फोन चोरीला गेला? काळजी नसावी, आता एक क्लिकवर होणार तुमचा डेटा ब्लॉक

फोन चोरीला गेला? काळजी नसावी, आता एक क्लिकवर होणार तुमचा डेटा ब्लॉक

तुमचा फोन चोरीला गेला असेल तर, या सोप्या पद्धतीने करा डेटा ब्लॉक.

  • Share this:

नवी दिल्ली, 29 सप्टेंबर : फोन चोरी झाल्यानंतर तुम्हाला आधी पोलिस स्थानकात जाऊन तक्रार दाखल करावी लागते. त्यानंतर तुमच्या फोनमधल्या खाजगी बाबी ब्लॉक केल्या जातात. मात्र आता सरकारनं असे वेबपोर्टल तयार केले आहे. त्याचा वापर करून एका क्लिकवर तुमचा सर्व डेटा ब्लॉक होऊ शकतो. सरकाच्या दूरसंचार विभागानं याबाबत माहिती दिली आहे. दूरसंचार विभागानं इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर (CEIR) नावाचा हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. यामुळं तुमच्या फोन नंबरवर तुमचा डेटा ब्लॉक केला जाऊ शकतो.

यासाठी फोन चोरी झाल्यानंतर या वेब पोर्टलवर तुमच्या फोनचा IMEI नंबर टाकून डेटा ब्लॉक केला जाऊ शकतो. याशिवाय टेलिकॉम ऑपरेटर किंवा राज्यातील पोलिसांनाही याबाबत माहिती दिली जाऊ शकते. तुम्ही तुमचा IMEI क्रमांक टाकल्यानंतर सरकार तुमचा वेबसाईट ब्लॉक करू शकते. यासाठी खालील गोष्टी लक्षात ठेवा. दरम्यान, सध्या ही सुविधा फक्त महाराष्ट्रात सुरू करण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या चाचणीनंतर देशभर हा प्रकल्प लागू करण्यात येणार आहे.

1. चोरी झालेला मोबाईल फोन ब्लॉक करण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला https://www.ceir.gov.in/Home/index.jsp या वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल,.

2. त्यानंतर होमपेजवर तुम्हाला ब्लॉकचा पर्याय दिसेल. यात मोबाईल चोरीला गेला आहे की हरवला आहे, यावर एक बटन दाबून उत्तर द्यावे लागेल.

3. त्यानंतर तुमच्या स्क्रिनवर एक फॉर्म येईल. या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमचा फोन नंबर, IMEI 1/IMEI 2, फोनच्या कंपनीचे नाव, चोरी झालेल्या फोनचा तपशील टाकावा लागणार आहे.

4. सर्व माहिती टाकल्यानंतर सर्वात शेवटी एक अंतिम बॉक्स दिसेल.

फोन मिळाल्यानंतर असा करा अक्टिवेट

या पोर्टलची सर्वात खास गोष्ट म्हणजे जर तुम्हाला तुमचा फोन मिळाल्यास एक क्लिकवर तुम्ही फोन अक्टिवेट करू शकता. या बेवसाइटवर फोन अनब्लॉक करण्याचाही पर्याय उपलब्ध आहे.

VIDEO: राष्ट्रावादीसोबत फॉर्म्युला ठरला; मित्रपक्षांसोबत अजूनही सस्पेन्स

Published by: Priyanka Gawde
First published: September 30, 2019, 9:52 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading