नवी दिल्ली, 1 जून : एखाद्या विमानाचा अपघात झाल्यानंतर त्याच्या ब्लॅक बॉक्सचा (Black Box) शोध अनेकदा चर्चेत आला असल्याच्या, अनेक बातम्या समोर आल्या आहेत. परंतु आता युरोपातील अधिकतर देशांनी कारमध्येही (Car) ब्लॅक बॉक्स लावणं अनिवार्य केलं आहे. ज्यामुळे एखादा अपघात झाल्यास, अपघाताची शक्यता कमी करण्यासाठी डेटा रेकॉर्ड करुन, त्याचं विश्लेषण केलं जाईल.
युरोपीय संघाने 6 जुलैपासून कारमध्ये ब्लॅक बॉक्सच्या अनिवार्यतेला मान्यता दिली आहे. यानंतर, सर्व कार कंपन्यांना त्यांच्या कारमध्ये ब्लॅक बॉक्स ठेवणं बंधनकारक असणार आहे. आतापर्यंत केवळ विमानातच ब्लॅक बॉक्सचा वापर केला जात होता. जो अपघातानंतर सर्वात आधी, अपघाताचं कारण ओळखण्यास मदतशीर ठरत होता.
कसं काम करेल ब्लॅक बॉक्स -
कारमध्ये असलेला ब्लॅक बॉक्स कारचा स्पीड, ब्रेकची स्थिती, स्टेअरिंग व्हिल, रस्त्याचं वळण, सीटबेल्टचा वापर हा सर्व डेटा जमा करेल. अशात एखाद्या कारचा अपघात झाल्यास, यातून सर्व माहिती समोर येईल, तसंच अपघाताचं कारण समजण्यासही मदत होऊ शकेल.
ड्रायव्हर बंद करू शकणार नाही ब्लॅक बॉक्स -
कारमध्ये असलेला ब्लॅक बॉक्स ड्रायव्हर बंद करू शकत नाही. जशी कार सुरू होईल, तसं ब्लॅक बॉक्सही डेटाचं रेकॉर्डिंग सुरू करेल. त्याशिवाय ब्लॅक बॉक्समध्ये एक मर्यादित वेळेचं रेकॉर्डिंग नेहमी उपलब्ध असेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.