल रिचार्ज (Recharge) करावा लागतो. रिचार्ज करणं विसरल्यास, कोणाशी संपर्क करणंही कठीण होतं. यावर पोस्टपेडचा (Postpaid)पर्याय आहे. पण प्रत्येकाला तो परवडतो तसंच सोयीचा असतो असं नाही. आपल्या देशात प्रीपेड कार्डधारकांची संख्या मोठी आहे. या ग्राहकांना दर महिन्याला रिचार्ज करण्याच्या त्रासातून सुटका देणारा एक जबरदस्त प्रीपेड प्लॅन भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएलने (BSNL) आणला आहे. याद्वारे एकदा रिचार्ज केल्यावर एक वर्षभर कॉलिंग आणि डेटा वापरता येणार आहे.
अवघ्या 365 रुपयांचा हा प्लॅन असून, 365 दिवसांसाठी म्हणजेच एक वर्ष त्याची वैधता (Validity) आहे. या प्लॅनमध्ये अमर्याद कॉलिंगची (Unlimited Calling) सुविधा आहे. कॉम्बो रिचार्ज पॅकसह हा प्लॅन उपलब्ध असून, दहा जानेवारीपर्यंत यात सुरुवातीच्या 60 दिवसांसाठी दररोज 250 मिनिटं दिली जात होती. आता ही मर्यादा हटवण्यात आली आहे.
आता सर्व बीएसएनएल प्लॅनमध्ये देशभरातील ग्राहकांना एफयुपी मर्यादेशिवाय, अमर्याद व्हॉईस कॉलची सवलत देण्यात आली आहे. या प्लॅनमध्ये दररोज 2 जीबी डेटा मिळतो. हा डेटा संपल्यावर ग्राहकांना 80 केबीपीएस स्पीडने डेटा मिळेल. तसंच या प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएसची सुविधा आहे.
देशातील सर्व सर्कल्समध्ये आता बीएसएनएलचा वार्षिक 365 रुपयांचा हा प्लॅन उपलब्ध असून, कोणत्याही नेटवर्कला अमर्याद कॉलिंग आणि दररोज 2 जीबी डेटा (Data)आहे. यामध्ये बीएसएनएल ट्युन्सचं (BSNL Tunes) सब्स्क्रीप्शन मोफत आहे. मोफत मिळणाऱ्या अशा काही सेवा फक्त 60 दिवसांसाठी आहेत. हा प्लॅन मात्र 365 दिवसांसाठी म्हणजेच संपूर्ण वर्षासाठी वैध आहे.