नवी दिल्ली, 10 नोव्हेंबर : ग्राहक आता केवळ एक मिस्ड कॉल देऊन आपला LPG Gas Cylinder बुक करू शकतात. त्याशिवाय WhatsApp द्वारेही एलपीजी सिलेंडर बुक करता येतो. मिस्ड कॉलची ही सुविधा सध्या केवळ इंडियन ऑइलच्या इंडेन गॅस ग्राहकांना मिळेल. इंडेन गॅस ग्राहक आता एलपीजी सिलेंडर केवळ मिस्ड कॉलद्वारे बुक करू शकतात.
मिस्ड कॉलद्वारे गॅस बुक करण्याच्या सुविधेमुळे वृद्धांनाही याचा फायदा होणार असल्याचं इंडियन ऑइलने म्हटलं आहे. देशातील कोणत्याही ठिकाणाहून ग्राहक 8454955555 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन गॅस बुकिंग करू शकतात. या कॉलसाठी कोणतंही शुल्क द्यावं लागणार नाही.
WhatsApp द्वारे LPG Gas Booking -
गॅस सिलेंडर एका मेसेजद्वारेही बुक करता येईल. भारतीय पेट्रोलियम कंपन्या भारत गॅस (Bharat Gas), इंडेन गॅस (Indane Gas) आणि एचपी गॅस (HP Gas) ग्राहकांना व्हॉट्सअॅपद्वारे सिलेंडर बुक करण्याची सर्विस देतात.
महत्त्वाची बाब म्हणजे, WhatsApp आणि मिस्ड कॉलद्वारे सिलेंडर बुक करण्याची सुविधा केवळ त्याच मोबाईल नंबरला मिळेल, जो तुमच्या गॅस सिलेंडर एजेन्सीमध्ये रिजस्टर्ड आहे. विना रजिस्टर्ड नंबरशिवाय अशाप्रकारे गॅस बुकिंग करता येणार नाही.
Indane ग्राहकांना WhatsApp द्वारे गॅस सिलेंडर बुक करण्यासाठी 7588888824 हा नंबर फोनमध्ये सेव्ह करावा लागेल. त्यानंतर व्हॉट्सअॅप ओपन करा आणि तुमच्या रजिस्टर्ड नंबरवरुन Book किंवा REFILL# असा मेसेज पाठवा. REFILL# पाठवल्यानंतर ऑर्डरबाबत मेसेज येईल. मेसेजमध्ये सिलेंडर डिलीव्हरी कधी येईल याची तारीखही पाठवली जाईल.
HP गॅस सिलेंडर ग्राहकांना 9222201122 या क्रमांकावर Book टाईप करुन WhatsApp वर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलद्वारे मेसेज पाठवावा लागेल. त्यानंतर मेसेजवर ऑर्डर डिटेल्स येतील.
Bharat Gas सिलेंडर ग्राहकांना मोबाईलमध्ये 1800224344 हा क्रमांक सेव्ह करुन WhatsApp वर Hi किंवा Hello पाठवावं लागेल. रिप्लाय आल्यानंतर Book टाईप करुन पाठवावं लागेल. त्यानंतर ऑर्डर डिटेल्स येतील सिलेंडर कधी डिलीव्हर होईल याबाबतही माहिती दिली जाईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.