Home /News /technology /

पेट्रोलशिवाय धावेल ही बाईक; पण हेल्मेट डोक्यावर असल्याशिवाय सुरूच होणार नाही!

पेट्रोलशिवाय धावेल ही बाईक; पण हेल्मेट डोक्यावर असल्याशिवाय सुरूच होणार नाही!

मेरठमधील (Meerut) आयटीआयच्या (ITI) विद्यार्थ्यांनी अशी भन्नाट बाईक (Bike) तयार केली आहे, जी सौरऊर्जेवर चालणार पण हेल्मेट (Helmet) घातल्याशिवाय सुरूच होणार नाही.

    मेरठ, 3 मार्च : बाईक (Bike) चालवताना हेल्मेट (Helmet) घालणं गरजेचं आहे, हे छोटंसं हेल्मट आपलं जीव वाचवतं. हे माहिती असूनही अनेक जण हेल्मेट घालणं टाळतात आणि विना हेल्मेट बाईक चालवणाऱ्या अशाच व्यक्तींसाठी मेरठच्या आयटीआय (ITI) विद्यार्थ्यांनी अशी बाईक तयार केली आहे, जी हेल्मेट घातल्याशिवाय सुरूच होणार नाही. आयटीआय (ITI) साकेतच्या विद्यार्थ्यांनी अशी अनोखी बाईक आणि हेल्मेट तयार केलं आहे. हे हेल्मेट घातल्यानंतर ही बाईक सुरू होईल आणि विशेष म्हणजे तुम्हाला पेट्रोलचीही गरज पडणार नाही. खरंतर मेरठ आयटीआयच्या विद्यार्थ्यांनी भंगारात असलेल्या बाईकचं रूपच पालटून टाकलं आहे. सोलर बाईक त्यांनी तयार केली. बाईक तयार करण्यासाठी 25 दिवस लागले. आयटीआय साकेतच्या विद्यार्थ्यांच्या मते, ‘या बाईकसाठी पेट्रोलची गरज नाही कारण ती सौरऊर्जेवर चालणारी आहे सूर्याच्या किरणांमध्ये ही बाईक चार्ज होते. एकदा चार्ज झाल्यानंतर ही बाईक 70 किलोमीटरपर्यंत जाऊ शकते.’ हे वाचा - कोरोनाचा धोका वाढला ! भारतात एकूण 6 रुग्ण, आणखी 6 जणांना व्हायरस झाल्याची शक्यता ही बाईक विना पेट्रोल 40 किलोमीटरच्या गतीने 70 किलोमीटरपर्यंत चालू शकते. . बाईकवर लावण्यात आलेल्या सोलर पॅनलला जर ऊन मिळालं नाही, तरीदेखील ही बाईक 50 किलोमीटरपर्यंत जाऊ शकते. या बाईकमध्ये चार बॅटरी आहेत. ज्या 5 वर्षांपर्यंत वापरता येऊ शकतात, बदलण्याची गरज नाही. २ व्यक्ती आरामात या बाईकवर आरामात बसून प्रवास करू शकतात. या बाईकचा आणखी एक फायदा म्हणजे बाईक सुरू होण्यासाठी हेल्मेटचीच गरज असल्याने हेल्मेट तुमच्या डोक्यावर राहिल, ज्यामुळे तुमचा जीव सुरक्षित राहिल आणि दुसरं म्हणजे बाईक चोरी होण्याचा धोकाही नाही. हे वाचा -'त्याने माझ्या ड्रिंकमध्ये ड्रग्स मिसळले आणि...', रश्मी देसाईचा गौप्यस्फोट
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Bike, ITI, Meerut

    पुढील बातम्या