मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Black Friday Sale: सॅमसंग, वनप्लस आणि शाओमीवर Cool Discount, अ‍ॅमेझॉनवर स्मार्टफोन खरेदी करण्याची सुवर्णसंधी

Black Friday Sale: सॅमसंग, वनप्लस आणि शाओमीवर Cool Discount, अ‍ॅमेझॉनवर स्मार्टफोन खरेदी करण्याची सुवर्णसंधी

Amazon Black Friday भारतासह संपूर्ण जगभरात सुरू झाला असून स्मार्टफोनच्या खरेदीवर काही भन्नाट ऑफर्स युजर्सना मिळत आहेत.

Amazon Black Friday भारतासह संपूर्ण जगभरात सुरू झाला असून स्मार्टफोनच्या खरेदीवर काही भन्नाट ऑफर्स युजर्सना मिळत आहेत.

Amazon Black Friday भारतासह संपूर्ण जगभरात सुरू झाला असून स्मार्टफोनच्या खरेदीवर काही भन्नाट ऑफर्स युजर्सना मिळत आहेत.

  • Published by:  Janhavi Bhatkar

मुंबई, 27 नोव्हेंबर: अ‍ॅमेझॉनवर ब्लॅक फ्रायडे (Black Friday Sale on Amazon) सेल सुरु झाला असून ग्राहकांना यावर विविध ऑफर मिळत आहेत. या सेलमध्ये विविध प्रकारच्या वस्तू, इलेक्ट्रॉनिक उपकरणं, मोबाइल फोन्स चांगल्या किंमतीत खरेदी करता येणार आहेत. या सेलमध्ये विविध ऑफर्सबरोबर फ्री डिलिव्हरी, एक्स्चेंज ऑफर यांसारख्या सुविधादेखील मिळणार आहेत. भारतात इतर सेलप्रमाणे ब्लॅक फ्रायडे सेल मोठ्या प्रमाणात लोकप्रिय नाही. परंतु अ‍ॅमेझॉनवरून या काळात तुम्ही मोठ्या प्रमाणात सूट मिळवू शकता. थॅंक्सगिव्हिंगच्या (Thanksgiving) पुढील दिवशी अमेरिकेत ब्लॅक फ्रायडे सुरु होतो. या दिवशी नाताळच्या सुट्ट्यांची आणि पाश्चिमात्य देशांमध्ये शॉपिंगचा कालावधीची सुरूवात होते.

गेल्या वर्षांपासून विविध ऑनलाईन प्लॅटफॉर्म या दिवसापासून सेलमध्ये वस्तू उपलब्ध करून देत असून सोमवारपर्यंत हा सेल सुरु राहणार आहे. याला ‘सायबर मंडे’ (Cyber Monday sale) म्हटलं जातं. त्यामुळे अ‍ॅमेझॉन देखील 30 नोव्हेंबरपर्यंत सेलमध्ये विविध वस्तू उपलब्ध करून देणार आहे. यावर्षीच्या ब्लॅक फ्रायडे सेल दरम्यान, शाओमी (Xiaomi), वनप्लस (OnePlus) आणि सॅमसंग (Samsung) च्या नवीन  स्मार्टफोनवर सवलत मिळते आहे. अ‍ॅमेझॉनच्या वेबसाईटवर या नवीन अँड्रॉइड आणि आयओएस फोनवर मोठ्या प्रमाणात सूट मिळत आहे.

(हे वाचा-नोकरदारांसाठी बेस्ट आहेत या 4 LIC पॉलिसी, जीवन विम्याबरोबर मिळतील लाखो रुपये)

रेडमी नोट 9 प्रो - Redmi Note 9 Pro मध्ये 4 जीबीपर्यंत रॅम आणि 128 जीबीचा (4GB + 128GB)स्टोरेज असलेल्या या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 720G SoC प्रोसेसर आहे.  या फोनमध्ये फोटोग्राफीसाठी तुम्हाला क्वॉड कॅमेरा सेटअप मिळणार आहे. पॉवर वाढवण्यासाठी फोनमध्ये 5,020mAh बॅटरी मिळेल. या सेलमध्ये हा फोन तुम्हाला 17,999 रुपयांऐवजी थेट 14,999 रुपयांना मिळणार आहे.

रेडमी 9 प्राइम-  Redmi 9 Prime मध्ये  (4GB + 128GB)तुम्हाला ट्रिपल रिअर कॅमेरा मिळणार असून MediaTek Helo G80 SoC हा प्रोसेसर मिळणार आहे. त्याचबरोबर हा फोन या सेलमध्ये तुम्ही 10,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

एमआय 10 5जी- Mi 10 5G हा फोन तुम्ही या सेलमध्ये 44,999 रुपयांना खरेदी करू शकता. या सेलमध्ये या फोनच्या तिन्ही व्हेरिएंटमध्ये ऑफर असून एक्स्चेंज ऑफर आणि नो कॉस्ट ईएमआय सारख्या ऑफर देखील क्रेडिट कार्डवर मिळणार आहेत. आयसीआयसीआय बँक, एसबीआय, अमेरिकन एक्स्प्रेस आणि इतर अनेक बँकाच्या कार्डवर या ऑफर मिळणार आहेत.  AU बँकेच्या डेबिट कार्डवर तात्काळ 10 टक्क्यांचा डिस्काउंट मिळणार आहे. HSBC क्रेडिट कार्ड धारकांना ईएमआयवर 5 टक्क्यांची सूट देखील मिळणार आहे. फोनमध्ये 5,000mAh बॅटरी मिळेल. या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 865 चिपसेट दिला आहे त्याचबरोबर 4,780mAh बॅटरी देखील असणार आहे. यामध्ये 108 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा असणार आहे.

(हे वाचा-'या' क्षेत्रात भारत चीनला टाकणार मागे, मारुती सुझकीचे आरसी भार्गव यांचा विश्वास)

वन प्लस नॉर्ड 5जी- OnePlus Nord 5G हा फोन तुम्ही या सेलमध्ये 27,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. स्नॅपड्रॅगन 765 5G प्रोसेसर आणि 128 जीबी पर्यंत रॅम या फोनमध्ये तुम्हाला मिळणार आहे. ड्युअल सेल्फी कॅमेरा, 4,115mAh बॅटरी आणि 6.44 इंच फुल एचडी प्लस अमोलेड डिस्प्ले दिला आहे. या सेलमध्ये विविध ऑफर्स असून नो कॉस्ट ईएमआय 1,318 रुपयांपासून सुरु होत असून एक्स्चेंज ऑफर अंतर्गत 11,200 रुपयांपर्यंतची रक्कम देखील मिळू शकते. HDFC क्रेडिट कार्ड  आणि डेबिट कार्ड धारकांना 1,000 रुपयांपर्यंतची सूट ईएमआय वर मिळू शकते.  AU बँकेच्या डेबिट कार्डवर तात्काळ 10 टक्क्यांचा डिस्काउंट मिळणार आहे. HDFC बँकेच्या क्रेडिट कार्ड धारकांना 10 टक्के डिस्काउंट आणि 500 रुपये ऑफ मिळणार आहेत.

सॅमसंग गॅलक्सी M51- Samsung Galaxy M51 हा फोन या सेलमध्ये तुम्हाला 22,999 रुपयांमध्ये मिळणार आहे. एक्सचेंज ऑफर अंतर्गत 11,200 रुपयांपर्यंतची रक्कम देखील मिळू शकते. विविध ऑफर्स असून नो कॉस्ट ईएमआय 1,083 रुपयांपासून सुरु होत आहे. AU बँकेच्या डेबिट कार्डवर आणि HSBC क्रेडिट कार्ड धारकांना तात्काळ डिस्काउंट मिळणार आहे. फोनमध्ये 6.7 इंचाचा sAMOLED PLUS इनफिनिटी-O डिस्प्ले दिला आहे. क्वाड रिअर कॅमेरा  आणि क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 730G प्रोसेसर बरोबर 7000mAh बॅटरी दिली आहे.

First published:

Tags: Amazon