होय, हा आहे ब्लॅकबेरीचा शेवटचा फोन

होय, हा आहे ब्लॅकबेरीचा शेवटचा फोन

ब्लॅकबेरीच्या आतापर्यंत आलेल्या प्रत्येक मोबाईलमध्ये हा क्वार्टी किपॅड होता. जाणून घेऊया काय आहेत या मोबाईलचे फीचर्स.

  • Share this:

स्नेहल पाटकर, प्रतिनिधी

8 ऑगस्ट: कॅनेडाच्या टेक्नॉलॉजी कंपनी ब्लॅकबेरीनं, ऑप्टिमस इन्फ्राकॉम कंपनीसोबत भागीदारी करून 'ब्लॅकबेरी कीवन' हा फोन भारतात लॉन्च केलाय. हा ब्लॅकबेरीचा शेवटचा फोन असून याही फोनमध्ये ब्लॅकबेरीची विशेषता म्हणजे क्वार्टी की-पॅड आहे. ब्लॅकबेरीच्या  आतापर्यंत आलेल्या  प्रत्येक  मोबाईलमध्ये हा क्वार्टी किपॅड होता. जाणून घेऊया काय आहेत या मोबाईलचे फीचर्स.

-या मोबाईलला अॅल्युमिनिअम बॉडी आहे.

- 4.5 इंचाचा फुल एचडी आयपीएस डिस्प्ले या फोनमध्ये आहे ज्याची स्क्रिन डेनसिटी 433 पीपीआय आहे.

-4 जीबी रॅम आणि 64 जीबी इनबिल्ट स्टोरेज या फोनमध्ये देण्यात आलंय.

-ब्लॅकबेरी हब, ब्लॅकबेरी कॅलेंडर, ब्लॅकबेरी प्रोडक्टीव्हीटी एज आणि ब्लॅकबेरी वर्कस्पेस सारखे अॅप यात इन्स्टॉल्ड असणार आहेत.

-हा फोन ड्युअल सिम आहे.

-ब्लॅकबेरी डीटेक आणि पासवर्ड कीपरसुध्दा मोबाईलमध्ये आहे.

- 2 गीगाहर्टझवर चालणारा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 625 ऑक्टाकोअर प्रोसेसर देण्यात आलाय.

-ग्राफिक्ससाठी अॅड्रेनो 506 जीपीयू इंटीग्रेटेड आहे.

- हा स्मार्टफोन लेटेस्ट अॅड्रॉईड सिस्टीम 7.1.1 नोगटवर चालतो.

-सोनी आयएमएक्स 378 सेंसर सोबत 12 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आहे.

- फ्लॅश आणि वाइड अॅगल लेंस सोबत 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

-फास्ट चार्जिंगसाठी क्विकचार्ज 3.0 टेक्नॉलॉजीसह 3505 एमएएच ची बॅटरी देण्यात आलीय.

-या फोनच्या स्मार्ट की-बोर्डमध्ये स्पेसबारवर फिंगरप्रिंट सेंसर आहे.

- पूर्ण कीबोर्डवर स्क्रोल करण्यासाठी कॅपेसेटिव्ह टच बटन दिलं गेलंय.

ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट अॅमेझानवर 8 ऑगस्टपासून हा स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध होईल, या ब्लॅकबेरी कीवनची किंमत 39,990 रुपये आहे. या स्मार्टफोनसोबत जर यूजरनं व्होडाफोनचं सिम खरेदी केल्यास व्होडाफोनकडून यूजर्सना 75 जीबी डेटा मिळणार आहे.

First published: August 8, 2017, 8:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading