Home /News /technology /

सावधान! Gmail, Amazon सारखे 377 अ‍ॅप हॅक, अशी होतेय पासवर्ड, क्रेडिट कार्डची माहितीची चोरी

सावधान! Gmail, Amazon सारखे 377 अ‍ॅप हॅक, अशी होतेय पासवर्ड, क्रेडिट कार्डची माहितीची चोरी

आता आला BlackRock नावाचा व्हायरस. अ‍ॅप ओपन करताना घ्या ही काळजी, नाहीतर तुमचीही माहिती होऊ शकते हॅक

    गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्ध अ‍ॅप हॅक झाल्याची किंवा युझरची माहिती चोरल्याची प्रकरणं समोर येत आहे. या प्रकरणांमध्ये अँड्रॉइड मालवेअर (Android malware) Google अ‍ॅप रिव्ह्यू प्रोसेस करण्याचे मार्ग शोधतात. याचे सर्वात मोठे उदाहरण आहे जोकर मालवेअर. याच सगळ्यात आता एक नवीन अँड्रॉइड मालवेअर आढळून आला आहे. ज्याच्यामुळे Gmail, Amazon, Netflix, Uber सारखी तब्बल 377 अ‍ॅपद्वारे तुमचे पासवर्ड, क्रेडिट कार्डची माहिती चोरली जात आहे. रिपोर्टनुसार, या या मालवेअरचे नाव ब्लॅकरॉक (BlackRock )आहे आणि हे उर्वरित अँड्रॉइड मालवेयर प्रमाणेच काम करते. BlackRock असा चोरतो डेटा थ्रेटफॅब्रिकच्या संशोधकांच्या मते, हा मालवेअर जास्तीत जास्त अ‍ॅपना टार्गेट करू शकतो. तसेच, हे केवळ युझरचे लॉगिन क्रिडेंन्शिअरल (युझरनेम आणि पासवर्ड) चोरत नाही तर युझरने पेमेंट डिटेल्सही चोरतात. हे overlaysच्या मदतीने सर्व डेटा गोळा करतात. जेव्हा युझर एकादे अ‍ॅप ओपन करतात, तेव्हा हॅकर त्यांच्यासमोर तशीच एक विंडो ओपन करतात. जी फेक असते. त्यानंतर युझर मुळ अ‍ॅप एवजी फेक विंडोवर क्लिक करतात. यालाच overlays असे म्हणतात. वाचा-WhatsApp हॅक होण्यापासून वाचवायचे आहे? मग लगेच करा Settings मध्ये 'हे' बदल अशी आहे overlaysची पद्धत ThreatFabric च्या रिसर्चमध्ये असे दिसून आले आहे की BlackRock हा financial, social media, communications, dating, news, shopping, lifestyle, आणि प्रोडक्टिविटी अ‍ॅपवर या प्रकाराचा वापर करतो. हे मालवेअर तुमच्या फोनमध्ये आल्यानंतर लगेचच Accessibility फिचर ऑन होते. यानंतर Google अपडेटच्या नावावर फोनमधील एक्सेस मागितला जातो. यामुळे तुमच्या फोनमधील सर्व माहिती हॅकर्सना मिळते. वाचा-आता गाड्यांना लावावी लागणार हिरव्या रंगाची नंबर प्लेट, स्टिकरही असणार! BlackRock ही माहितीही करतो हॅक –SMS मेसेज इंटरसेप्ट करणे. –SMS बल्कमध्ये पाठवणे. – पूर्वनिर्धारित SMSसह स्पॅम्प कॉन्टॅक्ट. –काही अप्स स्टार्क करणे –Log key पर टॅपिंक करणे. (keylogger functionality) –नोटिफिकेशन दाखवणे –मोबाइल अँटीव्हायरस अ‍ॅपसह छेडछाड. वाचा-3.3 सेकंदात 0-100 kmph सुसाट, भारतात आली BMW ची नवी 'Dhoom' बाइक!
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या