Home /News /technology /

'कुछ कुछ होने वाला है...' शाहरुखने केली OTT प्रोजेक्ट SRK+ ची घोषणा

'कुछ कुछ होने वाला है...' शाहरुखने केली OTT प्रोजेक्ट SRK+ ची घोषणा

शाहरुखने थेट आपल्या ओटीटी प्लॅटफॉर्म प्रोजेक्टची घोषणा केली आहे. शाहरुखने ओटीटी प्लॅटफॉर्मवर एन्ट्री नाही, तर थेट स्वत:चा ओटीटी प्लॅटफॉर्म SRK+ आणला आहे. शाहरुखने आपला स्वत:चा ओटीटी प्लॅटफॉर्म लाँच करण्याची घोषणा केली आहे.

  नवी दिल्ली, 16 मार्च : मागील अनेक वर्षांपासून बॉलिवूड किंग खान शाहरुख (Shah Rukh Khan) मोठ्या पडद्यावरुन गायब आहे. अनेक जण इतर कलाकारांप्रमाणे शाहरुखही ओटीटी स्पेसमध्ये एन्ट्री करेल असा अंदाज वर्तवाना दिसले. शाहरुख ओटीटी एन्ट्री करेल अशी चर्चा असताना शाहरुखने थेट आपल्या ओटीटी प्लॅटफॉर्म प्रोजेक्टची घोषणा केली आहे. शाहरुखने ओटीटी प्लॅटफॉर्मवर एन्ट्री नाही, तर थेट स्वत:चा ओटीटी प्लॅटफॉर्म SRK+ आणला आहे. सध्या OTT प्लॅटफॉर्मची मोठी क्रेझ आहे. दिवसेंदिवस पॉप्युलर ओटीटी Apps ची डिमांड वाढती असताना आता शाहरुखने आपला स्वत:चा ओटीटी प्लॅटफॉर्म लाँच करण्याची घोषणा केली आहे. शाहरुखने स्वत: याची माहिती दिली आहे.

  हे वाचा - Hot Photoshoot का करत नाही? चाहत्याच्या प्रश्नावर विद्या बालनचा जबरदस्त रिप्लाय

  एसआरके प्लस (SRK PLUS) ची घोषणा करत शाहरुखने फोटो शेअर केला आहे. 'कुछ कुछ होने वाला है ओटीटीकी दुनिया में...' असं म्हणत त्याने SRK+ चा लोगो असणारा फोटो शेअर केला आहे. shah Rukh Khan, shah Rukh Khan ott project, srk plus, what is srk plus काही दिवसांपूर्वी थम्सअपची जाहिरात आणि त्यानंतर 'पठाण' चित्रपटाच्या अनाउंसमेंटनंतर आता तिसऱ्यांदा शाहरुखने आपल्या चाहत्यांना सरप्राइज केलं आहे. मागील वर्षी शाहरुखने एक मजेशीर व्हिडीओ शेअर करत तो लवकरच ओटीटी स्पेसमध्ये काहीतरी करणार असल्याची हिंट दिली होती. या व्हिडीओमध्ये डिज्नी प्लस हॉटस्टारची झलकही होती. त्यामुळे शाहरुख आता नेमकं पुढे काय करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

  हे वाचा - प्रभासच्या चाहत्याची आत्महत्या, धक्कादायक कारण आलं समोर

  शाहरुख 2018 मध्ये आलेल्या 'जिरो' चित्रपटात शेवटचा दिसला होता. त्यानंतर तो मोठ्या पडद्यापासून दूर आहे. आता शाहरुख 'पठाण' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात जॉन अब्राहम, दीपिका पादुकोणही स्क्रिन शेअर करणार आहे.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Bollywood actor, OTT, Shah Rukh Khan, Shahrukh khan, Tech news

  पुढील बातम्या